Enquire Now

Request A Quote

शेतकरी, कलाकार आणि मार्केटिंग


'चिन्ह'च्या व्हाट्सअप ग्रुपवर चित्रकार सभासदांच्या सतत चर्चा सुरु असतात. अशाच एका चर्चेत पुण्यातील एक उपयोजित चित्रकार 'राजेश केदारे' यांनी अचानकच शेतकरी, कलाकार आणि मार्केटिंग असा विचार विस्तार करून आपले विचार मांडले. त्यातलं वेगळेपण लक्षात घेऊन 'चिन्ह'नं त्यांना त्या विचारांना लेख स्वरूप देण्यास सुचवलं. त्यांनीही तत्परतेने जे लिहून पाठवलं तोच हा लेख. वाचकांनी यावर आपले विचार अवश्य मांडावेत. 


शेतकरी आणि कलाकार यामध्ये मला खूप साम्य वाटतंशेती पिकवणं ही सृजनशीलताच की!

परंतुबघितलं तर दोघेही पैसा कमावण्याच्या बाबतीत उपेक्षितच. याची कारणं आपण विचार करून लक्षात घेतली पाहिजेतआपण आपला माल पिकवतोचित्र काढतो ते काय दर्जाचे आहेतआपल्या मालाचंचित्रांचं मार्केट काय आहेआपलं पीक चित्र किती मोलाचं आहेआपल्या पिकाची चित्राची आपण मार्केटिंग करतो काबरेच शेतकरीकलाकार आज स्मार्ट पद्धतीने पैसा आणि नावं कमवत आहेत... ते कसं? या अशा बऱ्याच गोष्टींचा विचार आपण करायला हवा.

इतिहास बघितला तर जे चित्रकार स्वमग्न होते त्यांना त्यांच्या हयातीत कधीच किंमत मिळाली नाहीआणि ज्यांनी आपल्या चित्रांचं चांगलं मार्केटिंग केलं त्यांनी नाव आणि पैसा दोन्ही कमावलं.

पैसा आणि नाव आपल्याला कमवायचं असेल तर आपल्याला आपल्या दर्जेदार प्रॉडक्टचं (चित्रांचंउत्तम मार्केटिंग करतायायला हवं असं माझं स्पष्ट मत आहे.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 'काळ'. आपण काळाच्या पुढे आहोतकाकाळाच्यापुढे सोडाआपण सुसंगत तरी आहोत का, विचार सगळ्यांनीच केला पाहिजेजागतिकी करणाचाकाळ कधीचाच मागे गेला आहेआताचा काळ AI चा आहे, याची माहिती कलाकारांना असणं मला महत्वाचं वाटतं.

मागेवळून बघितलं तर लक्षात येईल की जे ख्यातनाम चित्रकार होऊन गेले ते सर्वच काळाच्या पुढे होतेम्हणून आज आपल्याला ते महान वाटतातत्यांची शैलीविषय काळाच्या पुढे होते... वर्तमानाशी झगडून पुढे जात होतेम्हणून ते वेगळे होते... त्यांच्याशैलीविषयामुळे त्यांचं नाव आज आपण घेतो.

आजहीआपण इतिहासातील चित्रकारांची नावे घेतोपुस्तकी पाठ केल्यासारखं त्यांच्याविषयी बोलतोआजच्या काळातील किती चित्रकारांची नावे आपल्याला माहीत असतात?

आजचेबरेच चित्रकार मागच्या काळातच अडकलेले दिसतातत्यामुळे सगळी चित्रं सारखीवाटायला लागतात... वेगळेपण कशातच दिसत नाहीमगसुरू होतो कॉपीचा गोंधळहे चित्र याच कॉपी आहेहीशैली यांची कॉपी आहे... अशी ओरड सुरू होतेखरंतर बहुतांशी ती चित्र कॉपी नसतात तर ती एकाच काळातील असल्यामुळे सारखीच वाटायलालागतात.

