Enquire Now

Request A Quote

प्रमोद सहत्रबुद्धे : इंजिनियर चित्रकार

अनेकांना आपण चित्रकार व्हावसं वाटत असत. पण फार थोड्यानाचं तो धाडसी निर्णय घेणं जमतं. असे निर्णय आधी घेतलेले नंतर आपली चूक सुधारतात. व्यवसायानं इंजिनीअर असलेले प्रमोद सहस्रबुद्धे असंच एक, धडपड व्यक्तिमत्व. त्यांच्या चित्रांचं पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालं आहे. त्या निमित्तानं त्यांच्याशी केलेली ही बातचीत !


हे विश्वची माझे घर आपण म्हणतो, पण आपलं हे घर कसं दिसतं, कसं असतं हे प्रश्न कदाचित अनेकांना पडत असतील पण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची धडपड मात्र अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक करतात...असे लोक एक तर शास्त्रज्ञ असतात किंवा मग कलाकार ! ज्यांना अंतराळात न जाता या विश्वाची कल्पना करता येते म्हणूनच असे कलावंत असतात  ....आणि प्रमोद सहत्रबुद्धे यांच्यासारख्या विज्ञानाची पार्श्वभूमी असणाऱ्या चित्रकाराच्या कुंचल्यातून  जन्माला येतं.....'व्हिस्टा-ए-सेलेस्टी
या '...... स्वर्गातून दिसणारं विश्वरूप किंवा मग स्वर्गातून दिसणारं पृथ्वीचं रूप म्हणूया! 

ही कल्पना श्री.प्रमोद यांना कशी सुचली आणि ती प्रत्यक्षात कशी उतरली? याबद्दल बोलताना ते म्हणतात, 
'साधारण चार/पाच वर्षांपूर्वी अल बरूनी यांचं भारतावरचं पुस्तक वाचत होतो.  भारतावरच्या प्रवासावरचं ११व्या शतकातलं त्याचं पुस्तक आहे. त्या पुस्तकात मेरू पर्वताचा उल्लेख आहे. हा प्रचंड महाकाय पर्वत आहे असं म्हणतात पण तो कोणालाच दिसत नाही म्हणजे तो नक्की आहे किंवा नाही....हाच त्यानं आक्षेप घेतला. मग नक्की मेरू पर्वत आहे की नाही यावर जेव्हा अधिक वाचन  केलं तेव्हा मेरू पर्वत हा पृथ्वीच्या  खाली असल्याचे उल्लेख सापडले. मेरू म्हणजे अक्ष....विश्वाचा अक्ष समजला जातो . हे जेव्हा वाचनात आलं तेव्हा या विषयावर चित्र काढावं असं वाटलं . '

एका चित्राची मालिका कशी झाली?
'पहिलं चित्र काढलं आणि त्यावरून हे विश्व कसं दिसत असेल याची कल्पना केली आणि आपोआप चित्र सुचत गेली. अर्थात यात चित्रकाराच्या लिबर्टीज घेतल्या आहेत, जसं  मेरू पर्वत हा विश्वाच्या अंतापर्यंत असेल ही कल्पना माझी. अशा कल्पनांना धरून मग बिग बॅन म्हणजेच महास्फोट, हबल बबल म्हणजेच विश्व हे फुग्यासारखं आहे, क्वांटम मेकँनिक्स म्हणजेच हे विश्व अनेक जगाचं बनलेलं आहे, ज्यात मी अनेक ग्लोब दाखवले....अशी चित्र मालिका तयार होत गेली. '

किती वर्ष लागली ही मालिका लोकांपुढे आणायला?
'साधारण चार पाच वर्षात ३५/४० चित्रं तयार झाल्यावर वाटलं आता लोकांपुढे आणावीत म्हणून जहांगीरमध्ये प्रदर्शन लावलं ज्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. '

प्रतिसाद हा प्रतिक्रियांच्या रूपात होता की विक्रीच्या?
'दोन्ही स्वरूपात. काही चित्र विकली गेली पण मुख्य आल्या त्या लोकांच्या प्रतिक्रिया. मी चित्रांचं वर्णनही लिहिलं होतं ते लोकांना आवडल्याचं कित्येकांनी सांगितलं. लिखित स्वरूपातल्या प्रतिक्रियाही आहेत. '

मग या विषयावर पुस्तक करायची कल्पना कशी सुचली?
' लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातच या विषयावर पुस्तक करा असंही सुचवलं होतं. मग त्या दृष्टीनं काम करू लागलो आणि पुस्तकं प्रत्यक्षात उतरलं.  '

इतरही चित्रांवरचं पुस्तक करावं अशी काही कल्पना आहे?
'अजून तरी नाही.  तसंही माझ्याकडे काही फार मोठा संग्रह नाही गेल्या साधारण दहा/बारा वर्षांपासून मी चित्र काढतो आहे. व्यवसायानं  मी इंजिनियर आहे. स्ट्रक्चरल इंजिनीअर. साधारण ३०/३२ वर्ष मी या क्षेत्रात काम केलं. खूप नावाजलेल्या इमारतींसाठी काम केलं आहे. हळूहळू त्यातून अंग काढत गेलो आणि चित्रकलेचा छंद जोपासू लागलो. '

याची सुरवात कशी झाली?
' सुरवात झाली ती विज्ञानाच्या अंगानं पंचमहाभूत यावर सिरीज केली. आपल्या पुराणात पंचकन्या सांगितल्या आहेत. त्यावरही सिरीज केली. माझ्या सिरीजमधे पाच नाहीतर सहा कन्या आहेत. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी आणि सहावी कुंती! या सहा जणीवर अठरा चित्रं आहेत. '

त्यांची कोणती रूप दाखवली आहेत? की सिम्बॉलिक..... प्रतीकात्मक..... आहेत? 
'फिगरेटीव्हच आहेत पण माझा कल अब्स्ट्रॅक्टकडे असल्यानं डिस्ट्रॉरटेड फिगर्स आहेत यात. या सहा कन्यावर झालेला अन्याय चित्रातून मांडला आहे. कुंती कुमारी माता झाली म्हणून तिला लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागली पण त्याला जबाबदार असणाऱ्या दुर्वास ऋषीना कोणीच विचारलं नाही..... अर्जुनानं द्रौपदीला जिकून आणलं, कुंती म्हणाली म्हणून पाच जणांनी वाटून घेतली पण तिला कोणीच विचारलं नाही तिला काय हवय...सीतेला भूमी पोटात घेते हे चित्र काढलं कारण सीतेला सोडून दिल्यावर राम तिच्याकडे जातो तो तिच्यासाठी नाही तर लव-कुशासाठी..... या अशा कल्पना घेऊन ही सिरीज केली आहे. '

इंजिनिअरिंग आणि चित्रकला यात कधी समन्वय साधावासा नाही वाटलं?
' मी ज्या विषयात इंजिनियरिंग केलंय थेट त्या विषयाशी संबंध नसला तरी या विषयात असणाऱ्या गती मुले मी पिगमेंटपासून स्वतः रंग तयार करतो. या विषयावरचं वर्कशॉप ही घेतलं आहे. '

पुढचा काही विचार आहे का?
'मॉलिक्युलस ऑफ लाईफ या विषयावर काम करतोय. एखाद/दुसरं काम केलंय पण सीरिजच्या रूपात अजून तरी या कामानं आकार घेतलेला नाही. येईल जुळून लवकरच अशी अपेक्षा आहे. '

मनीषा सोमण

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...