Enquire Now

Request A Quote

भटके चित्रकार !

माणिक जेजेमध्ये मला एक वर्ष ज्युनियर होती. बहुदा अतुल डोडियाच्या वर्गात वगैरे. डोंबिवलीसारख्या शहरात राहणाऱ्या, अतिशय सरळमार्गी असलेल्या, नाकासमोर चालणाऱ्या माणिककडून जेजेमध्ये असताना कुणीच काही अपेक्षा केल्या नसतील. मी ही काही केल्या नव्हत्या. पण नंतर मात्र तिच्यात जे जे बदल होत गेले ते साऱ्यांनाच स्तिमित करून गेले असतील यात शंकाच नाही. 

 तेव्हा राज जेजेमध्येच शिकत होता, पण अप्लाइड आर्टमध्ये. नंतर तो स्कूल ऑफ आर्टमध्ये आला मेटल क्राफ्ट शिकण्यासाठी. तो खूप धडपड्या, उत्साही, चळवळ्या वगैरे होता, आताही आहे. साहजिकच त्याची माझी गाठभेट वरचेवर होई. गप्पागोष्टी, चहापाणी होई. 
तो अप्लाइड आर्ट म्हणजे कमर्शियल आर्ट शिकला होता. त्याचवेळी त्याला सिरॅमिक देखील करायचं होतं, पण त्याला बहुदा प्रवेश मिळाला नसावा. मग तो गेला शिकायला मेटल क्राफ्टला. तोपर्यंत मी जेजेबाहेर पडलो होतो, पण गॅलरीशी सतत संपर्क असल्यामुळे त्याची माझी भेट वरचेवर होई. याच काळात कधीतरी त्यानं आणि माणिकनं लग्न केलं. 

माणिक अतिशय कष्टाळू होती, खूप मेहनतीने शिक्षण घेत होती. काम देखील अत्यंत प्रामाणिकपणे करायची. तिला बक्षिसं वगैरे मिळणं चालूच होतं. चरितार्थ काय पेंटिंगवर चालणं शक्यच नव्हतं, साहजिकच तिनं मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये अध्यापक म्हणून नोकरी धरली. तिथूनच ती कधी तरी वसई स्कूल ऑफ आर्टला गेली आणि मग नंतर कधी तरी ठाणे स्कूल ऑफ आर्टला रुजू झाली. तिथूनच ती सेवानिवृत्त वगैरे झाली असावी. 

राजही तसाच. त्यानेही खूप नोकऱ्या केल्या असाव्यात. नाही पटलं की सोडून द्यायचं अशी जी काही टिपिकल कमर्शियल आर्टिस्ट लोकांची प्रवृत्ती असते तिला तो अपवाद नव्हता. त्यानंही खूप भटकंती केली. नोकऱ्यांमध्येच नाही तर कामामध्ये देखील, म्हणजे उदाहरणार्थ रेखाटनं करायची किंवा पेंटिंग करायचं किंवा मेटल क्राफ्टमध्ये काम करायचं किंवा नंतर सिरॅमिक काय किंवा टेराकोटामध्ये देखील तो काम करू लागला. मध्यंतरी त्यानं एक पुस्तक देखील प्रकाशित केलं होतं, फिल्म्स देखील त्याने खूप तयार केल्या. ( जिज्ञासूंनी त्या यु ट्यूबवर अवश्य पाहाव्यात ) 

माणिकची साथ लाभल्यावर तर मग काय, दोघांचीही या क्षेत्रातली मुशाफिरी खूप वाढली. आज काय दोघं इकडे गेली आहेत, उद्या काय दोघं तिकडे गेली आहेत, असं खूप काही ऐकायला मिळू लागलं. या दोघांची या क्षेत्रातली मुशाफिरी आणि भटकंती खरोखरच अफलातून आहे. अलीकडे कोरोना लॉकडाऊनच्या काळात राज लिहू देखील लागला आहे. अप्रतिम लिहितो आहे. १९७५ पासूनचा जेजेचा कालखंड आपल्या लेखणीद्वारे टिपताना त्यानं विलक्षण संवेदनशिलता दाखवली आहे. जे कलेशी संबंधित आहेत आणि फेसबुकवर आहेत त्यांनी हे लिखाण अवश्य वाचायला हवं. विशेषतः जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधला त्याचा कालखंड तो अतिशय जाणकारीने पेश करतो आहे. 

अलीकडंच त्यांनी लिहिलेली शांतीनिकेतनच्या दिवसांवरची लेखमाला देखील विशेष गाजली. त्याचं हे लेखन एखाद्या चांगल्या प्रकाशकानं पुस्तक रूपात प्रकाशित करायला हवं असं मला मनापासून वाटतं. अर्थात त्याचं पुस्तक करताना मात्र एखाद्या जाणकार संपादकांकडून त्यावर हात फिरवला जायला हवा. नाहीतर मात्र या क्षेत्रातल्या लोकांनी लिहिलेली अन्य पुस्तकं जशी दुर्लक्षित केली गेली तशी याची गत देखील होईल अशी मला भीती वाटते. तसे होऊ नये असे मला मनापासून वाटते म्हणूनच हे मी सुचवायचं धाडस करतो आहे. 

परवा फोनवर बोलताना राज सांगत होता, आता तो वाशिंदला राहतो. म्हणजे मध्य रेल्वेवर टिटवाळा, खडवली वगैरे स्टेशनच्या पुढलं स्टेशन. आता दोघं स्थिरावली आहेत आणि या दोघांबद्दल मला अतिशय कौतुक आहे. ज्या पद्धतीनं ही दोघं आजवरचं आयुष्य जगले आहेत त्याबद्दल मला अतिशय कुतूहल देखील आहे. आणि म्हणूनच 'गच्चीवरील गप्पां'मध्ये मी त्यांना आमंत्रित केलं आहे. दोन अतिशय वेगळी व्यक्तिमत्त्व या कार्यक्रमात बोलती होणार आहेत. ऐकायला विसरू नका. 

शनिवार दि. २ ऑक्टोबर २०२१ 
सायंकाळी ०५.३० वाजता 
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

सातासमुद्रा पलीकडून प्रतिक्रिया !

अधिक वाचा

Feature 2

येत्या गप्पा संजय सावंत यांच्याशी !

अधिक वाचा

Feature 3

जहांगीर कधी सुरु होणार ?

अधिक वाचा

Feature 4

असं जगणं असतं राजा !

अधिक वाचा

Feature 5

२०२२ नंतर काय ? आणि जे जे अस्तित्वात राहील ?

अधिक वाचा
12345678910...