Enquire Now

Request A Quote

मुक्काम शांतिनिकेतन !

भाग - ४

  पुण्यातील चित्रकार शरद तारडे यांनी अलीकडेच शांतिनिकेतनला भेट दिली होती. या भेटी विषयी त्यांनी फेसबुकवर लेखन केले आहे. या लेखनाचा चौथा भाग त्यांच्याच अनुमतीने इथं प्रसिद्ध करीत आहोत.  


पहाटे साडेपाचला जाग आली आणि बाहेर पाहतो तो थोडे उजाडले होते , ब्लॅक कॉफी करून घेऊन खिडकीतून बाहेर बघत शांतपणे बसलो नंतर फिरायला बाहेर पडलो .

शांतीनिकेतन च्या परिसरात श्याम बत्ती बाजार जवळ शर्वरी राय चौधरी यांचे घर कुठे असेल याचा अंदाज करीत निघा लो, रस्त्यावर एका चहा टपरीवर मधून चहा पिला आणि त्याला चौधरींच्या घराविषयी विचारल्यावर
"ये गली मे तो है लेकिन अभी कोई नही मिलेगा!"असे सांगितले.
मी लगेच त्या बंगल्यापाशी गेलो तर त्या बंगल्याचा अंगणात जागोजागी शिल्प ठेवलेली दिसली आणि ती सर्व अमूर्त स्वरूपाची होती . प्रत्येकाचे लांबूनच फोटो काढून बंगल्याच्या दरवाज्यापाशी भले मोठे देखणे शिल्प बघून चकित झालो, ते बहुतेक रवींद्रनाथ टागोर यांचे असावे . चौधरींचा पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर खूप मैत्रीचे संबंध होते त्यामुळे अशा मोठ्या कलाकाराचे घर बघायला मिळाले या आनंदातच मी होतो तिथुन पुन्हा माघारी पडलो .

जवळच खेड्यासारखी दिसणारी " संथाल वस्ती" दिसली .छान गवताच्या गंजीच्या छपरांची घरे दिसत होती आणि ही सर्व वस्ती मोठ्या झाडांच्या परिवारात लपलेली होती .

गावामध्येच पाय ठेवतात समोरचे दृश्य बघून मोबाईल आपोआपच हाती आला आणि फोटो काढू लागलो. वळणदार छोट्या रस्त्यांनी वसलेले हे गाव फार सुंदर होते,
प्रत्येक घर वेगवेगळ्या पद्धतीने सजवले होते जणू काही अमूर्त शिल्प रचनाच माझ्या समोरून सरकत होते, हि घरांची शिल्पे इतकी सुंदर रितीने सजवली गेली होती ती त्या शिल्पांमध्ये राहून त्याचा आनंद ही लोकं लुटत होती.

संगीत असो, गाणी असो चित्रकला प्रत्येक गोष्टींमध्ये मला कला भिनलेली दिसली आणि मग हा परिसर का कलेचे माहेरघर म्हणून ओळखला जातो हेही लक्षात आले.

छोटे से दरवाजे आणि आत अंगण असलेली घरे, छोटी वासरांना प्रेमाने चाटणाऱ्या गाई, शेळ्या आत मध्ये हुंदडत होत्या. कोपर्‍यात चूलीवर मोठ्या पातेल्यात आंघोळीचे पाणी तापत होते, वातावरणात धूर साचला होता आणि हे सर्व दरवाज्यातून मी स्तंभित होऊन बघत होतो.

पुढच्या घरात मी शेवटी धीर करून दार लोटून शिरलो आणि समोर निळा तपकिरी रंगात रंगवलेले दोन मजली घर बघून थक्क झालो, या घराच्या खिडक्या बांबूच्या साह्याने बनवून त्यावर मातीचे लिंपण केले होते त्यामुळे त्रिकोण, चौकोन असे वेगवेगळे आकार खिडकीला आपोआपच मिळाले होते .
वरच्या मजल्यावर छान गच्ची दिसत होती आणि प्रचंड मोठ्या अंगणात स्वच्छ सडा घालून रांगोळी काढत वृद्ध महिला बसली होती .
त्यांना फोटो काढू का विचारून हो म्हणायचे आताच माझे चार-पाच फोटो काढून झाले होते, नमस्कार करून मी भारलेल्या अवस्थेत बाहेर पडलो.

एखादे गाव किती वेगवेगळ्या पद्धतीने
सजवता येते तेही काहीही विशिष्ट किंवा महागडी वस्तू न वापरता, पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने याचे हे जीवंत उदाहरण होते.

मी रस्त्यावर येतो तर आणखीन एक विटांच्या सहाय्याने खूप वेगळ्या पद्धतीने , दोन मजली बांधलेले घर बघितले. आजूबाजूला काहीही नव्हते, दरवाजाही बंद होता पण जे विटाचे बांधकाम केले होते ते खूपच वेगळे होते आणि हे घर नक्की कलाकाराचे असेल असे मनात वाटले.

या अर्ध्या तासात जे बघितले त्यांनी माझे डोळे निवले होते.

संध्याकाळी सर्वांना हे गाव दाखवण्यासाठी घेऊन मला जे घर त्यांना दाखवायचे होते तिथे जाताच काहीतरी वेगळे बघायला मिळणार म्हणून सगळे खुश होते परंतु दरवाज्यापाशी जाताच
आतल्या बाईंनी दरवाजा लावून घेतला !
मलाही कळले नाही दरवाजा वाजावून सुद्धा उघडलं नाही तेव्हा मंजुषा यांनी बंगाली भाषेत "आम्हाला फक्त घर बघायचे आहे कृपया बघू द्या!" असे सांगून सुद्धा दरवाजा उघडला नाही मग आमच्या डोक्यात प्रकाश पडला असे अनेक लोक नुसतेच यांचे घर, संसार बघायला येत असतील तर त्यांचे स्वातंत्र्याचे काय?

पिंजऱ्यातल्या जनावरांसारखी यांची परिस्थिती आपण केली आहे का?

तोवर आणखी काही पर्यटक रिक्षाने तिथे उतरले आणि खिडकीतून त्या घरात डोकं घालून बघू लागले .

आम्ही मात्र तिथून काढता पाय घेतला अस्वस्थ होऊन!

  
शरद तारडे   

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...