Enquire Now

Request A Quote

केवळ दुसऱ्याच्या चुकीमुळे ...


चित्रकला क्षेत्रात जे काही माझे मोजकेच मित्र आहेत त्यातला चित्रकार प्रकाश वाघमारे हा एक. खरं तर 'गच्चीवरील गप्पां'साठी त्याची निवड आधी करायला हवी होती पण मित्रांनाच चमकवले वगैरे टीका व्हायला नको म्हणून त्याच्या नावाचा समावेश थोडासा उशिराच केला. तो ठाण्यात माझ्या घरी वरचेवर येत असतो. मी ही बोरिवलीच्या त्याच्या स्टुडियोत अधून मधून जात असतो. स्टुडियोत गेलं म्हणजे जेवूनच निघावं लागतं. ज्या नजाकतीनं त्यानं एकेक पदार्थाला चव आणलेली असते ती केवळ लाजवाब असते. गेले की गप्पा मारायच्या, शास्त्रीय संगीतावर चर्चा करायची, वेळ असेल तर काही ऐकायचं आणि मग निवांतपणे निघायचं असा एकूण माझा कार्यक्रम असतो. हे आपलं सहज जाता जाता. 

प्रत्यक्ष कार्यक्रमात प्रकाश कसं बोलेल याविषयी मी काहीसा साशंक होतो. कदाचित जवळचा मित्र असल्यामुळे देखील असू शकेल. पण प्रकाश मात्र अत्यंत तब्येतीनं बोलला. विचारलेल्या प्रश्नांची शांतपणे आणि सहजरित्या उत्तरं देत गेला. त्यामुळेच की काय कुणास ठाऊक पण अनेकांना तो आवडून देखील गेला. प्रकाश सांगत होता, कार्यक्रम संपल्यानंतर त्याला असंख्य मेसेजेस आले. प्रकाशची अनेक महत्वाची वाक्य त्यातल्या अनेकांनी कोट केली होती. सर्वसाधारणपणे चित्रकार मंडळी जिथं राहतात तिथं आजूबाजूच्या लोकांना चित्र वगैरे गोष्टींमध्ये काही फारसं स्वारस्य नसतं. त्यानं किती मोठं नाव कमावलंय, किती मोठं काम केलंय याविषयी त्यांना फारसं ठाऊक नसतं आणि आमचे बहुतांश चित्रकार मंडळी स्वतःची टिमकी अशी सहसा वाजवत नाहीतच. त्यामुळे सहाजिकच जिथं राहतात तिथं त्यांच्याविषयी फारसं ठाऊक नसतं. पण प्रकाश अतिशय मनमिळाऊ असल्यामुळं त्याच्या सोसायटीत तो ठाऊक होता. पण चित्रकलेत त्यानं जे काही करून ठेवलं ते या गप्पागोष्टींमुळेच त्यांच्यापर्यंत पोहोचलं यात शंकाच नाही. 

अशा पद्धतीने हा कार्यक्रम जर समाजाच्या सर्व स्तरात हळूहळू का होईना पोहोचत गेला तर 'चिन्ह'ला आनंदच आहे. ही कोंडी कोणीतरी फोडायलाच हवी होती आणि 'गप्पा' यु ट्युबवर गेल्यापासून ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया आमच्याकडे येत आहेत त्या पाहता कोंडी फोडण्याच्या दृष्टीनं सुरुवात झाली आहे हे निश्चित. 

सर्वच दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या, स्वतःला सिद्ध केलेल्या, जेवण तयार करण्यापासून साऱ्याच गोष्टी स्वावलंबी असलेल्या प्रकाशचं आयुष्य एका घटनेनं मात्र बदलून जाण्याची वेळ आली होती. धूम स्टाईलनं मोटार सायकल चालवणाऱ्या दोन तरुण पोरांनी त्याला अक्षरशः जमिनीपासू १५ - २० फूट उंच उडवलं, स्वतः अतिशय धट्टा कट्टा असल्यानं तेव्हा काही त्याला जाणवलं नाही पण नंतर मात्र त्या अपघातानं त्याला खूप काही सोसावयास लावलं. 

अत्यंत सुरळीत चाललेल्या आयुष्यात स्वतःची काही चूक नसताना केवळ दुसऱ्याच्या चुकीमुळे एखाद्याला कसे सर्वनाशापर्यंत जाण्याची वेळ येते याचंच हे उदाहरण. प्रकाशसोबत झालेल्या गप्पागोष्टींमधला हा भाग अवश्य पहा. आवडला तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडीओ पहा. व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील सर्व लाईव्ह कार्यक्रमांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. 
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

एक नवं विश्व तुमच्यासमोर साकारणारेय...

अधिक वाचा

Feature 2

गायतोंडे पेंटिंग १०० कोटीच्या घरात कधीही जाईल

अधिक वाचा

Feature 3

पुनर्जन्म

अधिक वाचा

Feature 4

गायतोंडे आयुष्यभरच होम क्वारंटाईन होते !

अधिक वाचा

Feature 5

गायतोंडे, अध्यात्म, होम क्वारंटाईन, डॉ. दिग्विजय वैद्य आणि मी

अधिक वाचा
12345678910...