Enquire Now

Request A Quote

मुक्काम शांतिनिकेतन !

भाग - ५

  पुण्यातील चित्रकार शरद तारडे यांनी अलीकडेच शांतिनिकेतनला भेट दिली होती. या भेटी विषयी त्यांनी फेसबुकवर लेखन केले आहे. या लेखनाचा पाचवा भाग त्यांच्याच अनुमतीने इथं प्रसिद्ध करीत आहोत.  


या गावातून परत येताना आम्ही त्या गावकऱ्यांच्या मनःस्थितीचा विचार करत होतो .
अशा खेड्यांचा लवकरच कायापालट होऊन आधुनिक घरं येतील हे लक्षात येत होते पण एका दृष्टीने ते बरोबर होते .

सोयीसुविधा असलेले कायमचे घर प्रत्येकाला हवेच असते.

येताना रस्त्यावर एक मोठा बंगला पहिला, त्याचे अंगण लाल मातीने सुरेख सारवले होते आणि बंगल्याची रचना आधुनिक पण त्यावरचे केलेले आदिवासी पद्धतीचे म्युरल खूप सुंदर दिसत होती. त्यामध्ये एक छोटासा दरवाजा ही दिसत होता.
शेवटी गेट उघडून आम्ही आत गेलो तर आणखीनच चकित झालो कारण तो बंगला चारही बाजूने फारच अप्रतिम म्युरलने साकारला होता . भराभर फोटो काढून पुन्हा बाहेर आलो आणि या बंगल्यात कोणीच कसे नाही याचे आश्चर्य करत राहिलो.
तेवढ्यात शेजारच्या घरात उजेड दिसला आणि छोटा दरवाजा दिसला , तिथून आत गेल्यावर जे दिसलं त्यांचे डोळे विस्फारले.
आत मध्ये अत्यंत सुंदर रचनेतील सिरॅमिकचा स्टुडिओ होता. वेगवेगळ्या पद्धतींच्या चहाच्या किटल्या , पॉट, डिशेस अशा असंख्य सुंदर वस्तूंचा खजिनाच होता आणि तो अत्यंत सुंदर रीतीने मांडला होता.

एक मोठे झाड त्या सगळ्या स्टुडिओ तून आकाशाला गवसणी घालत होते !

आत मध्ये गेल्यावर तिथल्या मालकांची विद्युत् रॉय यांची गाठ पडली ( Studio Boner Pukar Danga) , आम्ही सर्व चित्रकार आहेत ऐकल्यानंतर त्यांनी आम्हाला स्टुडीओच्या वरच्या मजल्यावर नेले .तो जिनाही नैसर्गिकपणे दगडे रचून केला होता त्यामुळे ते आम्हाला जपून जा, जपून जा असे सारखे सांगत होते .
वर गेल्यावर जे दृश्य बघितले ते तर आणखीनच अप्रतिम होते. सिरॅमिक मधल्या सर्व सुंदर वस्तू टेबलावर ठेवल्या होत्या, शेजारी बसण्यासाठी छानशी सतरंजी टाकली होती ,मधून मधून स्पॉटलाईट मुळे हे सर्व स्वप्नवत भासत होते.

स्टुडिओ असावा तर असा असे आमच्या सर्वांच्याच मनात येत होते आणि ते मालक अत्यंत शांतपणे आम्हाला लांबून निरखत होते.

मी थोडा बोलण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांचे विचार त्यांच्या कामाप्रमाणे प्रगल्भ आहेत हेही लक्षात आले .

पाँडेचेरी येथे गोल्डन ब्रिज स्टुडिओ म्हणून मोठा सिरॅमिकचा स्टुडिओ आम्ही बघितला होता.हा स्टुडिओ अमेरिकेतून पंचेचाळीस वर्षापूर्वी आलेल्या एका जोडप्याने सुरू केला होता .

त्या स्टुडिओ बद्दल त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले- भारतभर त्यांचे शिष्य पसरले आहेत, परंतु ते म्हणाले
" पूरे भारतमें उनका का बडा नाम है ! लेकिन मुझे लगता है कि उन्हे अपने भारत की मिट्टी का सुगंधका अभितक पता नही चला!"
असे खोल विचार करणारे लोक भेटले की खरेच खूप बरे वाटते आणि या विचारांच्या मागे त्यांचा गंभीर पणा त्याची साक्ष देत होता.

ते चित्रकार आहेत असे कळल्यानंतर आम्ही त्यांना चित्रे दाखवा असा आग्रह धरला, तेव्हा त्यांनी खाली नेऊन एका कोपऱ्यामध्ये ठेवलेली चित्रे आम्हाला दाखवली .
ती चित्रे त्यांनी रस्त्यावर सापडलेल्या रंगीत दगड खलबत्त्यामध्ये कुटून रंग तयार करून त्या रंगाने चित्रे साकारली होती .
खूप वेगळे काम होते त्यांचे परंतु या चित्रांना वाळवी लागली होती परंतु त्यांनी "यही जीवन है!" असे म्हणत वाळवी झटकली आणि आम्हाला चित्रे दाखवली.

ही सर्व चित्रे बघून आम्ही भारावून गेलो. मुख्य म्हणजे त्यांच्या विचारांनी आम्ही प्रेरित झालो!

तिथून आम्ही अर्घो प्रियो यांचा स्टुडिओ बघायला गेलो .ते शांतिनिकेतन येथे प्रोफेसर होते.
त्यांचा बंगला इतका सुंदर होता की त्यांची चित्रे बघायला आलोय हेच आम्ही काही काळ विसरून गेलो.
टेबल लॅम्प खाली एक हेड तयार करून ठेवले होते ते इतके जीवंत भासत होते की तिथेच आम्हाला या कलाकाराची खरी ओळख पटली.

चहापाणी करून त्यांचा स्टुडिओ दाखवण्यासाठी आम्हाला वरच्या मजल्यावर नेले तेथे भली मोठी पेंटिंग बघून आम्ही खूपच खूश झालो.

मेहेजबिन यांची (त्यांच्या बायकोची )दोन पेंटिंग ही खूप विलोभनीय रंगसगतीने सजलेली दिसत होती आणि त्यातील प्रत्येक आकार खूप आकर्षक रित्या सजला होता. खूप बारकाईने काम केले होते.
नंतर त्यांनी स्वतःची पेंटिंग आम्हाला दाखवली . मानवी आकारांचे खूप गहन अभ्यास त्यात जाणवत होता आणि विषयही खूप वेगळे होते.

माणसाचे बलदंड शरीर, त्यांचे हात, स्नायू, बोटे यांचा पुरेपूर अभ्यास केलेला कळत होता आणि या चित्रांचे विषयही खूप वेगळे होते.
त्यांची स्केचेस आणि शिल्पकला बघून
आम्हाला खूप वेगळे बघितल्याचे समाधान झाले, त्यांनाही उमाताई कुलकर्णी ,विजय पाडळकर असे दिग्गज लेखक आपल्याकडे आले हे खूप आवडले!

तिथून आम्ही पुन्हा आमच्या गेस्ट हाऊस कडे परतलो,उद्या बिस्नुपुरला जायचे होते.

  

शरद तारडे   

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...