Enquire Now

Request A Quote

मुक्काम बिष्णुपुर !

भाग - ६
पुण्यातील चित्रकार शरद तारडे यांनी अलीकडेच विष्णुपुरला भेट दिली होती. या भेटी विषयी त्यांनी फेसबुकवर लेखन केले आहे. या लेखनाचा सहावा भाग त्यांच्याच अनुमतीने इथं प्रसिद्ध करीत आहोत.  
  

टेराकोटाच्या टाईल्स बनवून त्याच्या सहाय्याने सजवलेली ही मंदिरे खुप वर्षांपूर्वी बघायला पाहिजे असे सगळ्यांच्याच मनात होते पण आता ते सर्व जमून येत होते. सकाळी लवकर निघून आम्ही तीन तास गाडीने प्रवास करून बिष्णुपुर ला पोहोचलो .

गाव खूप मोठे होते , बऱ्याच छोट्या रस्त्याने आत गेल्यावर लांबवर दोन-तीन देवळे दिसली तेव्हा पुण्यातले लाल देऊळ आठवले, पण देवळाच्या जवळ गेल्यावर टेराकोटाचे बारीक काम बघितले त्याने खरोखरच चकित झालो.

साधारण सोळाव्या शतकामध्ये राजस्थान मधून "मल्ल " राजे येथे येऊन त्यांनी कृष्णावरच्या प्रेमाने आणि श्रध्देपोटी हि देवळे बांधली .

प्रथम दगडाचे बांधकाम त्यावर विटाचे बांधकाम आणि मग टेराकोटा मध्ये तयार केलेल्या हजारो कलापूर्ण टाईल्सनी हि देवळे सजवलेली होती,

कृष्णाच्या रासलीला ,रामायण-महाभारत, शिकारीची दृश्ये, प्रवासाची चित्रे, आणि इतर दृश्य घडवली होती आणि हे काम खूप बारकाईने आणि प्रचंड प्रमाणावर केले होते. ते बघून आमचे डोळे निवले!

गाईडच्या सांगण्यानुसार लाकडी साचे आधी तयार करून ( हे तर खूप कष्टाचे आणि किचकट काम , सर्व गोष्टी उलट्या कोरून काढायच्या) मग त्यातून मातीचे एकसारखे साचे काढून ते भट्टीत भाजले गेले , पण त्यामुळे खूप ठिकाणी एकसारखी दृश्य दिसत होती.

नाविन्यपूर्ण कलाकुसरीचे काम होते ते मात्र स्वतंतररीत्या लावले होते. काही खांबावर तर ग्राफिक पद्धतीने डिझाईन, नारळाची झाडे वगैरे अप्रतीमरित्या कोरले होते.

एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करून हि
टेराकोटाची देवळे साडेचारशे वर्षापेक्षा जास्त होता टिकली होती हे विशेष !

दगडाच्या मूर्ती ही ऊन पावसात थोड्या झिजून जातातच, पण येथे जे घडत होते ते सगळे विशेष होते .

प्रत्येक मंदिरासाठी डिझायनिंग,प्लॅनिंग खूप वेगळ्या प्रकारे केलेली होती. बऱ्याच ठिकाणी पुनः बांधणीचे काम केले होते पण ते कळत नव्हते.

टेराकोटा मध्ये बारीक काम करण्यासाठी खूप मेहनत आणि वेळखाऊ प्रक्रियेतून जावे लागते.

या कलाकारांनी ते करून दाखवले त्या हजारो कलाकारांना खरोखरच सलाम!

शरद तारडे 

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...