Enquire Now

Request A Quote

यु ट्यूब : पहिले यशस्वी पाऊल

गच्चीवरील गप्पा अर्थात प्रश्नचिन्ह या अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमानं चित्रकलेचं आणि चित्रकारांचं एक वेगळंच जग समाजासमोर उलगडू लागलं आहे. यात जगण्यातलं प्रत्येक नाट्य अगदी खच्चून भरलं आहे. यात प्रचंड संघर्ष आहे, वाद आहे, विवाद आहे, प्रेम आहे, द्वेष आहे, मत्सर आहे. जीवनातले सारेच रंग इथं एखाद्या इंद्रधनुष्याचं रूप घेऊन आपल्यासमोर साकार होत असतात. 

'चिन्ह'च्या १४ अंकानं काही प्रमाणात हे कुतूहल उलगडण्याचा प्रयत्न केला होता. पण मराठी नियतकालिकांचं सीमित जग, वाचकांची विकत घेण्याविषयीची उदासीनता यामुळे ते सारे प्रयत्न मर्यादित वर्तुळातच फिरत राहिले. फेसबुक, यु ट्यूब, व्हाट्सअपसारख्या समाजमाध्यमांचा वापर सुरु झाल्यावर मात्र यातून काही करता येईल का ? ही कोंडी फोडता येईल का ? या दृष्टीनं विचार सुरु झाला. लॉकडाउनच्या पहिल्या एपिसोडनं मात्र या साऱ्याला विलक्षण चालना दिली आणि 'प्रश्नचिन्ह' या कार्यक्रमाची संकल्पना साकार झाली. जिचं पुढं 'गच्चीवरील गप्पां'मध्ये रूपांतर झालं. फेसबुकने हा अभिनव उपक्रम प्रत्यक्षात आणण्यास खूप मोठा हातभार लावला, खूप मोठा आत्मविश्वास देखील त्यानं मिळवून दिला. 

यु ट्यूबवर हे सारं आणताना आम्ही अत्यंत आत्मविश्वासानं पावलं टाकली ज्याचं फळ आम्हाला लागलीस मिळालं. खूप मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम समाजाच्या विविध घटकांकडून पाहीला जातो आहे. 'चिन्ह'च्या माध्यमातून ३०-३५ वर्ष जे काही साकार करण्याचा प्रयत्न आम्ही केला तो वाया नाही गेला असं या बाबतीत नक्कीच म्हणता येईल. 

अजून असंख्य कलावंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहेत. त्यांनी केलेली धडपड, अपयशावर मात करण्याचे वारंवार केलेले प्रयत्न आणि हे सारं अत्यंत समर्पक शब्दात मांडणं हे बहुसंख्यांना आश्चर्यजनक वाटतं. त्यातून निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासाठी देखील या कार्यक्रमानं खूप मोठा हातभार लावला आहे यात शंकाच नाही. 

नव्या तंत्रज्ञानामुळं हा सारा ठेवा आता जपता येतो. संगणकाची एक कळ दाबताच धडाधड तो आपल्यासमोर क्षणार्धात उभा राहतो. या साऱ्या तंत्रज्ञानाची 'चिन्ह'नं वेळीच दखल घेतली नसती तर आधीचे सारेच प्रयत्न वांझोटे ठरले असते. ते अधिकाधिक यशस्वी ठरावेत यासाठी हे खास आवाहनवजा निवेदन. https://www.youtube.com/results?search_query=chinha+magzine या लिंकवर क्लिक करून आमच्या चॅनलला भेट द्या, व्हिडीओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या कार्यक्रमांची दर आठवड्याची नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आणखीन एक विनंती, तुमच्या मित्रमैत्रिणींना, जवळच्या नातेवाईकांना आवडलेल्या व्हिडीओजची लिंक पाठवायला विसरू नका. 
सतीश नाईक 

Top Features

 

Feature 1

एक नवं विश्व तुमच्यासमोर साकारणारेय...

अधिक वाचा

Feature 2

गायतोंडे पेंटिंग १०० कोटीच्या घरात कधीही जाईल

अधिक वाचा

Feature 3

पुनर्जन्म

अधिक वाचा

Feature 4

गायतोंडे आयुष्यभरच होम क्वारंटाईन होते !

अधिक वाचा

Feature 5

गायतोंडे, अध्यात्म, होम क्वारंटाईन, डॉ. दिग्विजय वैद्य आणि मी

अधिक वाचा
12345678910...