Enquire Now

Request A Quote

गायतोंडे : आणखी मोठा विक्रम ?


येत्या १२ तारखेला सॅफरॉन आर्ट तर्फे होणाऱ्या लिलावात 'गायतोंडे' यांच्या या पेंटिंगचा लिलाव होणार आहे. त्याची एस्टीमेटेड प्राईज २० ते ३० कोटीच्या घरात जाहीर केली गेली आहे. 'गायतोंडे' यांचं याआधी एक पेंटिंग २९ कोटी ३० लाख या किमतीला विकलं गेलं आहे. आता जर या पेंटिंगची एस्टीमेटेड प्राईज २० ते ३० कोटी धरण्यात आली असेल ( कोण म्हणतं भारतात मंदी आहे ? ) तर या पेंटिंगमुळे 'गायतोंडे' यांच्या नावावर आणखी एक विक्रम लिहिला जाणार आहे हे निश्चित.

हे पेंटिंग 'गायतोंडे' यांचंच आहे हे ठरवण्यासाठी हल्ली गायतोंडे यांच्यावरील प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाचा आधार घेतला जातो.( जरी ते डल्ला मारून घेतले असले किंवा उचलेगिरी करून घेतले असले तरी ) अर्थात, हे ग्रंथ इंगजीत प्रसिद्ध झालेले असतात हे वेगळं सांगायला नको. भारतीय भाषा दुय्यम मानण्याची किंवा " व्हर्नाक्युलर " मानण्याची इंग्रजांनी लावून दिलेली सवय अजूनही काही ' भारतीय महाजन ' विसरलेले नाहीत. विशेषतः कलाक्षेत्रात हे अनुभव सर्रास येत असतात. यासाठी दांडगा अभ्यास करावा लागतो, किंवा एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यावा लागतो. हे संबंधितांच्या ध्यानीमनी देखील नसतं. उचलेगिरीला सामाजिक मान्यता मिळू लागली की हे असे घडायचे. 

उदाहरण द्यायचं झालं तर 'गायतोंडे' यांच्या वरील चित्राचं देता येईल. हे चित्रं पाहिल्यापासून मला सतत आठवत होतं की मी हे चित्रं आधी कुठेतरी पाहिलं आहे. माझ्याकडचे जुने कॅटलॉग पाहिल्यावर मला ते चित्र सापडलंच. १९८५ साली Richadson Hindustan या कंपनीनं आपल्या संग्रहातील चित्रांचं एक भलं मोठं प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये Thirty Indian Artist या शीर्षकानं भरवलं होत. त्यात हे चित्रं प्रदर्शित झालं होत. सदर प्रदर्शनात जेमिनी रॉय, हुसेन, रझा, सूझा, तय्यब, अकबर, स्वामीनाथन, भूपेन, बरवे यांच्यापासून ते सुधीर पटवर्धन यांच्या पर्यंतच्या ३० चित्रकारांची ७० चित्रं प्रदर्शित केली होती. त्यावेळी एक छोटासा कॅटलॉग देखील प्रसिद्ध केला होता. ज्याच्यासाठी प्रख्यात कवी आणि कलासमीक्षक निस्सीम इझिकेल यांनी लेखन केलं होत. हा एवढा भक्कम पुरावा असताना सदर लिलाव कंपनीने कुण्या सोम्या गोम्यांना कोट करून गायतोंडे यांच्या चित्रांचा हवाला देणं हे केवळ हास्यास्पदच आहे. इंग्रज राज्य करून गेले पण त्यांचा प्रभाव मात्र आपल्याकडच्या काहींना अद्याप पुसता आलेला नाही हेच खरं ! 

[ हे वाचल्यावर 'गायतोंडे' यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा झाली तर गायतोंडे यांच्यावरचा 'चिन्ह'चा ग्रंथ अवश्य वाचा. 'नग्नता : चित्रातली आणि मनातली' अंकाचे ( ७५० + ५० टपाल खर्च ) रुपये ८०० भरल्यास 'गायतोंडे' ग्रंथाची ५०० रुपये किंमतीची जनावृत्ती भेट दिली जाते. 90040 34903 या व्हाट्सअप नंबरवर Chinha 2 हा मेसेज पाठवा आणि अंक व ग्रंथ घरपोच मिळवा.]
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...