Enquire Now

Request A Quote

मे मध्ये जेजे जगी जगले... प्रसिद्ध होणार !

'चिन्ह'च्या महत्वाकांक्षी 'जेजे जगी जगले ... ' ग्रंथाची खूप लांबलेली जुळवाजुळव आता आवाक्यात आली आहे आणि हा ग्रंथ याच वर्षात म्हणजेच २०२० सालातल्या मे महिन्यात मुंबईत होणाऱ्या एका मोठ्या समारंभात प्रसिद्ध करणार आहोत, हे जाहीर करायला आम्हाला आनंद होतो आहे. नाही म्हटले तरी या ग्रंथाचे काम सतत येणाऱ्या अडीअडचणींमुळे खूपच लांबले. आता मात्र त्या साऱ्याच्या साऱ्या दूर झाल्या आहेत. कालच्या एक तारखेपासून संपादनाचे काम रीतसर सुरु झाले आहे. २४ फेब्रुवारीपासून या ग्रंथाच्या डिझायनींगला देखील सुरुवात होईल. एप्रिल महिना आम्ही छपाईसाठी ठेवला आहे आणि मे महिन्यात प्रकाशन समारंभाचा मोठाच बार उडवायचं नक्की केलं आहे. 

फायनली या ग्रंथात आता विश्वास यंदे ( जमशेटजी  जीजीभाई ), चिंतामण गोखले ( ग्लॅडस्टन सॉलोमन), बी डी शिरगांवकर ( जेजेचा सुवर्णकाळ), शशिकांत सावंत ( रापण आणि कलामंदिरातील एकेचाळीस वर्ष ), सुभार्या पळशीकर आणि शील सडवेलकर ( डीन बंगल्यातले दिव), आशुतोष आपटे ( मुक्काम पोस्ट जेजे कॅम्पस),माणिक वालावलकर ( देवदत्त पाडेकर आणि जेजे स्कूल ), अरविंद हाटे ( शंकर पळशीकर), सुधाकर लवाटे आणि मिनू सडवेलकर (बाबुराव सडवेलकर ), माधुरी पुरंदरे संभाजी कदम ), माधव इमारते ( विश्वनाथ सोलापूरकर ) या जेजे संदर्भातल्या विविध विषयांवरील लेखांसोबत या ग्रंथाला ज्या लेखमालेचे शीर्षक दिले त्या 'जेजे जगी जगले... '  या  विशेष सदरात जेजेत शिक्षण घेतलेल्या पण चित्रकलेपेक्षा अन्य क्षेत्रातच प्रचंड नाव कमावलेल्या भानू अथैया ( वेशभूषा ), विद्या चव्हाण ( राजकारण ), मनोज जोशी, संदीप कुलकर्णी, अमिता खोपकर, ( अभिनय ), चंद्रशेखर गोखले ( काव्य लेखन ) या नामवंतांच्या 'चिन्ह'च्या २००१ ते २०१२ या अंकात प्रसिद्ध झालेल्या आत्मकथनांचा समावेश आहे.  

या ग्रंथाचं संपादन करीत असताना 'जेजे जगी जगले... ' या लेख मालिकेत अनेक नामवंतांच्या नावाची अनुपस्थिती आम्हाला जाणवली म्हणूनच आम्ही एक नाही दोन नाही जवळजवळ दोन डझन नावांचा या ग्रंथात समावेश केला. उदाहरणार्थ गंगाराम गवाणकर ( नाट्य लेखन ), पं.शरद साठे ( शास्त्रीय गायन ) , श्यामसुंदर जोशी (ग्रंथ चळवळ ), अमोल पालेकर ( अभिनय दिग्दर्शन ),  सुचेता भिडे - चाफेकर ( नृत्य ), प्रदीप मुळ्ये ( नेपथ्य )विनय नेवाळकर ( चित्रनिर्मिती ), दीपक घारे ( साहित्य आणि कलासमीक्षक ), सतीश पुळेकर (अभिनय ), संजय पवार (  लेखन, पटकथालेखन  ), नितीन चंद्रकांत देसाई (सेट डिझायनींग ), महेश लिमये ( दिग्दर्शन, छायालेखन ), रवी जाधव, गिरीश मोहिते ( चित्रपट दिग्दर्शन ), सुप्रिया मतकरी, हेमांगी कवी (अभिनय ), संतोष प्रजापती ( प्रोडक्शन डिझायनर ) आणि प्रिया तेंडुलकर ( लेखन अभिनय ) वगैरे  वगैरे असं बरंच काही या ग्रंथात खच्चून भरलंय. म्हणजे अगदी ताजं उदाहरण सांगायचं झालं तर प्रख्यात अक्षररचनाकार सुनील धोपावकर आठवणी जागवतायत त्या त्यांच्या वर्गमित्राच्या म्हणजे  महाराष्ट्राचे आजचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या. असं बरंच काही या महाग्रंथात ठासून भरलंय. 

तुम्ही तुमची प्रत नोंदवली आहे का ? नसेल तर आज नव्हे, आत्ताच नोंदवा. सवलत योजना चालू आहे. एक हजार प्रतींच्या आवृत्तींमधल्या सुमारे ८०० प्रती आधीच नोंदल्या गेल्या आहेत. सवलत योजनेत लगेचच सहभागी झाला तर रु ३००० चा ग्रंथ तुम्हाला अवघ्या रु २००० मध्येच घरपोच मिळू शकेल. मागणी नोंदवण्यासाठी 90040 34903 या व्हाट्सअप नंबरवर 'J J ' हा संदेश नाव पत्त्यासह पाठवा. 
संपादक 

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...