Enquire Now

Request A Quote

शिक्षक नडला आणि...

प्रमोद कुर्लेकर हा मूळचा सातारचा. सांगलीच्या कलामहाविद्यालयातून त्यानं आपलं कलाशिक्षण पूर्ण केलं. चित्रकलेच्या प्रत्येकाचं विद्यार्थ्याला जेजे विषयी असतं. यालाही ते होतं, खूपच होतं. पण जेजेत प्रवेश मिळाला नाही म्हणून त्यानं शक्कल लढवली. डीपएड करण्यासाठी त्यानं जेजेत प्रवेश घेतला. 


त्याला वाटलं होतं की जेजेत प्रवेश घेतला म्हणजे जेजेच्या संग्रहातली पोर्ट्रेट्स पाहता येतील, जेजेच्या स्टुडिओमध्ये वावरता येईल, जमलंच तर काम देखील करता येईल. पण तिथंही त्याचं दुर्दैव आड आलं. एक शिक्षक त्याला असे नडले की काही विचारता सोय नाही. 'ज्याच्यासाठी इथं आलात तेच इथं करता येईल, दुसरं काही नाही' असं त्यांनी त्याला सुनावलं आणि इतरत्र वावरण्यावर बंदी आणली. इतकी की त्यानं हॉबी क्लासमध्ये प्रवेश घेतला तर त्याला काम देखील करता येऊ नये अशी त्याची अवस्था करून टाकली. खूप गाजलं होतं ते प्रकरण त्यावेळी. पण जेजेतल्या अन्य प्रकरणात जशी कुणावरही कारवाई झाली नाही तशीच ती इथं देखील झाली नाही. तो सांगत होता एकदा लायब्ररीत पोर्ट्रेटची पुस्तकं बघत बसलो तर या शिक्षकानं माझं आयडेंटिटी कार्डच जप्त करून घेतलं. त्या शिक्षकाच्या त्या सगळ्या वागण्याला कंटाळून यानं डीपएडचा क्लास चक्क अर्धवट सोडून दिला आणि हा पठ्ठ्या जेजेतून बाहेर पडला.


जेजेतून बाहेर पडला पण जाणार कुठं ? हा गेला थेट आर्ट प्लाझाच्या कमलाक्ष शेणॉय यांच्याकडं. शेणॉयना त्यानं विचारलं, सर मी इथं काम करू का ? शेणॉय सरांनी त्याला आनंदानं परवानगी दिली. रोज सकाळी ठाण्याहून आर्ट प्लाझाला यायचं आणि दिवसभर काम करून संध्याकाळी घरी परतायचं. काम म्हणजे रेखाटनं किंवा पोर्ट्रेट करणं वगैरे. तब्बल तीन वर्ष तो हे करत होता. याच सुमारास त्याला पूर्णप्रज्ञा फाईनआर्ट इन्स्टिट्यूटची शिष्यवृत्ती मिळाली. पूर्णप्रज्ञाच्या दहिसरच्या स्टुडिओत त्यानं दोन वर्ष काम केलं. ती शिष्यवृत्ती मिळवलेला तो पहिल्याच बॅचचा. जे करायचं त्यानं योजलं होतं ते आता त्याला करता येऊ लागलं होतं. कॉलेजमध्ये असतानाच कधीतरी त्यानं जहांगीरचा फॉर्म भरून ठेवला होता. जहांगीरनं त्याला प्रदर्शनासाठी २००७ साली तारीख दिली. 


त्याचं प्रदर्शन भरलं देखील. हे प्रदर्शन त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. त्या प्रदर्शनातली त्याची सगळीच्या सगळी चित्रं विकली गेली आणि त्या पैश्यातून त्यानं चक्क नायगाव येथे स्वतःचा फ्लॅट विकत घेतला. एका रूममध्ये रहायचं एका, रूममध्ये काम करायचं असा त्याचा प्रवास सुरु झाला. आता त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, साऊथ सेंट्रल झोन, कॅमलिन आर्ट फाउंडेशन असे कलाक्षेत्रातले मानाचे पुरस्कार त्याला एका पाठोपाठ एक मिळत गेले. 

२०१६ साल उजाडलं आणि पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका या जागतिक पातळीवर महत्त्त्वाच्या ठरलेल्या संस्थेनं त्याच्या चित्राला पुरस्कार दिला. एकदा नाही दोनदा नाही तब्बल चार वर्ष त्याला तो पुरस्कार सलग मिळाला. कोरोनाच्या काळात तो पुन्हा सातारला गेला. तो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता मुंबईत परत येतोय त्याच्या स्टुडिओतूनच तो आपल्याशी गप्पा मारणार आहे. ऐकायला विसरू नका.

शनिवार, दि. १३ मार्च
सायंकाळी ०५.०० वाजता
सतीश नाईक 

Top Features

 

Feature 1

आहे हे असं आहे !

अधिक वाचा

Feature 2

मंजिरीची हिस्ट्री

अधिक वाचा

Feature 3

करायला गेलो एक !

अधिक वाचा

Feature 4

मदनाची मंजिरी

अधिक वाचा

Feature 5

बोल्ड अँड ब्युटीफुल !

अधिक वाचा
12345678910...