Enquire Now

Request A Quote

आगीशी खेळ !

नागपूरच्या प्रा. सुनीती देव या 'गच्चीवरील गप्पां'च्या अगदी पहिल्या कार्यक्रमापासून चाहत्या आहेत. प्रत्येक कार्यक्रम त्या पाहतात आणि त्यावर प्रतिक्रिया देखील आवर्जून कळवतात. या कार्यक्रमाची पन्नाशी जवळ आली आहे हे त्यांनीच आमच्या निदर्शनास आणलं. या कार्यक्रमातील मुलाखती शब्दांकित व्हाव्या असं त्यांना मनापासून वाटलं आणि त्यातल्या काही शब्दांकित होण्यासाठी प्रयत्न आरंभले. त्यातली पहिली मुलाखत आहे स्वीटी जोशी यांची, ती सोबत देत आहोत.


‘गच्चीवरील गप्पां’मधीलस्वीटी जोशीशी ‘गप्पा’ हा एक वेगळा प्रयोग झाला. याअर्थानं की तिचा जहांगीर आर्ट गॅलरीत शो सुरु होता तेथूनच ती ‘गप्पां’मध्ये सामील झाली. सतीश नाईक यांनी कधीकोपरखळ्या मारीत मिश्किल तर कधी अतिशय गंभीर प्रश्न विचारलेत. स्वीटीनंहीकधी प्रश्नानुरुप, कधी खेळकरपणे तर कधी जबाबदारीनंउत्तरं दिली. ‘गप्पा’ खूप मनमोकळ्या स्वरुपाच्या झाल्या.

स्वीटी जोशी ही एकबंडखोर, प्रयोगशील आणि एका वेगळ्याच माध्यमाचा चित्रनिर्मितीसाठी उपयोग करणारीकलाकार आहे. मूळची परभणीची. घरचे वातावरण एकदम मोकळे. वडील सरकारी इंजिनियर म्हणूनकार्यरत होते. आज वयाच्या ८५व्या वर्षी देखील ते ओपन माईंडेड आहेत. ते संस्कारस्वीटीवरही झालेत. तिचं शालेय शिक्षण परभणीतच झालं.पुढील शिक्षणासाठी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात बंडखोरी करुन प्रवेश घेतला.एक दोन शिक्षक सोडले तर महाविद्यालयाच्या पाच वर्षांच्या कालावधीत काहीही शिकवलंनाही हे मत तिनं परखडपणं नोंदवलं. महाविद्यालयात प्रचंड उदासीनता होती.(असंच मत ‘गप्पां’मध्ये सामील झालेल्या अन्य काही कलाकारांनीही नोंदवलेलंस्मरणात आहे.) पुण्यात स्वीटीचा वावर संगीत, नाटक इत्यादी क्षेत्रातील कलावंत आणि लेखक मंडळीतच होता व आजही ती त्यांच्या संपर्कात आहे.

संजय सावंत या चित्रकाराशीविवाह झाल्यानंतर स्वीटी मुंबईत आली आणि मुंबईतील आधुनिक विचारसरणीशी एकरुप झाली.संजय व तिची मतं खूप जुळतात. कधीकधी भांडणंही होतात.‘गप्पां’मध्ये दोघांनी मिळून केलेलं एक काम पाहताआलं. दोघांनाही भटकणं,प्रवास करणं प्रचंड आवडतं. व्हिएतनाम, स्वीडन, दक्षिण कोरिया, दुबई तसेच देशांतर्गतही त्यांनी भरपूर भटकंती केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे त्यात खंड पडला आहे. प्रवासादरम्यान तिला जी माणसं भेटली,जो निसर्ग दिसला तो नकळतपणे तिच्या चित्रातून व्यक्त होतो.

