Enquire Now

Request A Quote

आता भेट दर पंधरवड्याला !

''कलाशिक्षण महाचर्चा'' इतकी गाजेल असं खरोखरच वाटलं नव्हतं. पण तिला अभूतपूर्व यश लाभलं खरं. आजही त्यातले असंख्य व्हिडिओज जगभरातल्या कला रसिकांकडून नियमितपणे पाहिले जातात याचं श्रेय त्या महाचर्चेत सहभागी झालेल्या साऱ्याच कलाशिक्षकांकडे जातं. 

''चिन्ह''च्या २००८ सालच्या कालाबाजार अंकाद्वारे आम्ही चित्रकला शिक्षणामधला काळाबाजार उघडकीला आणला. त्या अंकात देखील वस्तुनिष्ठ चर्चा घडवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. पण आम्ही घडवलेल्या काळाबाजाराच्या स्फोटाचा आवाजच इतका मोठा होता की, त्या चर्चेकडे बहुसंख्यांचं दुर्लक्षच झालं. 

यावेळी मात्र आम्ही विशेष काळजी घेतली होती आणि सारं लक्ष कलाशिक्षणातील मूलभूत बाबींकडेच वेधण्याचं निश्चित केलं होतं आणि ते यशस्वी देखील ठरलं. साहजिकच त्यामुळे कलाशिक्षण क्षेत्रातील वैचारिक मांडणी करणाऱ्या कलाशिक्षकांचा स्तर देखील महाराष्ट्रासमोर आला.  

आता इतकं सारं केल्यानंतर ते निर्णय प्रक्रियेच्या टोकावर नेलं नसतं तर, या साऱ्या करण्याला काहीही अर्थ राहिला नसता. हे उघड होतं. सुदैवानं प्रभारी कला संचालक राजीव मिश्र यांनी या साऱ्याला मान्यता दिली आणि काहीतरी घडू पाहतंय अशी परिस्थिती निर्माण झाली. जिच्याकडे महाचर्चेमधे सहभागी झालेले सारेच अध्यापक मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत. इतकंच नाही तर, त्यात असंख्य नवे लोक सहभागी होऊ पाहत आहेत. 

या साऱ्याच प्रयत्नांना एक दिशा मिळावी, विचार करणाऱ्यांना आणि ते मांडू पाहणाऱ्यांना एक व्यासपीठ मिळावं या हेतूने आम्ही सदर महाचर्चा दर पंधरवड्याला आयोजित करणार आहोत. इथून पुढं या प्रश्नांची तड लागेपर्यंत दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी सायंकाळी पाच वाजता यु ट्यूबवरील ''चिन्ह''च्या चॅनेलवर हे कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत. गरज भासल्यास हे कार्यक्रम आम्ही दर आठवड्याला देखील आयोजित करू. कारण यु ट्यूब हे माध्यम दिवसेंदिवस अधिकाधिक प्रभावी होत चाललं आहे. यावर मांडलेले प्रश्न समाजाच्या सर्वच स्तरांवर पोहोचू लागले आहेत. म्हणूनच आम्ही या माध्यमाचा अत्यंत प्रभावीपणे वापर करण्याचं ठरवलं आहे.  

पहिला कार्यक्रम आहे अर्थतच आमचे मित्र शिरीष मिठबावकर यांच्या बरोबरच्या गप्पांचा. याच मिठबावकर यांनी कला अध्यापकांच्या पाचव्या वेतन आयोगाचा प्रश्न सोडवण्यात मोठा पुढाकार घेतला होता. याच मिठबावकर यांनी ''महाचर्चे''च्या कार्यक्रमात कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे घेतले जाणारे सारेच अभ्यासक्रम अधिकृत नाहीत याचा गौप्यस्फोट केला होता, ज्यानं अनेकांच्या मेंदूला झिणझिण्या आल्या होत्या. हेच मिठबावकर ''पाक्षिक महाचर्चे''च्या पहिल्या कार्यक्रमात महाराष्ट्रात कलाशिक्षण का घ्यावं, कधी घ्यावं, कसं घ्यावं, कुठे घ्यावं, इतकंच नाही तर, कुठे घेऊ नये या विषयांवर जाहीरपणे बोलणार आहेत. 
पाहायला विसरू नका. 

आमची एक विनंती आहे, तुम्ही जर कला किंवा कलाशिक्षण क्षेत्राशी विद्यार्थी, शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, कर्मचारी किंवा पालक या नात्यानं संबंधित असाल तर आमची पोस्ट जास्तीत जास्त शेयर करायला विसरू नका. त्यामुळे तंत्रशिक्षण खातं, महाराष्ट्र राज्य यांच्यावर निश्चितपणे दडपण येईल याची आम्हाला खात्री आहे. 

Top News

 

News 1

कला संचालनालयाचा विजय असो !

Read More

News 2

होय, महाराष्ट्रातलं कलाशिक्षण संपलंय !

Read More

News 3

वीरगळ आणि सतीशिळांचा अव्याहत शोध !

Read More

News 4

आता भेट दर पंधरवड्याला !

Read More

News 5

सुवर्णमहोत्सवी गच्चीवरील गप्पा !

Read More
12345678910...