Enquire Now

Request A Quote

अभिजात अनुभूती देणारे रेषा आणि रंग !

प्रकाश बाळ जोशी हे महाराष्ट्रातील शब्द कलावंतकेवळ पत्रकारच नव्हे तर कवीकथाकार आणि चित्रकार असा त्यांचा मोठा प्रवास आहे. गेलीअनेक वर्षे त्यांच्या पेंटिंग्जचीप्रदर्शनं मुंबईबंगलोर, पुणे, मिनीआपोलिसलास वेगास (अमेरिका),बाझेल  (स्वित्झर्लंडक्रोएशिया , नॉर्वे, इस्मीर ( तुर्कस्तान ), लिस्बन(पोर्तुगाल) , थीम्पू(भूतानशिकॅगो अशाअनेक ठिकाणी भरलेली आहेतत्यांच्या चित्रकलेचा आणि एकंदरच व्यक्तिमत्वाचा घेतलेला हा लहानसा आढावा.

प्रकाश बाळ जोशी. शब्दांवर प्रभुत्व. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये २५ वर्षे पत्रकार. मराठी इंग्रजी कथा लेखन. चित्रकला आणि पेंटिंग्ज द्वारे स्वतःचे विचार , विश्लेषण आणि व्यक्तिमत्व प्रगट करीत आहेत. गेली पन्नास वर्षे सतत रेषा आणि रंगाचा रियाझ केल्यावर गेली १२ वर्षे स्वतःचे काम लोकांपुढे मांडत आहेत. लहानपणापासूनच पारंपारिक चित्र काढण्याऐवजी जसे जाणवेल तसे रेखाटन करण्याकडे कल .

त्यांच्या पेंटिंगमध्ये निसर्गातील दृश्य , पानं , फुले, झाड , डोंगर-नद्या, चंद्र-सूर्य किंवा पक्षी प्राणी ही प्रतीकात्मक पद्धतीने काढलेली आढळतात . जे निसर्गाबाबत तेच माणसांच्या आकृती बाबत . त्यांची  काहीशी आधुनिक (modern) -  अमूर्त-शैलीशी(abstract)  मिळतीजुळती शैली आहे. म्हणजे विषय मांडण्यापेक्षा आशय मांडण्याकडे जास्त कल आहे.

शब्द आणि रेषा दोन्हीचे आकर्षण असल्यामुळे पत्रकारिता करीतकरीत त्याच वेळी आजूबाजूच्या वातावरणाचे चित्रीकरण , स्केचेस ही करीत राहील्या मुळेशब्द आणि रेषा दोन्हीचा रियाझ एकाच वेळी चालू राहिला. ते स्वतः मितभाषी आहेत.स्वतःहून स्वतःविषयी काही न बोलणे हा त्यांचा स्वभाव आहे.

त्यामुळे त्यांच्या चित्रकलेविषयी फारच कमी जणांना त्याचीमाहिती होती. मुंबईतील आर्टिस्ट सेंटर येथे भरलेल्या पहिल्या प्रदर्शनाला फारच छानप्रतिसाद मिळाला. त्यात सहकाऱ्यांना, परिचितांना, कलाप्रेमींना आश्चर्य आणिउत्सुकता होती. वन लाईन स्केच म्हणजे अखंड रेषेतून त्यांनी जगण्यातले अनेक विषयअर्थपूर्ण शैलीत व्यक्त केले होते. एकूण विश्वाचा प्रवाह अखंड चालू असतो. पण अशाकाही अनाकलनीय अनपेक्षीत अविश्वसनीय घटना घटतात की त्यातून अनेक प्रश्न निर्माणहोतात सृष्टीचीआणि प्राणीसृष्टीची घडी विस्कटून जाते. माणूस सैरभैर होतो कोणाहीकलावंत अशा घडमोडीपासून अलिप्त राहू शकत नाही. परिणामी प्रकाश बाळ जोशीयांच्यासारखे कलावंत अस्वस्थ होतात , त्यांना शब्द अपुरे वाटू लागतात आणि म्हणूंचते रेषा आणि रंगांकडे वळतात. "गेटवे " या प्रदर्शनाला याचमुळे जाणकार,विचारवंत आणि कलाकारांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.

