Enquire Now

Request A Quote

મારું નામ ચંદ્રશેખર પાટીલ છે !

चित्रकार चंद्रशेखर पाटील यांचा परिचय करून दिला तो आमच्या नितीन कुळकर्णी या पंढरपूरकर मित्राने. विषय निघाला होता प्रख्यात लेखक आणि वास्तूविशारद माधव आचवल यांचा. त्यांचं बडोद्यातलं घर, त्यांनी तयार केलेल्या इमारती वगैरे वगैरे. पंढरपुरात राहून अख्ख्या भारतातल्या विविध भाषिक चित्रकारांशी मैत्री करणाऱ्या नितीननं अभावितपणे चंद्रशेखर पाटील यांचं नाव घेतलं ते माधव आचवल यांच्यावरील फिल्म संदर्भात. नितीन कुळकर्णी म्हणाले चंद्रशेखर पाटील हे त्यांच्यावर फिल्म करत आहेत. माझं औत्सुक्य जागं झालं. 

पाटलांना फोन केला तर ते म्हणाले, होय ! आचवल सरांवर फिल्म करतोय. लवकरच पूर्ण होईल ती. पण कोरोनाच्या लॉकडाऊननं सारंच गणित उलटं पालटं झालं. एके दिवशी त्यांच्यासोबत फोनवर गप्पा झाल्या. त्यात ते म्हणाले, आम्ही मूळचे धुळ्याकडच्या शिरपूरजवळचे. ७०च्या दशकात माझे वडील गुजरातेत आले आणि इथंच स्थायिक झाले. माझा जन्मही इथलाच. इथल्याच सयाजीराव युनिव्हर्सिटीमध्ये मी चित्रकलेच्या पदव्या घेतल्या. मला संग्रहालय शास्त्रामध्ये रस होता, तसेच चित्रसंवर्धन या विषयाचा देखील अभ्यास करायचा होता. त्यामुळे आधी मुंबई गाठली मग लखनौ. 

नॅशनल आणि ललित कला स्कॉलरशिप मिळवणाऱ्या पाटील यांनी नंतर मग संग्रहालयशास्त्र आणि चित्रसंवर्धन याच क्षेत्रात उडी घेतली. भारतातलं कदाचित एकही म्युझियम नसेल की जेथे पाटील यांनी काम केलेलं नाही. विविध कलावस्तू, शिल्पं, चित्रं यांच्या संवर्धनासोबतच पाटील यांनी टॅक्सीडर्मी या क्षेत्रातही मोठं काम केलं. आजपर्यंत त्यांनी दहा - साडेदहा पेक्षा जास्त पशुपक्षी, प्राणी यांचं जतन केलं आहे. ते सांगत होते, सर्वात मोठं काम केलं ते व्हेल माशाचं, ५० फूट लांबीचा तो व्हेल त्यांनीच जतन केला आहे. बडोद्यातही त्यांनी मोठं काम केलंय. विशेषतः सयाजीराव वस्तुसंग्रहालयासाठी त्यांनी बरच काम केलं आहे ज्यात राजा रविवर्मा यांच्या चित्रांचाही समावेश आहे. मूळ महाराष्ट्रातला हा कलावंत आता गुजरातच्या संस्कृतीत संपूर्णपणे मिसळून गेला आहे. खान्देशी माणसं चेहऱ्यावरून आणि त्वचेवरून सहज ओळखता येतात, पण यांची चेहरेपट्टी मात्र अगदी गुर्जर वाटावी इतकी बडोद्यात मिसळून गेली आहे. त्यांची चित्रं, त्यांची चित्रसंवर्धनाची कामं, वस्तुसंग्रहालयासाठी केलेली कामं या संदर्भात बोलण्यासाठी ते येत्या शनिवारी 'गच्चीवरील गप्पां'मध्ये सहभागी होणार आहेत. ऐकायला, पाहायला विसरू नका !
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

बाबरी मशीद दंगल आणि आर्टिस्ट कॅम्प !

अधिक वाचा

Feature 2

મારું નામ ચંદ્રશેખર પાટીલ છે !

अधिक वाचा

Feature 3

स्वायत्तता की कला विद्यापीठ ?

अधिक वाचा

Feature 4

बाल मन...कला धोरण...आणि कला अभ्यासक्रम !

अधिक वाचा

Feature 5

एक हट्टी मुलगी !

अधिक वाचा
12345678910...