Enquire Now

Request A Quote

नागडे पुतळे हलविले का ?

मोरारजीभाई देसाई मुख्यमंत्री होते तेव्हाची ही गोष्ट. त्यावेळी मुंबई खूप छोटी होती आणि जेजे स्कूल ऑफ आर्ट सारख्या संस्थांना समाजात खूप मोठा मान होता. मुंबईच्या सांस्कृतिक जीवनातले नव्हे तर राजकीय क्षेत्रातील लोकही जेजे स्कूल ऑफ आर्टला भेट देण्यास धन्यता मानत. आजच्या राजकर्त्यासारखे तेव्हाचे राज्यकर्ते जेजेच्या परिसरात येऊन गावातली माणसं घुसवण्याचे प्रयत्न करत नसत किंवा जेजेच्या अधिकाऱ्यांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न करत नसत किंवा जेजेच्या लाखमोलाच्या जमिनीवर डोळा देखील ठेवण्याचा प्रयत्न करत नसत. एके दिवशी तेव्हाचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई जेजेला शताब्दी वर्षानिमित्ताने भेट देण्यासाठी आले आणि त्यांची पहिली नजर पडली ती ग्रीक रोमन पुतळ्यांवरच. पुढं काय झालं ते बहुळकरांच्याच शब्दांत वाचा...


" महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी १९५७ मध्ये जेजे स्कूल ऑफ आर्टला १०० वर्ष पूर्ण झाली. त्यादरम्यानच्या केव्हातरी तत्कालीन व्दिभाषिक राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई व बाळासाहेब खेर आदी मंडळी सर जेजे स्कूल ऑफ आर्ट बघण्यासाठी आली होती. जेजे स्कूलच्या त्या भव्य इमारतीत पांढरेशुभ्र ग्रीक-रोमन पुतळे आहेत. यातील बहुसंख्य अर्धनग्न किंवा नग्न आहेत. जिना चढून वर येताच समोरच असलेल्या व्हीनस द मिलोच्या पुतळ्याची अनावृत्त छाती बघताच गांधीवादी मोरारजीभाईंचे डोळे आश्चर्याने विस्फारले. डिनच्या ऑफिसात ते पोचले, तर डीनच्या स्टुडिओतही इतर चित्रांसोबत काही नग्न चित्रं टांगलेली होती.


" त्यांना वर्ग दाखविण्यास नेलं, तर पहिल्याच वर्गात ऍटीक स्टडी सुरु होता. हे पुतळेदेखील अर्धनग्न किंवा नग्न होते. तो दुसऱ्या वर्षाचा वर्ग होता. मात्र तिसऱ्या वर्षाच्या वर्गात कपडे घालून मॉडेल बसलं होतं. ते बघून वातावरण थोडंसं निवळलं. पण तिथं असणारे भव्य ग्रीक रोमन पुतळे त्यांतील नग्नतेमुळे मोरारजीभाईंना खटकलेच. पुढचा वर्ग चौथ्या वर्षाचा होता तर शेवटचा डिप्लोमाचा. त्या वर्गावर दार बंद करून त्यावर " No Entry - NUDE CLASS " असं लिहिलं होतं. त्याकडे नजर जाताच सोबतचे डीन व विभाग प्रमुख यांच्याकडे मोरारजीभाईंनी प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. यावर ' शरीरशास्त्राच्या अभ्यासासाठी नग्न मॉडेलवरून तिथं अभ्यास केला जातो ' हे ऐकताच त्यांचं पित्त खवळलं. वर्गात जाऊन प्रत्यक्ष बघण्याची विनंती करताच, त्यांनी ती सपशेल नाकारली व हा असला भयंकर अभ्यास बंद करा व हे नागडे पुतळे हलवा अशी आज्ञा सोडली. कुठून यांना आमंत्रण दिलं, जेजेच्या अधिकाऱ्यांना व शिक्षकांना वाटलं. शेवटी कशीतरी समजूत घालून त्यांची रवानगी केली. पण त्यानंतर आलेल्या सरकारी खलित्यात, ' हे असले शिक्षण बंद केले का, व ते नागडे पुतळे हलवले का ? ' अशी विचारणा होत असे."


[ 'नग्नता' अंक हवा असल्यास 90040 34903 या व्हाट्सअप नंबरवर Chinha 3 हा मेसेज आपल्या नाव पत्यासह पाठवा आणि 'नग्नता' अंकावर ( रु. ७५० + टपाल खर्च रु. ५० = ८०० रुपये ) ५०० रुपयांची 'गायतोंडे' जनावृत्ती आणि चित्रकलाविषयक ५०० टिप्स असलेलं १०० रुपयांचं ' चित्रसूत्र ' पुस्तक भेट मिळवा. ]

सतीश नाईक 

Top Features

 

Feature 1

भोला पागला

अधिक वाचा

Feature 2

चित्रकारांच्या ग्रुपवर अमीर खॉ साहेब ...

अधिक वाचा

Feature 3

मे मध्ये जेजे जगी जगले... प्रसिद्ध होणार !

अधिक वाचा

Feature 4

एअर इंडियाचा कलासंग्रह कुठं गेला ?

अधिक वाचा

Feature 5

ग्रंथाचं काम मार्गी लागलं..

अधिक वाचा
12345678910...