महाविद्यालयातअसतांनापासून स्वीटी काळ्या रंगात चित्रनिर्मिती करीत होती. काळ्या रंगाचंतेच वेड पुढंही कायम राहिलं. सुरुवातीला वापरत असलेल्या रेडीमेड ब्लॅक कलरचा पुढं जाऊनकंटाळा आला व स्वतःचा ब्लॅक कलर तिनंशोधून काढला. छापीलपुस्तकांतील शब्दांना जाळून, त्या शब्दांच्या पलिकडे जो भाव आहे, अर्थ आहे तोव्यक्त करण्याचा स्वीटी प्रयत्न करते. ‘अग्नी’ हा मूलभूत घटक आहे. त्याच्याशीसंवाद करण्याचा प्रयत्न ती चित्रातून करते. ‘अग्नी’ असल्याशिवाय तिचंचित्र पूर्णच होऊ शकत नाही. तिला पुस्तकंप्रचंड आवडतात. शब्दांवरविलक्षण प्रेम आहे. पुस्तकांसोबतचं साहचर्य (असोसिएशन) हा एक तिचा प्रयत्न असतो.एकदा तर तिनं महात्मा गांधींची आत्मकथा देखील जाळली. याचाअर्थ असा नव्हे की गांधीजींचे विचार जाळून टाकायचे आहेत. ते जाळता येणार नाहीत.कारण ते प्रत्येकाच्या मनात आहेत. पुस्तकं जाळणं हे कदाचित दिसायला ‘डिस्ट्रक्शन’ वाटेल, परंतुतिच्या मते ते तिच्या भावनांचे ‘कंस्ट्रक्शन’ आहे. ‘अग्नी’साठी स्वीटी उद्बत्ती,गॅस बर्नर, कँडल आणि तत्सम गोष्टींचा वापर करते. कधी हात, पाय भाजतात, चटके बसतात.एकदा तर ब्रश समजून पेटती उद्बत्तीच पकडली व ती बोटाला चिकटून बसली. पण तिलात्याची काळजी नसते.

एकदा कामाला सुरुवातकेली की सलग अठरा अठरा तास कामात निघून जातात. काम प्रामुख्यानं रात्रीच्या नीरवशांततेत करायला आवडतं. त्यासाठी ती ऑरगॅनिक राईस पेपर वापरते. कॅनव्हास तिला आपलावाटत नाही. फॉरेस्ट एरियात जन्म झाला असल्यानं कदाचित असेल. तिला झाडाची वाळलेलीपाने, मुळे, कागद आपले वाटतात. गेली वीस वर्षे ती ‘अग्नी’ तत्त्वाशी संवाद साधतेय.त्यामुळे त्या घटकावर तिनं नियंत्रण मिळवलं आहे. कोणता भाग जाळायचा? किती जाळायचा? हेती ठरवते. न सांगता येणारी गोष्ट चित्रातून व्यक्त करण्याचा तिचा प्रयत्न असतो.चित्रातून स्वतःशी, निसर्गाशी, इतकंच नव्हे तर जे साहित्य वापरते त्यांच्याशीसंवाद साधण्याचा स्वीटीचा प्रयत्न असतो.

रोजच चित्र काढली जातात असं नाही. जेंव्हा चित्र काढत नाही तेंव्हा वाचन, संगीत ऐकणं, कविता लिहिणं,चित्रपट पाहणं हे चालू असतं. लिखाणाचा पहिला वाचक अर्थातच संजय असतो.जी.ए.कुलकर्णी, चिं.त्र्य.खानोलकर, ग्रेस हे तिचे आवडते लेखक आहेत. तिची मैत्रीण व तीग्रेस यांना भेटायला नागपूरला आल्या होत्या. पूर्ण एक दिवस त्यांच्यासहवासात घालविला. आश्चर्य म्हणजे याकोणत्याही लेखकांची पुस्तकं तीजाळत नाही.

‘गप्पां’च्या दरम्यान स्वीटीचं कामही पाहता आलं. त्यावर तिची सुरु असलेली ‘रनिंग कॉमेंट्री’ खूपच रोचकहोती. तिची काही कामं ती ज्येष्ठ चित्रकार गणेश होलोई, जयराम पटेल यांना दाखवूशकली. त्यांनी केलेलं कौतुक हे समाधान देणारं होतं. तिचं काम गायतोंडे सरांच्यासमकालीन असणार्‍या ज्येष्ठ चित्रकार नसरीन यांच्याशीरिलेट करता येतं अशीप्रतिक्रिया प्रा. पांडुरंग ताठे, संजीव खांडेकर यांनी व्यक्तकेल्यावर काम करायला अधिक उत्साह वाटतो असं स्वीटी म्हणाली.