प्रकाश बाळ जोशी यांच्या ऑईल पेटिंगचे विषयही सुरवातीपासूनचअपारंपारिक. त्यांनी लॅन्डस्केप (landscape painting ) पेंटिंग केली, ती काही एका विचाराने. लॅन्डस्केप म्हटलीकी नेहमी डोळ्यासमोर उभी राहतात निसर्गचित्रे. विलोभनीय मन हरखून टाकणारीनिसर्गाची, निसर्गातील सौंदर्याची डोंगर-नदी समुद्र-आकाश सूर्योदय-सूर्यास्तग्रामीण वास्तव झाडे-प्राणीमानव  यांचे चित्रण. पण प्रकाश यांची चित्रे एक विचार सांगणारी, विचार करायलालावणारी आणि अंतर्मुख व्हायला लावणारी आहेत. ऑईलपेंट मधील ही पेंटिंग्ज ही २१ व्याशतकातील माणसाचा प्रवास , पृथ्वी-निसर्ग-मानव यांच्यातील परस्पर संबंध व जीवनाशीनिगडीत दैनंदिन जगण्याशी संबंधित आहेत. पर्यावरण , पर्यावरणाचा नाश , हे विषयघेऊन एकंदरच अस्तित्वाचा प्रश्न मांडण्याचा प्रभावशाली प्रयत्न आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास त्याचे वास्तव चित्रण, विदारक सत्यस्वीकारणारी त्यांची अस्तित्वाची भाषा, त्यांचे समग्र दर्शन शोधण्याचा ध्यासया पेंटिंगमागे दिसून येतो. आजचे अनेक प्रश्न अक्राळ-विक्राळ स्वरूप घेऊन उभेअसले, जागतिकीकरणाची प्रक्रिया त्यात भर घालीत असली तरी मुलभूत प्रश्नांना आपल्यादृश्यकलेत वेगळ्या पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न प्रकाश बाळ जोशी करतात.कलावंताला असणारे अध्यात्मिक आणि सामाजिक भान या पेंटिंगमधून प्रत्ययाला येते.

नदी आणि हरवणाऱ्या नद्या हा प्रकाश बाळ जोशी यांचा सततचिंतनाचा विषय. लहानपणी ते स्वतः मुंबई जवळील सूर्या  नदीत बुडण्याचा प्रसंगआला होता, त्याचे खोल वर परिणाम त्याच्या भावविश्वावर झालेले दिसून येतात आणित्याचे चित्रण त्यांच्या पेंटिंगमध्ये मधून मधून दिसून येते. पाण्याचा प्रचंड उपसा, औद्योगीकीकरण , प्रदूषण यामुळे अनेक नद्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यानद्या गायब होण्याचा मानवनिर्मित प्रश्न ऑईल पेंटिंग मधून व्यक्त होतो.पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यामुळे झाडे-पक्षी , चंद्र-सूर्य हे घटकही प्रकाश बाळजोशी यांच्या पेंटिंग मधून गायब झालेले दिसतात आणि त्यांची जागा अव्यक्त गूढ अशाअवकाशाने व्यापलेली दिसते.

कोणत्याही कलावंताला आहे ते माध्यम अपुरे वाटते आणि तोवेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळी माध्यमे वापरून अभिव्यक्ती करीत असतो. या अपुरेपणाचीएक अस्वस्थता असते आणि तीच कलाकाराला प्रयोग करायला भाग पडते. अशाच एका टप्प्यावर, शब्दांबरोबरच रंग आणि रेषा प्रकाश बाळ जोशी यांना खुणावू लागल्या आणि त्यांनीचित्रकला पेंटिंग याचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नसतांना आरा आणि यशवंतचौधरी या सारख्या नावाजलेल्या कलाकारांच्या संगतीत मोठ्या कॅनवासचे आव्हान स्वीकारले आणि आपल्या अभिव्यक्तीला एक नवी वाट करून दिली . मोठ्या आकाराचा कॅनवासआणि ऑईल पेंट ही दोन्ही अवघड आव्हाने स्वीकारत त्यांनी एक नवीन अविष्कारस्वातंत्र्य मिळविले आणि अभिव्यक्तीची कक्षा विस्तारली.

बदलत्या काळाच्या ओघात निसर्गातही परिवर्तन होत असते.डोंगरांच्या रचना , नद्यांचे प्रवाह जमिनीचे प्रकार, जंगलाचे स्वरूप , पशुपक्षांचे,मानवाचे होणारे नित्य स्थलांतर नवीन जीवन घडवीत असतात. हे बदल संवेदनशील कलाकारटिपत असतो. नोंद करीत असतो. सरस्वती नदीचे अंतर्धान पावणे हा एक विषय घेऊन प्रकाशबाळ जोशी काम करीत आहेत. लुप्त झालेली नदी, तिचे त्या संदर्भातील पौराणिक,ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक अशी विविध अंगे लक्षात घेऊन त्यावर प्रकाश बाळ जोशीयांचे काम चालू आहे.

