Enquire Now

Request A Quote

मंजिरीची हिस्ट्री

मंजिरीशी ऑनलाईन गप्पा मारणं हा एक वेगळाच अनुभव होता. ती ज्या क्षेत्रात काम करते त्या विषयी मला थोडं बहुत ठाऊक होतंच पण तिची नेमकी जडण घडण कशी झाली हे मात्र मला उमगत नव्हतं. तिचं एकूणच आंग्लाळलेलं व्यक्तिमत्त्व आणि त्यात असणारी अस्सल मराठीपणाची छटा याचं रहस्य देखील मला कळत नव्हतं. कार्यक्रमाच्या आधी सर्व तयारी झाली की नाही हे पाहताना सहज हा विषय निघाला आणि तिनं गिरगावाचा उल्लेख केला, आजोळचा उल्लेख केला, आजोबांचा उल्लेख केला आणि चटकन उलगडा झालाच. त्यामुळे मग ऐनवेळी मुलाखत खूपच रंगली. 

तिच्या आजारपणाचे उल्लेख मी ऐकून होतो. एकदा तर तिला पाहायला देखील तिच्या घरी गेलो होतो. पण आजारपणाविषयी विचारण्याचा धीर मात्र कधी झाला नाही. संकोच हा भाग देखील असतोच. पण अचानक गप्पागोष्टींच्या वेळी काय झालं कुणास ठाऊक मी तिला थेट प्रश्न विचारला आणि तिनंही तितकंच थेट आणि मनमोकळेपणाने उत्तरं दिली आणि तोच त्या गप्पागोष्टींचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यावेळी मंजिरी उत्तरं देताना जे काही सविस्तर बोलली ते सारंच भलतंच ग्रेट होतं. तिच्याविषयी तिच्या कामाविषयी ज्यांच्या मनात शंका कुशंका असतील त्या त्या गप्पागोष्टींच्या क्षणांमधून निश्चितपणे दूर झाल्या असतील याची मला खात्री आहे. गच्चीवरील गप्पांमधल्या या मंजिरीच्या गप्पा दीर्घकाळ लक्षात राहतील अशाच झाल्या यात काही शंका नाही. बहुदा त्यामुळेच युट्युबवर त्या टाकता क्षणीच कलारसिक त्या मोठ्या प्रमाणावर ऐकू लागल्या आहेत. 

कार्यक्रम पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

https://www.youtube.com/watch?v=DcWlbcaPoEE
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

एक नवं विश्व तुमच्यासमोर साकारणारेय...

अधिक वाचा

Feature 2

गायतोंडे पेंटिंग १०० कोटीच्या घरात कधीही जाईल

अधिक वाचा

Feature 3

पुनर्जन्म

अधिक वाचा

Feature 4

गायतोंडे आयुष्यभरच होम क्वारंटाईन होते !

अधिक वाचा

Feature 5

गायतोंडे, अध्यात्म, होम क्वारंटाईन, डॉ. दिग्विजय वैद्य आणि मी

अधिक वाचा
12345678910...