Enquire Now

Request A Quote

मुक्काम सुंदरबन !

भाग - ८ 

  पुण्यातील चित्रकार शरद तारडे यांनी अलीकडेच सुंदरबनला भेट दिली होती. या भेटी विषयी त्यांनी फेसबुकवर लेखन केले आहे. या लेखनाचा आठवा भाग त्यांच्याच अनुमतीने इथं प्रसिद्ध करीत आहोत. 

     

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता सुंदरबनच्या सफारीला सुरुवात झाली.

एक मोठ्या बोटीत छान आरामदायी खुर्च्या वरच्या डेकवर कडेला बसविल्या होत्या आणि खालच्या बाजूस किचन आणि थोडी बसायची जागा होती ,मागे वॉश रूम होती .

सुंदरबनचे जंगल खात्यातील एक गाईड आमच्याबरोबर होता. या बोटीवर चढणे म्हणजे कसरतच होती. किनाऱ्यावर बोटीचा धक्का खाली आणि बोटवर अशी परिस्थिती होती आणि खालच्या सर्व बाजूला चिखल मातीचा थर होता. एक आडव्या पट्ट्या मारलेली तिरकी फळी जिना म्हणून टाकली होते आणि मोठा बांबू दोघांनी थोड्या वरच्या बाजूस हात धरायला धरला होता. त्या साह्याने कसेबसे सर्वजण एकदा बोटीवर चढलो.

बसल्या लगेच ब्लॅक टी घेऊन बोट निघाली , दहा-पंधरा मिनिटांनी ही बोट एका नदीच्या पात्रातून जंगलाकडे वळलो.
निशब्द शांतता पसरली होती , पक्षी झाडावर बसून टिव टिव करत होते , काही मध्येच पाण्यात सूर मारून मासे पकडत होते.
आम्ही किनार्‍याकडे बघत होतो टक लावून काही प्राणी दिसतात का ते!
मधेच आमच्या गाईडने दोन मोठे पक्षी दाखवले आणि बोटीवर आनंदाचे वातावरण तयार झाले .

हे जंगल पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. खारफुटी (mangroves) खाऱ्यापाण्यात वाढणारी महत्वाची झाडे आहेत.खारफुटीची वने असलेल्या सर्व ठिकाणी सागरी लाटांपासून संरक्षण मिळते.

किनाऱ्या जवळून पाच किलोमीटर या वेगाने बोट चालली होती कारण किनाऱ्यावरच्या जंगलात काही प्राणी दिसले तर ते आम्हाला बघता यावेत.

सकाळचे आठ वाजले आणि खालच्या किचनमधून पुऱ्या तळण्याचा वास वरती आले, फोडणीचा खमंग सुगंध आला आणि पाच दहा मिनिटातच गरम गरम पुऱ्या, बटाट्याचा रस्सा आणि तळलेले बटाट्याचे काप! प्रत्येकाच्या हातात एवढी सुंदर, चविष्ट डिश आणि शांत किनारा मग काय त्या कडे बघत हातातली प्लेट कधी संपली हे कळलेच नाही .

काही वेळाने एक बोट एका धक्क्यावर लागली आणि जिथून आम्हाला जंगलामध्ये जाण्याचा रस्ता होता , सगळ्यांची नावे पुकारून आज सोडण्यात आले. थोडे चालल्यावर तीन मजली टॉवरवर आम्ही गेलो .
तिथून जंगलातील पाणवठ्याची जागा नीट दिसत होते .
काही हरणे पाणी पिण्यास आली होती पण ती खूप सावधगिरीने इकडे तिकडे बघत मग थोडे, थोडे पाणी पीत होती. आजूबाजूला जंगली श्वापद असणार होते याची जाणीव त्यांना होती आम्ही मात्र वाघ दिसतो का ते पहात होतो पण काही दर्शन झाले नाही.

तिथल्या एका बोर्डावर मात्र शेवटी त्याठिकाणी कुठल्या दिवशी आणि कुठल्या वेळेस वाघ दिसला याची सविस्तर नोंद केलेली होती . आता खरे तर आम्ही पिंजऱ्यात होतो आणि वाघ आणि इतर प्राणी स्वातंत्र्य घेत फिरत होते .

पुन्हा बोटीवर परत आलो तेव्हा अकरा वाजले होते , तिथल्या किनाऱ्यावरचा आम्ही खूप मोठी मगर बघितली तिची लांबी जवळजवळ तीन मीटर नक्कीच होती.

किनारे ओलांडून बोट चालू लागली आणि निशब्द वातावरणात आम्ही हरवून गेलो.
फक्त बोटीचा आवाज येत होता .
असेच काही अंतर चालल्यानंतर चमचमीत वासांनी नाक सुखावले आणि दहा पंधरा मिनिटातच पूर्ण जेवणाची थाळी आमच्या हातात आली.

पोळी, तीन प्रकारच्या भाज्या, रस्सा आणि भात !
मुख्य म्हणजे जेवताना बोट मुळीच हलत नव्हती त्यामुळे नीट जेवता आले . एवढ्या वेगळ्या वातावरणात आणि शांततेत आम्ही सर्व जण प्रथमच जेवणाचा आस्वाद घेत होतो.

ह्या सुंदरबनचे एक विशिष्ट म्हणजे तिथली स्वच्छता! जवळजवळ तीस पस्तीस किलोमीटर प्रवास आम्ही बोटीने केला पण पाण्यात किंवा किनाऱ्यावर एकही प्लॅस्टिकचा तुकडा किंवा बाटली कोणालाही दिसली नाही. मोठ्या प्रमाणावर रोज तिथे लोक भेट देत असतात.
हि स्वच्छता खरोखरच वाखाणण्याजोगी होती.

आता आम्हाला बंगाली जेवणाची पद्धत लक्षात आली होती या जेवणात प्रथम कारल्याची भाजी पासून खाऊन सुरुवात करतात आणि मग बाकीच्या भाज्या पोळी किंवा पराठा , पुरी आणि सगळ्यात शेवटी टोमॅटोचे गोड लोणचे असते हे . सुंदरबन येथे मिळणाऱ्या भाज्या तिथेच पिकवत असल्याने त्याची चव फारच अप्रतिम लागायची ! बरोबर तळलेले बटाटे नेहमी असायचीच.

काही वेळाने दुपारचा ब्लॅक टी मिळाला आणि पुन्हा बोट आरामात या किनार्‍यावर त्या किनार्‍यावर फिरू लागली अंधार लवकर होत असल्याने साडेचार वाजता किनार्‍याला लागलो. बरोबरच्या दोन जर्मन मुली पुन्हा हॉलिडे रिसॉर्टला परतल्या , त्यांना तिथे अजून दोन दिवस राहायचे होते.
त्यांना टाटा करून आम्ही पुन्हा गाडीने कलकत्त्याला निघालो !

सुंदरबनचे "स्वप्न "सत्यात उतरवून!

  
शरद तारडे 

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...