Enquire Now

Request A Quote

ग्रंथाचं काम मार्गी लागलं..

काही ना काही कारणांमुळे सतत रखडलेला 'निवडक चिन्ह'च्या, 'जेजे जगी' आणि 'व्यक्तिचित्रं पण शब्दातली' ग्रंथांचा प्रकल्प आता मात्र खरोखरच मार्गी लागला आहे. 'जेजे जगी जगले... 'च्या मूळ आराखड्यात काहीतरी न्यून जाणवत होते. जे लक्षात यायला बराच वेळ जावा लागला. 'निवडक चिन्ह'चे ग्रंथ आणखीन किमान शंभर वर्ष देखील निश्चितपणे वाचले जातील याची खात्री असल्यामुळेच आम्ही त्या ग्रंथातली कमतरता काढून टाकायचा निश्चय केला. 

'जेजे जगी जगले'...  हे शीर्षक ज्या सदरामुळे 'निवडक चिन्ह'च्या या खंडाला दिले, त्या सदरातच बरंच काही काम करून घ्यायचं राहिलं आहे हे लक्षात आलं आणि गंगाराम गवाणकर, पं शरद साठे, अमोल पालेकर यांच्यापासून ते रवी जाधव, महेश लिमये, हेमांगी कवी पर्यंतच्या  जेजेत शिकलेल्या पण चित्रकला वगळता अन्य क्षेत्रातच नाव कमावलेल्या तब्बल १९ माजी विद्यार्थ्यांची किंवा अलीकडच्या भाषेत सांगायचं तर सेलिब्रेटीजच्या आत्मकथनांचा या ग्रंथात समावेश झाला. हे वाक्य जितक्या सहजतेनं लिहिलं तितका काही तो प्रवास सोपा नव्हता. पण जिद्द सोडली नाही, ठाम राहिलो. आता मात्र हा ग्रंथ मार्गी लागलाय. 

पुढल्या महिन्यात त्याच्या डिझायनींगच्या कामाला सुरवात होईल. प्रूफरीडिंग वगैरे सारंच 'चिन्ह'च्या नेहमीच्या पद्धतीने होईल आणि एप्रिलमध्ये तो छपाईला जाईल. मेमध्ये मोठ्या समारंभाने तो प्रकाशित होईल हे आता अगदी शंभर टक्के. जवळ जवळ सर्वच आवृत्ती नोंदली गेली आहे. खूपच महागडी निर्मिती असल्यामुळे हजार प्रतींचीच आवृत्ती आम्ही प्रकाशित करीत आहोत. ज्यांना कुणाला या ग्रंथाची प्रत आपल्या संग्रहात असायलाच हवी असे वाटते त्यांनी 90040 34903 या 'चिन्ह'च्या नंबरवर 'J J ' हा संदेश पाठवून. ती मिळवण्याचा प्रयत्न करावा. 

या संदर्भातली सर्व माहिती एक फेब्रुवारीपासून फेसबुकच्या याच पानावर किंवा 'हॅलो', 'शेअर चॅट'वर देखील मिळू शकेल. आणखीन एक प्रयोग या निमित्ताने आम्ही करीत आहोत तो म्हणजे 'जेजे' ग्रंथा संबंधीच्या सर्व घडामोडी अगदी आपल्या हातातल्या मोबाईलवर कळाव्यात या साठी व्हाट्सअपचा एक ब्रॉडकास्ट ग्रुप देखील तयार करण्यात आला आहे. ज्यांना त्यात सहभागी होयचे असेल त्यांनी वरील नंबरवर 'J J B C' हा मेसेज स्वतःच्या नावासहित पाठवावा. या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमीत्ताने जेजेचे सर्वच माजी विद्यार्थी एकत्र यावेत असा प्रयत्न केला जाणार आहे. त्यांनाही या ग्रुपमध्ये सहभागी होता येईल. 
सतीश 

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...