Enquire Now

Request A Quote

कोकणचो टायपोग्राफर !

सिद्धेश हा तसा टिपिकल उपयोजित चित्रकार. पण त्याच्या आयुष्यात अनेक वळणं आली. त्यातलं एक वळण सावंतवाडीच्या बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टमध्ये १३ वर्ष शिकवण्याचं. मग त्याच कॉलेजमध्ये तीन वर्ष प्राचार्य पद भूषवण्याचं. सर्वसाधारणपणे उपयोजित कलावंतांमध्ये सतत नोकऱ्या बदलण्याची प्रथा असते, त्यालाही हा अपवाद नाही. 'प्रहार' दैनिकात दोन वर्ष, कणकवलीच्या कॉमन सेन्स ऍड एजन्सीमध्ये दोन वर्ष, सावंतवाडीच्या कोकणसाद वृत्तपत्रात एक वर्ष आता तो मुंबईच्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड व्हिज्युअल आर्टमध्ये येऊन स्थिरावला आहे. हे सारं चालू असतानाच त्याची कलासाधना चालूच होती.
तो विशेष करून टायपोग्राफीमध्ये काम करतो. कॅलिग्राफी देखील करतो. हे करत असताना त्याला काहीतरी वेगळं करावंसं वाटू लागलं आणि मग त्याच्या डोक्यात कल्पना आली की, ज्या कोकणात आपण जन्मलो, वाढलो, लहानाचे मोठे झालो, त्या कोकणलाच केंद्रस्थानी ठेऊन का काही वेगळं काम करू नये ? या विचारातूनच 'अक्षरग्राम' या संकल्पनेला सुरुवात झाली. सभोवतालचं एक एक गाव घेऊन त्या गावातली सारी वैशिष्ट्य दाखवणारी टायपोग्राफी त्याच्या संगणकावर साकार होऊ लागली. पहिला मान अर्थातच मालवणला मिळाला.
मालवणचा त्याने केलेला टायपो फेसबुकवर पडताच अक्षरशः उसळला. म्हणता म्हणता तो व्हायरल झाला. फेसबुकवर कोकणातले असंख्य ग्रुप आहेत. एकेका ग्रुपमध्ये लाखो लोकं कार्यरत आहेत. त्या साऱ्यांनीच तो टायपो उचलून धरला आणि मग फर्माईश वर फर्माईशी येऊ लागल्या. 'आमचं पण गाव करा, आमचं पण गाव करा' वगैरे. सिद्धेशला देखील त्यात गम्मत वाटू लागली आणि हळू हळू अख्खा सिंधुदुर्ग जिल्हाच फेसबुकचा परीघ व्यापू लागला. आणि हा हा म्हणता म्हणता सिद्धेश सेलिब्रिटी टायपोग्राफर झाला. 'मालवणी मॉल'च्या 'व्हय म्हाराजा'चा लोगो देखील सिद्धेशच्याच संगणकातून साकार झाला आहे.
या पोस्टसोबत 'गच्चीवरील गप्पां'चं चे पोस्टर आम्ही शेयर केलं आहे त्यातला 'गच्चीवरील गप्पां'चा नवा लोगो देखील सिद्धेशच्याच संकल्पनेतून साकार झाला आहे. इतकंच नाही तर 'कलाशिक्षण : काल, आज आणि उद्या' या गाजलेल्या महाचर्चेचा लोगो देखील सिद्धेशनेच तयार केला होता. सिद्धेशची आजवरची घौडदोड बघून किंवा त्याच्या कामातलं वेगळेपण जाणूनच येत्या शनिवारी 'चिन्ह'नं त्याला 'गच्चीवरील गप्पां'मध्ये आमंत्रित केलं आहे. येत्या शनिवारी म्हणजे २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०५.३० वाजता 'चिन्ह'चे संपादक सतीश नाईक त्याच्याशी 'गप्पा' मारणार आहेत. ऐकायला, पाहायला विसरू नका.
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

सातासमुद्रा पलीकडून प्रतिक्रिया !

अधिक वाचा

Feature 2

येत्या गप्पा संजय सावंत यांच्याशी !

अधिक वाचा

Feature 3

जहांगीर कधी सुरु होणार ?

अधिक वाचा

Feature 4

असं जगणं असतं राजा !

अधिक वाचा

Feature 5

२०२२ नंतर काय ? आणि जे जे अस्तित्वात राहील ?

अधिक वाचा
12345678910...