Enquire Now

Request A Quote

पितृपक्षातच कावळा बसायला आणि फांदी तुटायला !

'कलाशिक्षण महाचर्चे'च्या दुसऱ्या सत्रानं कलाशिक्षण वर्तुळात मोठी धमाल उडवून दिली आहे. सहसा मत प्रदर्शन न करणारे कलाशिक्षक देखील आता बोलू लागले आहेत. विचार व्यक्त करू लागले आहेत. मुख्य म्हणजे 'चिन्ह'च्या संबंधितांशी संपर्क साधू लागले आहेत. फेसबुकवर, इन्स्टावर किंवा व्हॉट्सऍपवर 'चिन्ह'ला येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पण याही पेक्षा शिरीष मिठबावकरांशी संपर्क साधणाऱ्या या क्षेत्रातल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक जण काहीना काहीतरी तक्रार किंवा निरीक्षण घेऊन येतोय. त्या साऱ्यांचं करायचं तरी काय? या प्रश्नानं आणि सारे भेलकांडून गेलो आहोत. 

दर पंधरावड्याने हा कार्यक्रम करतोय खरे, पण 'गच्चीवरील गप्पां'सारखा हाही कार्यक्रम दर आठवड्याला करावा लागणार की काय असे वाटू लागले आहे. 'कलाशिक्षण महाचर्चे'मुळेसुस्त सरकारी यंत्रणा देखील हालचाल करू लागली आहे. आर्ट टीचर डिप्लोमाच्या अभ्यासक्रमात बदल करण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. महाचर्चेतल्या कार्यक्रमामुळे हे सारे घडले की काय ? असा प्रश्न कुणीतरी उपस्थित केला. तर त्यांना दुसऱ्यांनी उत्तर दिलं, नाही नाही, तसे काही नाही. बदल करण्याची प्रक्रिया चालूच होती, कोरोनामुळे ती काहीशी खंडित झाली होती वगैरे. त्यावर तिसरा म्हणाला, पण हे सारे आत्ताच का घडले ? आधी का नाही घडले ? त्यावर पहिला म्हणाला, ऐन पितृपक्षात कावळा बसायला आणि फांदी मोडायला तसे काहीसे हे झाले. त्यावर दुसरा म्हणाला, काही का होईना, बदल घडतोय हे काय थोडे झाले ? 

'चिन्ह'नं यु ट्यूबवर या चर्चा घडवून आणण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय प्रभावी ठरला आहे. यु ट्यूबची पोच महाप्रचंड आहे. कार्यक्रमाचा व्हिडीओ पोस्ट केला की अक्षरशः क्षणार्धात ती घराघरातच नव्हे तर हाताहातात ( पक्षी : मोबाईलमध्ये ) जाऊन पोहोचते. साहजिकच त्याचा परिणाम व्यापक होत चालला आहे. कलासंचालनालय आणि तंत्रशिक्षण खात्यातील संबंधितांपर्यंत देखील हे कार्यक्रम पोहोचत आहेत याचा निश्चितच आनंद आहे. 

कलाशिक्षण क्षेत्राशी संबंधितांचा दट्ट्या असाच जर सरकारी यंत्रणेवर बसत राहिला तर सुधारणेची अपेक्षा करायला हरकत नाही. तशी लक्षणं देखील दिसू लागली आहेत हे मोकळेपणाने सांगावेसे वाटते. यात जर अशीच वाढ होत राहिली ( यु ट्यूबचं एक बरंय, कुठला व्हिडीओ किती लोकांनी पाहिला याची नोंद सातत्याने व्हिडीओ खाली होत असते ) तर कलाशिक्षण क्षेत्रातले हे प्रश्न सुटायला फार काळ लागणार नाही. अर्थात गुंताडा भयंकर आहे. गेल्या ३० वर्षात तंत्रशिक्षण खाते आणि कला संचालनालयातल्या अधिकाऱ्यांनी जो सारा विचका करून टाकला आहे त्याचा निपटारा आधी करावा लागणार आहे. जे कुणी हा प्रश्न सोडवू पाहत आहेत त्यांच्यापर्यंत हे सारे पोहोचेल का ? 

असो. कलाशिक्षण महाचर्चेचा दुसरा कार्यक्रम ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी म्हणजे १४ तारखेला आहे. कलाशिक्षण क्षेत्रातले सुधाकर चव्हाण (पुणे), नीलिमा कढे (ठाणे) आणि सुरेंद्र जगताप (मुंबई) हे यावेळचे निमंत्रित आहेत आणि विषय आहे "२०२२ साली नवीन अभ्यासक्रम बदलल्यावर महाराष्ट्राच्या कलाशिक्षण परंपरेचे काय होणार ?" आणि त्यांना बोलतं करणार आहेत शिरीष मिठबावकर आणि 'चिन्ह'चे संपादक सतीश नाईक. याच कार्यक्रमात शिरीष मिठबावकर महाराष्ट्रातील चार शासकीय कलाशिक्षण संस्थांचा लेखाजोखा मांडणार आहेत. जो अनेकांना अस्वस्थ करून जाईल याविषयी आमच्या मनात शंका नाही. तेव्हा पाहायला विसरू नका !
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

सातासमुद्रा पलीकडून प्रतिक्रिया !

अधिक वाचा

Feature 2

येत्या गप्पा संजय सावंत यांच्याशी !

अधिक वाचा

Feature 3

जहांगीर कधी सुरु होणार ?

अधिक वाचा

Feature 4

असं जगणं असतं राजा !

अधिक वाचा

Feature 5

२०२२ नंतर काय ? आणि जे जे अस्तित्वात राहील ?

अधिक वाचा
12345678910...