स्वीटी प्रयोगशील असल्यामुळेचित्रकलेच्या प्रवासात पुढं तिचं रंगांशी खेळणं सुरु झालं. व्हिएतनामला ती व संजय दोघेहीकॅम्पसाठी गेले होते. त्यावेळी तेथील वातावरण एकदम डल, ग्रे होतं. स्वीटीनं वाळलेली झाडं लाल रंगानं रंगवली व तेथे पाणी होतं त्या ठिकाणी ती एकारांगेत लावली. तिला सावल्या आवडतात. कडकडीत उन्हात तिनं आर्किटेक्चरच्या मुलांबरोबरवाळलेल्या झाडांची खोडं रंगविली. त्यांच्या सावल्यांचे पॅटर्नस्‌ तयार झालेत तेचित्रातून व्यक्त केले. सूर्याच्या स्थितीप्रमाणे खांबांच्या बदलत्या सावल्याचित्रातून टिपल्यात तर राजस्थानमध्ये चक्क शेणाच्या गोवर्‍यांवर काम केलं.प्रत्येक नवीन चित्र हे नव्यानं प्रेम करण्यासारखं तिला वाटतं. एक चित्र पूर्णझालं की दुसरं काढताना पुन्हा नवीन अनुभव, नवीन गोष्टी कळतात. ही लाईफ लाँगप्रोसेस आहे.

स्वीटीला प्रचंड सामाजिकभान आहे. एकदा नर्मदा किनारी कँप होता. ‘नर्मदा बचाव’ आंदोलनाचे ते दिवस होते. दोनचार घरं असलेल्या छोट्याशा गावात तो कॅम्प होता. सूर्योदय ते सूर्यास्त गावातप्रकाश, नंतर पूर्ण अंधार, मेणबत्तीचा प्रकाश व चांदणे सोबतीला! ते गाव वाचायला हवं, नर्मदा ही या लोकांची ‘जीवनरेषा’ आहे. या विचारानं तिनं गावातील सर्वांच्या हातांचे रंगबिरंगी ठसे घेतले. आपल्या हातावरील ‘जीवनरेषा’व नर्मदा ही देखील गावकर्‍यांसाठी जीवनरेषा आहे. हा विचार त्यामागे होता. गावातदेऊळ, मंदिर नाहीच. ‘दगड’ हाच त्यांचा देव ! त्याच्यासमोर हे पेंटिंग ठेऊन नर्मदा वाचवण्याचं साकडं घातलं.

असाच आणखी एक काम स्वीटीव संजय यांनी मागील वर्षी लॉकडाऊनच्या कालावधीत केलं. कष्टकरी वर्ग जोस्थलांतरीत होत होता त्यांना यादाम्पत्यानं, सर्व काळजी घेऊन,महिना-दीड महिना मदत केली. स्वीटीनं त्या स्थलांतरितांवर भरपूर व्हिडियोज तयारकेले. त्यातील दोन व्हिडियोजची निवड दक्षिण कोरियातील बिनालेसाठी करण्यात आलीहोती. दृष्टिहीन व्यक्तींसाठीस्वीटीनं ब्रेलपेपरवर काम केलं. चित्रं ही केवळ पाहण्याचीच नाही तर स्पर्शकरण्याची गोष्ट आहे. स्पर्शज्ञानातून होणारा बोध तिला चित्रातून मांडावासा वाटला.

स्वीटीचा परमेश्वरावरविश्वास नाही. पूजाअर्चा ती करत नाही. परंतु ‘वैश्विक ऊर्जा’ (युनिव्हर्सल एनर्जी) यावर तिचाठाम विश्वास आहे. हा एक घटक आहे जो आपल्या सर्वांमध्ये समान आहे असं तिला वाटतं.बाह्यतः जरी आपण वेगवेगळे असलो तरी आतून आपण या एकाघटकामुळे एकमेकांशी जोडलेले आहोत.

