Enquire Now

Request A Quote

गायतोंडे जन्मशताब्दी वर्ष ?

२ नोव्हेंबर १९२४ रोजी चित्रकार वासुदेव सांतू गायतोंडे यांचा नागपुरात जन्म झाला. आता २०२१ साल चालू आहे आणखीन बरोबर तीन वर्षानं चित्रकार गायतोंडे यांचं जन्मशताब्दी वर्ष 'साजरं होईल' असं आपलं मी अगदी सहजपणे सवयीनं लिहून गेलो. 

खरं तर कोण करणार आहे हे सगळं ? केंद्र सरकार ? महाराष्ट्र सरकार ? गोवा सरकार ? ललित कला अकॅडमी ? महाराष्ट्र कला अकॅडमी ? का एखादी आर्ट सोसायटी ? या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. तुमच्याकडे देखील असेल असं काही मला वाटत नाही. 

राजकारणी, समाजकारणी, संगीत-नाटक-चित्रपट या क्षेत्रातील कलावंत या साऱ्यांची जन्मशताब्दी वर्ष सरकार किंवा सरकार पुरस्कृत संस्था किंवा कला संस्था मोठ्या उत्सहाने साजऱ्या करतात. पण एखाद्या चित्रकाराची जन्मशताब्दी अशी साजरी केल्याचं कोणी ऐकलंय ? चित्रकार गायतोंडे यांनी अटकेपार कितीही झेंडे गाडले असले तरीही त्यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं जाईल असं मला काही वाटत नाही. 

जगलो वाचलो तर, 'चिन्ह'च ते मोठ्या उत्साहात साजरं करेल. ( जगलो वाचलो अशासाठी म्हणायचं कारण कोरोनानं जगण्या वाचण्याच्या साऱ्या सीमा रेषा अंधुक केल्या आहेत. राज्यकर्ते अजूनही तिसऱ्या लाटेची भीती दाखवत आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी महाराष्ट्राच्या गावात आणि शहरात जी प्रचंड गर्दी झाली होती तिची वृत्तपत्रातली छायाचित्र किंवा वाहिन्यांवरची दृश्य थरकाप उडवणारी होती. ) दरम्यानच्या काळात गायतोंडे यांच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी घडत आहेत. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं पॅरिस मधली एक मोठी प्रकाशन संस्था 'गायतोंडे' यांच्यावरच्या 'चिन्ह'च्या मराठी ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित करण्याची जुळवा जुळव करत असल्याच्या बातम्या आहेत. 

पहिल्या चित्रपटापासूनच वेगळे चित्रपट देणाऱ्या एका चित्रपट दिग्दर्शकाकडून   देखील गायतोंडे यांच्यावरच्या पूर्ण लांबीच्या हिंदी चित्रपटाची जुळवा जुळव होत असल्याच्या देखील बातम्या आहेत. या दोन्ही गोष्टी जर प्रत्यक्षात आल्या तर, गायतोंडे यांचं जन्मशताब्दी वर्ष खूप मोठ्या थाटामाटात होईल या विषयी माझ्या मनात तरी शंका नाही. 

जागतिक लिलावांमध्ये देखील गायतोंडे यांची चित्र मोठ्या किंमतीला विकली जात आहेत. जन्मशताब्दी वर्षात ती शंभर कोटी पर्यंत जाऊन धडकली तरी आश्चर्य वाटू नये असं या क्षेत्रातील जाणकार म्हणत आहेत. तसं जर झालं तर ते सोन्याहून पिवळंच ठरेल. पण आणखीन थोडी वाट पाहायला पाहिजे यात काही शंकाच नाही. 

आज कला क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या मंदीच्या कालखंडात देखील गायतोंडे यांची चित्र मोठ्या धडाक्यानं विकली जात आहेत. लिलावांमधल्या विक्रीचे आकडे आपल्याला कळतात पण खाजगी विक्रीचे तपशील सहसा बाहेर येत नसल्याने त्या बाबत निश्चित असं विधान करता येत नाही. पण एवढं मात्र ठामपणे सांगेन की, गेली अनेक वर्ष चित्र विक्रीच्या क्षेत्रात गायतोंडे यांची चित्रचं विक्रीच्या बाबतीत आघाडीवर आहेत. 

'चिन्ह'चा 'गायतोंडे' ग्रंथ प्रसिद्ध झाल्याला येत्या जानेवारीत ६ वर्ष पूर्ण होतील, या ग्रंथाची ३००० रुपये किंमतीची डिलक्स आवृत्ती आता जवळ जवळ संपत आली  आहे. स्वतःचा ग्रंथ संग्रह असणाऱ्या अस्सल वाचकांपैकी काहींनी अद्यापही या ग्रंथाची प्रत जर खरेदी केली नसेल तर त्यांनी ती त्वरित करावी कारण पुन्हा काही या ग्रंथाची आवृत्ती प्रसिद्ध करण्याच्या फंदात आम्ही पडणार नाही आहोत. या संदर्भातला सर्व तपशील फेसबुकच्या गायतोंडे पेजवर वेळोवेळी प्रसिद्ध झाला आहे तो पाहावा आणि त्वरित मागणी नोंदवावी. 'फंदात पडणार नाही आहोत' असे वर जे म्हटले आहे ते अशासाठी की, 'चिन्ह'नं आता पूर्णतः ऑनलाईन स्वरूप धारण केलं आहे. येत्या नव्या वर्षाच्या प्रारंभी 'चिन्ह' ऑनलाईन वृत्तपत्राच्या स्वरूपात प्रकाशित होणार आहे. साहजिकच जी प्रकाशनं उपलब्ध आहेत ती ३१ डिसेंबरच्या आत आम्ही संपवून टाकणार आहोत.

गायतोंडे डिलक्स आवृत्ती, गायतोंडे जनआवृत्ती, नग्नता तिसरी आवृत्ती आणि चित्रसूत्र इंग्रजी मराठी एवढी चारच प्रकाशनं आमच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. म्हणूनच ती ३१ डिसेंबरच्या आधी आम्ही संपवून टाकण्याच्या प्रयत्नांत आम्ही आहोत. या संदर्भातल्या सवलत योजना पुढील आठवड्यात जाहीर होतील ज्यांच्याकडे ही प्रकाशनं नसतील त्यांनी त्वरित या योजनांचा फायदा घ्यावा ही जाहीर विनंती आहे.  
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

बाबरी मशीद दंगल आणि आर्टिस्ट कॅम्प !

अधिक वाचा

Feature 2

મારું નામ ચંદ્રશેખર પાટીલ છે !

अधिक वाचा

Feature 3

स्वायत्तता की कला विद्यापीठ ?

अधिक वाचा

Feature 4

बाल मन...कला धोरण...आणि कला अभ्यासक्रम !

अधिक वाचा

Feature 5

एक हट्टी मुलगी !

अधिक वाचा
12345678910...