Enquire Now

Request A Quote

वऱ्हाडी माणसं आणि मानापमान !

वऱ्हाडी माणसं तशी गरम डोक्याचीच. कदाचित विदर्भातल्या कडक उन्हाळ्याचा हा परिणाम असावा. राजेश म्हणजे राजेश पुल्लरवार हा चित्रकार देखील तसाच, काहीसा गरम डोक्याचा. त्याच्या या गरम डोक्याचे किस्से जेजेमध्ये खूप चवीनं सांगितले जातात. येत्या शनिवारी होणाऱ्या 'गच्चीवरील गप्पां'च्या कार्यक्रमात ते सविस्तर येतीलच, त्यामुळे त्याविषयी आता काही लिहीत नाही. 

पण या गरम डोक्यामागचा सकारात्मक दृष्टिकोन मात्र राजेशनं छानच दाखवून दिला. त्याचीच ही गोष्ट. जेजेमधलं शिक्षण संपल्यानंतर त्याने मुंबईच्या कला विश्वात प्रवेश केला, तो पेंटिंग देखील करतो, पण त्याचा कल प्रामुख्याने मुद्रा चित्रण कलेकडे जास्त झुकला आहे. २०१३ सालची ही गोष्ट, तो गेला होता सिंगापूरला. सिंगापूर टायलर प्रिंट इन्स्टिट्यूटमध्ये, खूपच मोठा स्टुडियो तो. भारतातल्या बऱ्याच कलावंतांचं काम त्याला तिथं पाहायला देखील मिळालं. 

त्याला वाटलं की, आपलं काम देखील असंच इथं लागलं तर..., त्यानं तसं तिथल्या डायरेक्टरना सुचवून देखील पाहिलं. सुचवलं अशासाठी कारण त्या डायरेक्टरना याचं काम खूप आवडलं होतं. पण ते काही हू का चू करीनात ! विदर्भातलंच गरम रक्त ते, त्या इमारतीच्या पायऱ्या उतरताना ते सळसळलंच. मनात म्हणाला, 'आता घ्यायचं नाही द्यायचं !'. तिथून भारतात परततानाच त्याच्या डोक्यात सारी कल्पना आकार घेत होती. भारतात आल्याबरोबर त्याने तिला आकार दिला आणि त्यातूनच निर्माण झाली एक अभिनव संकल्पना. जी आधी कुणाला सुचली नव्हती आणि कुणी करण्याचा तर प्रश्नच नव्हता. 

त्याने त्याला ठाऊक असलेले चित्रकार निवडले. निवडलेल्या चित्रकाराच्या ६० टक्के भारतीय होते तर ४० टक्के परदेशी, आणि त्यांना सांगितलं की एका चित्राचे किमान चाळीस प्रिंट तुम्ही मला द्यायचे. या ४० चित्रकारांच्या प्रत्येकी ४० चित्रांचे त्याने पोर्टफोलियो तयार केले आणि हे पोर्टफोलियो त्याने यात सहभागी झालेल्या प्रत्येक चित्रकाराला पाठवले. त्या चित्रकाराने ते तो जिथं राहतो तिथं किंवा त्याला जिथं शक्य आहे तिथं त्यानं ते प्रदर्शित करायचे. 

आतापर्यंत जगभरातले २५० पेक्षा जास्त चित्रकार यात सहभागी झाले आहेत. आणि ९० च्या वर त्याची जगभरातल्या वेगवेगळ्या शहरात प्रदर्शनं भरवली गेली आहेत. किती सुंदर कल्पना आहे ना ही ! तिच्याच विषयी आणि स्वतःविषयी सांगण्यासाठी दस्तुरखुद्द राजेश 'चिन्ह'च्या 'गच्चीवरील गप्पा' या कार्यक्रमात येणार आहे. ऐकायला, पाहायला विसरू नका.
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

सातासमुद्रा पलीकडून प्रतिक्रिया !

अधिक वाचा

Feature 2

येत्या गप्पा संजय सावंत यांच्याशी !

अधिक वाचा

Feature 3

जहांगीर कधी सुरु होणार ?

अधिक वाचा

Feature 4

असं जगणं असतं राजा !

अधिक वाचा

Feature 5

२०२२ नंतर काय ? आणि जे जे अस्तित्वात राहील ?

अधिक वाचा
12345678910...