‘तुझ्या चित्रातून तू जेकाही व्यक्त करते ते पाहणार्‍यापर्यंत पोहोचतं का?’ नाईक यांनी विचारलेल्याया प्रश्नाला उत्तर देताना स्वीटी म्हणाली की जे चित्रकार आहेतत्यांच्यापर्यंत तर पोहोचतच. परंतु सर्वसामान्य दर्शकांपर्यंतही पोहोचतं.‘जहांगीर’मधील तिचं प्रदर्शन पाहायला आजी, मुलगी व नात तिघीजणी आल्या होत्या,त्यांना ते आवडलं. तसेच आणखी एक चित्र पाहून स्वीटीची आई म्हणाली, ‘तुझ्या मनातीलवेदना चित्रातून दिसते.’ (त्या चित्रालातिच्या घरी नुकत्याच घडून गेलेल्या दुःखद प्रसंगाची पार्श्वभूमी होती.) आणि कोणालासमजा नाही समजलं तर त्यानं फार फरक पडत नाही.

‘ही चित्र काढून तुला कुठं पोहोचायचं आहे?’ या चित्रकार, समीक्षक शर्मिला फडके यांनी कॉमेंटबॉक्सवर विचारलेल्या प्रश्नाला स्वीटीनं दिलेललं उत्तर तत्वज्ञानात्मक होतं, ‘मलाकोठेच पोहोचायचं नाही. हा एक आयुष्यभर चालणारा प्रवास आहे. तो कुठे सुरु होतो कळतनाही. ते जर कळलं असतं तर कदाचित्‌ चित्र काढणं थांबूनच जाईल.’ मला आठवतंय,ज्येष्ठ नृत्यकलाकार रोहिणीताई भाटे यांनीदेखील असंच उत्तर दिलं होतं.

सतीश नाईक यांनी गप्पांचाशेवट करताना अतिशय मूलभूत प्रश्न विचारला. महाविद्यालयात साधारण शंभरविद्यार्थ्यांपैकी जस्तीत जास्त दहा व्यक्ती कलाकार म्हणून पुढं येतात. बाकीचेकोठे अडकून पडतात? यातून बाहेर कसं पडणार?

स्वीटीनं स्वानुभवातूनदिलेलं उत्तर खूपच महत्त्वाचं आहे. चित्रकार म्हणून तुम्हाला पुढं यायचं असेल तरत्याग हा करावाच लागतो. तुम्हाला निर्णय घेताना कठोर व्हावंच लागतं. तिनं स्वतःचित्रावरील प्रेमापोटी अपत्य न होऊ देण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल क्षणभरहीमनात खंत नाही. तुम्हाला जे हवे ते करा. उगाच दुसर्‍या कोणाच्या अपेक्षा पूर्णकरण्यासाठी काही करु नका. तुम्ही जे निवडाल त्यावर तुमचा ठाम विश्वास हवा. लगेच हवं ते मिळणार नाही. परंतु विश्वास असेल तर आज ना उद्या नक्की मिळेल. मग कदाचिततुमचा पुढचा प्रवास अधिक सूकर होऊ शकेल.

एक तासापेक्षा अधिक काळ चाललेल्याया ‘गप्पा’ ऐकताना वेळ कसा गेला समजलंच नाही. ‘पुस्तकं जाळणे’हा अप्रिय भाग वगळता स्वीटीला ऐकणं हे खरोखरच भन्नाट होते. तिची संपूर्णगप्पास्वरुप मुलाखत ‘चिन्ह’च्या युट्युब चॅनलवर जरुर ऐका.

https://www.youtube.com/watch?v=EYzDpBIdDgk&t=4212s

सुनीती देव

Top Features

 

Feature 1

सातासमुद्रा पलीकडून प्रतिक्रिया !

अधिक वाचा

Feature 2

येत्या गप्पा संजय सावंत यांच्याशी !

अधिक वाचा

Feature 3

जहांगीर कधी सुरु होणार ?

अधिक वाचा

Feature 4

असं जगणं असतं राजा !

अधिक वाचा

Feature 5

२०२२ नंतर काय ? आणि जे जे अस्तित्वात राहील ?

अधिक वाचा
12345678910...