Enquire Now

Request A Quote

दोन शिल्पकार, दोन संस्था, एक ध्येय !

संस्थेचे मुख्य पद हे नेहमी त्या विषयाच्या तज्ज्ञाला दिले पाहिजे हा आदर्शवाद नसून काळाची गरज आहे हे काही वेळा उशिरा लक्षात येते. अर्थात काही संस्था त्याला अपवाद असूच शकतात. अलीकडे अशा दोन दिग्ग्ज तज्ज्ञाची भेट झाली. निमित्त होते ललित कला अकॅडेमीच्या नॅशनल कॅम्पच, "उत्तम पाचारणे" आणि "अदवेता गडनायक" !! दोघेही शिल्पकार, दोघेही अनेक पारितोषिकांचे आणि सन्मानाचे मानकरी. उत्तम पाचारणे ललित कलाअकॅडेमीचे अध्यक्ष तर गडनायक नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे डायरेक्टर. ललित कलाअकॅडेमी १९५४ साली स्थापन झाली तर NGMA ची स्थापना १९४९झाली. देश स्वतंत्र झाल्या नंतर कलेच्या विश्वात झालेल्या या दोन मोठया घडामोडी म्हणता येतील. दोन्ही संस्था भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागात येतात. त्यामुळेत्या त्या विभागासाठी होणाऱ्या नेमणुका सरकार तर्फे होत असतात.


ललित कला अकॅडेमीच्या आपल्या उदघाटन पर भाषणात मौलाना आझाद यांनी म्हटले होते,

" अकॅडेमीने आपल्या गौरवशाली कला परंपरेचेजतन केले पाहिजे आणि त्याला आधुनिक कलेचे साज लावले पाहिजेत. त्या सोबतच कला आणिसंस्कृती या विषयीचे सर्व सामान्यांचे ज्ञान आणि रुची यावर भर दिला पाहिजे."हेच मौलाना आझाद NGMA च्या वेळीहि आपली अशीच स्पष्ट भूमिका असल्याचे नमूद करतात. दोन्ही संस्था कलेच्या संवर्धन आणि प्रोत्साहन यासाठी स्थापन झाल्या आहेत. विविध उपक्रमांतून या दोन्ही संस्था आजतागायत कार्यरत आहेत. नॅशनलगॅलरीचे मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि मुंबई आणि बंगुळुरु येथे त्याचे विभाग आहेत.ललित कला अकॅडेमी दिल्ली, चेन्नई, भुवनेश्वर,कोलकत्ता, लखनौ, सिमला,पाटणा, त्रिपुरा येथे कार्यरत आहे.एक्सहिबिशन्स, कार्यशाळा, चर्चासत्रे,कला विषयक प्रकाशने इत्यादी उपक्रम NGMA तर्फेराबवले जातात तर ललित कलेचा आवाका बराच मोठा आहे ज्यात या बरोबर अनेक पुरस्कार,पारितोषिके, स्कॉलरशिप्स, कॅम्प्स, इत्यादी अनेक गोष्टीं केल्या जातात.


सर जे. जी कला महाविद्यालयात ललित कला अकॅडेमीचा पहिला 'मल्टि मिडीयम कॅम्प' २२ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत ५५ कलावन्तांच्या समवेत झाला. या निमित्ताने प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे पाचारणे आणि गडनायक यांच्या सोबत झालेली बातचीत. मुळातच या गोष्टीकडे लक्ष गेलं, की हे दोघे ही शिल्पकार, दोघेही छोट्या शहरातून आलेले, दोघेही कलेशी बांधलेले आणि मनस्वी कलाकार. अनेक घटनांमुळे या दोन्ही संस्थेवर आलेली कलाकारांची थोडीशी नाराजी या"शिल्प-योगा" मुळे झटकली जाऊ शकेल अशी आशा.... एकजूट असावी

याविषयी दोघांचे ठाम मत आहे. कलाकारांनी एकत्रयेऊन पुढे जाणे अपेक्षित आहे असा या दोघांनाही सूर होता. दोघांनींही आपण जास्तीत जास्त प्रयत्न करत राहू या एकजुटीसाठी असा विश्वास दाखवला. अनेक उपक्रम करण्याविषयी पाचारणे अतिशय उत्साहाने बोलत होते आणि आगामी ललित कला केंद्र मुंबईत येण्यासाठीलागेल ते सर्व काम करण्याच्या तयारीत होते. अनेक वर्षांनी ललित कलाचे वार्षिक प्रदर्शन मुंबईत भरले आहे आणि त्याला NGMA ने छान साथ हीदिली आहे. असा संयोग व्हावा ही अनेक दशकांची मनोकामना कलाकारांच्या बोलण्यातून जाणवत होती. आज ती प्रत्यक्षात आली आहे. आगामी अशा अनेक उपक्रमांमध्ये या दोन्ही संस्थांनी एकत्रित पणे काम केल्याचा फायदा कलाकारांना आणि कला रसिकांना नक्कीच होणार यात शंका नाही.


मंजिरी ठाकूर

Top Features

 

Feature 1

जीव वाचवणारे "गोडसे"

अधिक वाचा

Feature 2

आपल्याला ठाऊक नसलेलं...

अधिक वाचा

Feature 3

इथं "जेजे स्कूल" होतं !

अधिक वाचा

Feature 4

धोंड मास्तर आणि रापणीतून सुटलेलं वगैरे...

अधिक वाचा

Feature 5

रंगांधळा चित्रकार ???

अधिक वाचा
12345678