Enquire Now

Request A Quote

कला संचालनालयाचा विजय असो !

''महा कॅटना'' या चित्रकला शिक्षकांच्या संघटनेनं काल कला संचालनालयाच्या आवारात जे आंदोलन केलं त्याचा वृत्तांत नेहमीप्रमाणेच कुठल्याही वृत्तपत्रात आला नाही. चित्रकला शिक्षकांच्या बातम्या ते स्वतः देखील वाचत नाहीत तर अन्य वाचक का वाचणार ? असा बहुदा पत्रकारांचा दृष्टिकोन त्या बातम्या न देण्यामागे असावा. 

वृत्तपत्र व्यवसायाशी बराच काळ संबंध आल्यामुळे माझं हे विधान कुणी सहजा सहजी खोडून काढू शकणार नाही, पण ते असो ! पण दोन वृत्तपत्रांच्या ऑनलाईन आवृत्त्यांनी मात्र हे आंदोलन कव्हर केलं ( कमाल आहे !). त्या बातम्यांची क्लिप कुणीतरी पाठवली, म्हणून ती बघता तरी आली. पण मला वाटत नाही की आंदोलनातील मंडळींखेरीज कुणी त्या बातम्या बघितल्या असाव्यात. 

पण त्या बातम्या बघण्याजोगत्या जरूरच आहेत अवश्य बघा. खूप खपाचा दावा करणाऱ्या एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी सदर बातमी देताना जो काही गोंधळ घातला आहे तो खरोखरच पाहण्यासारखा होता. '' ज्या आवारात ती बातमी चित्रित केली गेली त्या आवाराचं कला संचालनालय हे नाव देखील त्या बिचाऱ्याला धडपणे उच्चारता येत नव्हतं. ते उच्चारताना त्याची जी त्रेधातिरपीट उडत होती ती पाहताना त्याची आणि त्याला ती कव्हर करण्यासाठी पाठवणाऱ्या ज्येष्ठ पत्रकाराची कीव करावीशी वाटत होती. 

या बातमीत ती कव्हर करणाऱ्याने आणि ज्यांचा बाईट ते घेत होते त्याने किती वेळा ''या ठिकाणी, त्या ठिकाणी'' या शब्द प्रयोगांचा वापर केला तो पाहून असल्या अर्धवट पत्रकारितेची अक्षरशः किळस आली. 

खरं तर ज्यांनी या अत्यंत चुकीच्या शब्द प्रयोगांना आपल्या भाषणात स्थान देण्यास सुरुवात केली त्यांना तेव्हाच आवरले गेले असते तर ( पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ? ) नंतर जे त्यांच्या फटावळीनं हे शब्दप्रयोग सतत वापरून रूढ केले ते झाले नसते. आता तर दांडके हातात घेतलेल्या साऱ्याच पत्रकारांनी आपल्या बाइट्समध्ये सतत हे शब्द वापरून मराठी भाषेची अक्षरशः आयझेड केली आहे ( खरं तर हे निषिद्ध शब्द वापरण्याची वेळ आली नसती तर बरं झालं असतं, पण आता प्रकरण अगदीच हाताबाहेर गेलं आहे. ज्यांचा शब्दाशी संबंध नाही, साहित्याशी संबंध नाही असे चित्रकला शिक्षक देखील काल ''या ठिकाणी, त्या ठिकाणी'' ज्या पद्धतीनं वापरत होते ते पाहून हे विष किती खोलवर भिनलं गेलं आहे याची कल्पना येऊन तळपायाची आग अगदी मस्तकात गेली आहे. असो.) बाकी कालच्या त्या बातम्यांविषयी काय बोलावं ? आंदोलनातले नेते आणि आंदोलक चक्क घोषणा देताना म्हणाले की, ''कला संचालनालयाचा विजय असो !'' ते पाहिलं आणि अक्षरशः कपाळावर हात मारून घेतले. बाकी त्यात लिहिण्यासारखे काही नव्हतेच. 

Top News

 

News 1

कला संचालनालयाचा विजय असो !

Read More

News 2

होय, महाराष्ट्रातलं कलाशिक्षण संपलंय !

Read More

News 3

वीरगळ आणि सतीशिळांचा अव्याहत शोध !

Read More

News 4

आता भेट दर पंधरवड्याला !

Read More

News 5

सुवर्णमहोत्सवी गच्चीवरील गप्पा !

Read More
12345678910...