कोणत्याही कलाकृतीचे अंतर्मुख होणे हे त्या  कलेच्याअभिजाततेचे अपरिहार्य लक्षण  असते. प्रकाश बाळ जोशी यांची कलाकृती हीसंवेदनशील प्रेक्षकाला कला रसिकाला अंतर्मुख करायला लावते आणि जे समोर दिसतेत्याच्या पलीकडील शाश्वत सत्याचा विचार करायला लावते – अस्वस्थ करते.त्यांच्या पेंटिंगची शीर्षके देखील विचारप्रवर्तक असतात – कला रसिकाला समोरच्याअमूर्त चित्राकडे कसे बघावे याचे किंचित मार्गदर्शन करणारे असतात. जसे –व्हानीशिंग रिवर (vanishingriver) , टोटल लोस(total loss) , मेल्टिंग लाव्हा(melting lava)  ,  सिम्फोनी ऑफ चेंज (symphony of change) .

अशा पेंटिंगमधून एखादीही माणसाची एखादीही भासमय आकृती ( figure ) नाही , तरीहीमाणसाच्या मनातील आंदोलने संघर्ष आणि अस्तित्व भान ते ताकदीने उभे करतात.त्यांच्या प्रत्येक पेंटिंगमधून हे जाणवत असतं. स्त्री पुरूष हीप्रतीकं म्हणून सुद्धा आली की संकल्पनांची पन्नास टक्के गृहीतकं आपोआपचयेतात आणि निखळ मनांन पेंटिंग बघणं काहीसमर्यादित होतं. निसर्ग प्रमाणेच आपल्या पेंटिंगमध्येही निखळता असावी असा त्यांचा कायम कटाक्ष दिसतो.

स्त्री आणि पुरूष हे निसर्गाचीच प्रतीके आहेत . प्रतीकाऐवजीमूळ स्र्त्रोताकडे म्हणजे विश्वारुपाकडे रंग आणि ब्रश वळलेले दिसतात. प्रकाश बाळजोशी यांच्या पेंटिंगचे मोठे सामर्थ्य म्हणजे या पेंटिंगमधून पंचमहाभूतांचेअव्यक्त असं वेगळा स्वरूप अनुभवायला मिळत. ब्राम्हनंदाची अवस्था सुख-दुख आनंद–वेदना  आहे-नाही या व्दैतातूनच   अदैत्वाकडे नेणारा हाप्रयत्न आहे.

खरं तर एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाणे हा खडतरआणि अवघड प्रवास आहे. वृत्तपत्रातील असंख्य शब्दांच्या जंजाळातून आपली संवेदनशीलताटिकवून ठेवणे अवघड काम त्यातून पुढे रंग आणि रेषा यांच्या साहायाने काम करणे अधिकगुंतागुंतीचे काम. अशी माध्यमे बदलणारे आणि आव्हान पेलणारे जे कमी कलाकार आहेतत्यातील प्रकाश बाळ जोशी हे एक आहेत.

गेली चार दशक प्रकाश बाळ जोशी मुंबई महानगरीत राहत आहेत आणित्यातील गल्ली बोळापासून ते पसरत्या उपनगरांपर्यंत मुंबई शहर त्यांनी फिरूनपाहिलेलं आहे. महानगरीतील मयसभेचे लोभसवाणे बदलते स्वरूप आणि लहानमोठ्यासर्वावर गारुड घालणारे बॉलिवूड. महानगरात येणाऱ्याप्रत्येकाचे एक स्वप्न आणि भयाण वास्तव , होणारी घुसमट, दाहक , प्रखर आणि काहीसआश्वासन देणार शहर त्यांच्या रेखाटनातून दिसते.

प्रकाश बाळ जोशी यांची पेंटिंग पाहतांना मला जगप्रसिद्धकलंदर कलाकार सात्वादोर डाली यांचे एक वाक्य आठवते ----

रंग आणि शब्द हे नेहमीच अव्यक्तातून व्यक्त होत असतात.

अनिल किणीकर हे लिटील मॅगेझीन चळवळीतील आघाडीचेसंपादक आणि लेखक. 

 

 

 


अनिल किणीकर

Top Features

 

Feature 1

बसोली : शैली नव्हे चळवळ !

अधिक वाचा

Feature 2

वासुदेवाय नमः

अधिक वाचा

Feature 3

निसर्गशिल्पा

अधिक वाचा

Feature 4

चित्रकार की चित्रविक्रेता?

अधिक वाचा

Feature 5

डॉक्टर चित्रकार बनतो त्याची गोष्ट...

अधिक वाचा
12345678910...