Enquire Now

Request A Quote

सुवर्णमहोत्सवी गच्चीवरील गप्पा !

''''गच्चीवरील गप्पा'''' सुरु झाल्याला आता तब्बल एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात जे काही महत्वाचे कलाविषयक कार्यक्रम समाज माध्यमांवर सुरु झाले, त्यात ''''गच्चीवरील गप्पां''''चा उल्लेख वरच्या श्रेणीत नक्कीच करता येईल. अत्यंत धकाधकीच्या आणि अत्यंत तणावानं भरलेल्या आजच्या आपल्या आयुष्यात दर आठवड्याला एखादा कार्यक्रम पाहायला किंवा ऐकायला दोन दोन तास खर्ची करणं हे केवळ दुरापास्तच होतं. पण ''''गच्चीवरील गप्पां''''नी मात्र विक्रमच केला. 

एखादी रंगलेली बातचीत त्याच दिवशी लाईव्ह नाही तर नंतर देखील काही काळ किंबहुना बराच काळ ती पाहिली जावी किंवा जाते हा अनुभव केवळ अपूर्व होता. वीज गेल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्याची वेळ एकदाच आली, तो अपवाद सोडला तर ''''गच्चीवरील गप्पां''''चे सारे कार्यक्रम सलग असे पार पडले. येत्या ११ सप्टेंबर रोजी या ''''गप्पां''''ची पन्नाशी साजरी होणार आहे. या ५०व्या कार्यक्रमात ज्यांनी प्रामुख्यानं तरुण चित्रकारांना धडधडून बोलतं करण्याचं अवघड काम पार पाडलं त्या ''''चिन्ह''''च्या संपादक सतीश नाईक यांच्याशीच बातचीत केली जाणार आहे. प्रा. नीतिन आरेकर यांनी सतीश नाईक यांना हा कार्यक्रम करण्यासाठी प्रवृत्त केलं. सुरुवातीचा काही काळ ते या कार्यक्रमाच्या सादरीकरणात ते सहभागी देखील होते. त्यामुळे श्री नाईक यांच्याशी बातचीत करण्यासाठी प्रा. आरेकर यांचीच निवड करण्यात आली आहे. दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०५.०० वाजता होणारा हा अनोखा कार्यक्रम ऐकायला, पाहायला विसरू नका.

Top News

 

News 1

कला संचालनालयाचा विजय असो !

Read More

News 2

होय, महाराष्ट्रातलं कलाशिक्षण संपलंय !

Read More

News 3

वीरगळ आणि सतीशिळांचा अव्याहत शोध !

Read More

News 4

आता भेट दर पंधरवड्याला !

Read More

News 5

सुवर्णमहोत्सवी गच्चीवरील गप्पा !

Read More
12345678910...