Enquire Now

Request A Quote

होय, महाराष्ट्रातलं कलाशिक्षण संपलंय !

कलाशिक्षण महाचर्चा चालू असताना आम्ही कलाशिक्षणासंदर्भात एक पाहणी केली होती. त्या पाहणीतला प्रश्न अगदी मूलभूत होता. उदाहरणार्थ, ''''''''महाराष्ट्रातील कलाशिक्षण संपलं आहे का?'''''''' या प्रश्नाला ६४ टक्के लोकांनी उत्तर दिलं होतं ''''''''होय संपलं आहे'''''''', तर ३६ टक्के लोकांनी दिलेलं उत्तर होतं ''''''''नाही''''''''. खरंतर आम्हाला यातून काही एक सिद्ध करायचं नव्हतं, पण कोणे एके काळी भारतात पहिल्या क्रमांकावर असलेल्या कलाशिक्षणाबद्दल आज जनमानसात काय भावना आहेत याचं दर्शन मात्र आम्हाला निश्चितपणे घडवायचं होतं. तंत्रशिक्षण खात्याच्या निबर आणि निर्ढावलेल्या यंत्रणेला यामुळे काही फरक पडणार नाही हे ही आम्हाला ठाऊक आहे. पण यातून आम्ही नेमकं काय साध्य करू इच्छितो ? तर आम्ही साध्य करू इच्छितो जनजागृती. जिचा प्रारंभ २००८-०९ साली ''''''''कालाबाजार'''''''' अंकानं झाला. तर दुसरा टप्पा ''''''''कलाशिक्षण महाचर्चे''''''''नं ओलांडला. तो ओलांडत असताना आज आम्ही खात्रीनं सांगू शकतो की, आज महाराष्ट्रातले बहुसंख्य कलामहाविद्यालयाचे प्राचार्य, कलाशिक्षक, कलाशिक्षकेतर कर्मचारी आणि कलाविद्यार्थी इतकंच नाही तर, संवेदनशील कलाकार आज आमच्यासोबत आले आहेत.

उद्यापासून सुरु होणाऱ्या ''''''''कलाशिक्षण महाचर्चा : भाग दोन'''''''' या पाक्षिक कार्यक्रमानं या साऱ्याचंच दर्शन आपल्याला घडू शकेल. तूर्त इतकंच, बाकी सारे उद्या संध्याकाळच्या यु ट्यूबवरच्या भेटीत थेट प्रत्यक्ष बोलूच. अवश्य हजर राहा. इतकंच नाही तर आपल्या परिचयातील या क्षेत्राशी संबंधित व्यक्तीला कळवायला मात्र अजिबात विसरू नका. एकच गोष्ट लक्षात ठेवा, ''''''''आता नाही तर कधीच नाही''''''''.
''''चिन्ह''''''''च्या यु ट्यूबव चॅनलला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

Top News

 

News 1

कला संचालनालयाचा विजय असो !

Read More

News 2

होय, महाराष्ट्रातलं कलाशिक्षण संपलंय !

Read More

News 3

वीरगळ आणि सतीशिळांचा अव्याहत शोध !

Read More

News 4

आता भेट दर पंधरवड्याला !

Read More

News 5

सुवर्णमहोत्सवी गच्चीवरील गप्पा !

Read More
12345678910...