Enquire Now

Request A Quote

" पँटीत शर्ट खोचलायस ना तो बाहेर काढ "

सांगलीच्या कला महाविद्यालयातले किस्से आणखीनच भन्नाट. पुणे-नाशकांत न्यूड क्लास सुरु होऊ शकले नाहीत पण सांगलीवाले मात्र भलतेच आधुनिक विचाराचे निघाले. त्यांनी तर सांगलीत न्यूड सुरु देखील केला. ही गोष्ट ७० च्या दशकातली. त्यावेळी घडलेला किस्सा बहुळकर यांनी मोठा रंगवून लिहिला आहे.सध्याचा आघाडीचा शिल्पकार चंद्रजीत यादव हा १९८२ मध्ये सांगलीला पेंटिंगच्या तिसऱ्या वर्गात शिकत होता. चंद्रजीतची कामातील तयारी बघून टिळवे सरांनी त्याला तो तिसऱ्या वर्षाला असूनही चौथ्या वर्षाला असलेल्या न्यूड क्लासमध्ये जाऊन ड्रॉईंग करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला. प्रथम त्यांनी चंद्रजीत यादवला प्रिन्सिपलच्या ऑफिसात बोलावलं. चंद्रजीत घाबरतच आत शिरला. टिळवे सर त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले, " काय रे यादव, न्यूड क्लासमध्ये जाऊन ड्रॉईंग करायचं आहे का ?" यादव बावचळलाच आणि टिळवे सरांकडे पाहत राहिला.


टिळवे सरांनी त्यांचा उग्र चेहरा प्रेमळ करत आणि आवाज मुलायम करत पुन्हा विचारलं, " यादव, बाळा, तुझं ड्रॉईंग चांगलं आहे. फोर्थ इयरला न्यूड आहे, तिथं जाऊन तू ड्रॉईंग करणार का?" आता यादवच्या डोक्यात प्रकाश पडला व तो म्हणाला, " सर चालेल की... " आता टिळवे सरांनी त्याला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं. यादव काटकुळा. त्यानं केस वाढवले होते. त्या काळातल्या फॅशनप्रमाणे गुडघ्यापर्यंत अगदी घट्ट असलेली व खाली घोळदार असलेली बेलबॉटम पँट घातली होती. अंगात बुशशर्ट होता, पण तो इन करून वर जाडजूड पट्टा बांधला होता. हा अवतार न्याहाळत असतानाच टिळवे सर म्हणाले, " एक मिनिट थांब, यापूर्वी कधी न्यूड बघितलंयस का ? " यावर यादवनं नकार देताच ते म्हणाले, " पहिल्यांदाच नागवं स्त्री-शरीर बघणार आहेस. काहीतरी, कसंतरी होईल, पण तिकडं लक्ष द्यायचं नाही, छान ड्रॉईंग करायचं आणि तो पँटीत शर्ट खोचलायस ना तो बाहेर काढ. पँट नको तिथं घट्ट आहे. आणि एक लक्षात ठेव, समोर बसलेलं मॉडेल स्त्री असेल. त्या नग्न मॉडेलसमोर एकदा बसलास की १५/२० मिनिटं जागेवरून अजिबात उठायचं नाही. " आणि त्यांनी यादवला पँटीत खोचलेला शर्ट स्वतःसमोर बाहेर काढायला लावून वर्गाकडे पिटाळलं.


[ 'नग्नता' अंक हवा असल्यास 90040 34903 या व्हाट्सअप नंबरवर Chinha 3 हा मेसेज आपल्या नाव पत्यासह पाठवा आणि 'नग्नता' अंकावर ( रु. ७५० टपाल खर्च रु. ५० = ८०० रुपये ) ५०० रुपयांची 'गायतोंडे' जनावृत्ती आणि चित्रकलाविषयक ५०० टिप्स असलेलं १०० रुपयांचं ' चित्रसूत्र ' पुस्तक भेट मिळवा. 'चित्रसूत्र' हवं असल्यास मात्र अधिक २५ रुपये म्हणजे ८२५ रु.भरा ]

सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

भोला पागला

अधिक वाचा

Feature 2

चित्रकारांच्या ग्रुपवर अमीर खॉ साहेब ...

अधिक वाचा

Feature 3

मे मध्ये जेजे जगी जगले... प्रसिद्ध होणार !

अधिक वाचा

Feature 4

एअर इंडियाचा कलासंग्रह कुठं गेला ?

अधिक वाचा

Feature 5

ग्रंथाचं काम मार्गी लागलं..

अधिक वाचा
12345678910...