याचउत्तम उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियन चित्रकार  AnthonyLister (जन्म 1979. बरेसचेचित्रकार स्टुडिओमध्ये रमत असताना या पठ्ठ्याने मात्र सतराव्या वर्षीच ऑस्ट्रेलियातल्या वेगवेगळ्या शहरात जाऊन भिंतीवर चित्रं काढायला सुरुवात केलीशैली वेगळीविषय वेगळे ह्यामुळे अल्पावधीतच तो नावारूपाला आलात्यांचं म्हणणं की चित्रकला ही फक्त गॅलरीवा एका विशिष्ट वर्गा पुरती मर्यादित नाहीयेती सर्वसामान्यांसाठी असावीत्यामुळे तो सार्वजनिक ठिकाणी चित्र काढायचासार्वजनिक ठिकाणाचं नुकसान केल्यामुळे ऑस्ट्रेलियात त्याच्यावर खटला चालवला गेलात्याला शिक्षाही झालीत्याच्या समर्थनात तिथं एक चळवळही उभी राहिलीनंतर त्याच्या चित्रांची अमेरिका, फ्रान्स अशा वेगवेगळ्या देशात बरीच प्रदर्शने झालीतआज तो एक internationally'most renowned contemporary artist' म्हणून ओळखला जातोत्याचं वय किती आहे फक्त 40! पण तो काळाच्या पुढे होता आणि चित्रांचं मार्केटिंग जमणं न जमणं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध अमेरिकन चित्रकार Margaret Keane.

1958 च्या काळातली ही गोष्ट आहेलहान मुलं हा तिच्या चित्रांचा विषयमोठया डोळ्यांची चित्र... विशिष्ट शैली यामुळे तिच्याचित्रांत वेगळंच नावीन्य होतंपरंतु आपल्या सारखंच रोजच्या आयुष्यातला झगडा तिलाही होतातिला कधीच तिच्या चित्रांचं मार्केटिंग जमलं नाहीआणि हेच हेरलं Walter Keane नावाच्या माणसानेचित्रकलेची आवड आणि उत्तम जाण असलेला हा रिअल इस्टेट व्यावसायिक. यानं तिच्याशी गोड बोलून लग्न केलंगोडी गुलाबीनं तिलापटवून तिच्या चित्रांवर  Keane अशी सही करवून प्रदर्शने भरवायला सुरुवात केलीतू घरी बसून फक्त चित्र काढत रहा मी तीविकतो आणि आपण खूप पैसे कमवू असं तिला तो सांगायचाअल्पावधीतच त्या चित्रांच्या विशिष्ट शैली आणि Keane च्या मार्केटींगमुळे अमेरिकेत त्या चित्रांनी प्रचंड धुमाकूळ घातला आणि नाव झालं ते Walter Keane याचंप्रचंड पैसा आणि प्रसिद्धीमूळे Walter वेडा झाला होता.

बिचाऱ्या Margaret लातो बंद घरात चित्र काढायला सांगायचा तिला घराबाहेर जाऊ द्यायचा नाहीआणितो बाहेर प्रदर्शन लावून पैसा आणि नाव कमवायचास्वमग्न असणाऱ्या  Margaret ला हे कळायला बराच उशीर लागला.  तोपर्यंत Walter Keane जगप्रसिद्ध झाला होता.

नंतरही गोष्ट कोर्टात गेली आणि बराच गोंधळ झालाकोर्टात न्यायाधीशाच्या समोर दोघांना त्या शैलीचं चित्र काढायला सांगितलं गेलं आणि मग Walter उघडा पडला.

सांगण्याचं तात्पर्य म्हणजे कुठल्याही कलाकारालामग तो चित्रकार असो किंवा अजून कोणी त्याला काळाच्या पुढे राहून आपल्या कलेचं उत्तम मार्केटिंग जमलं पाहिजेतरच तो पैसा आणि प्रसिद्धी कमावू शकेल.


राजेश केदारे

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...