Enquire Now

Request A Quote

येत्या गच्चीवरील गप्पांमध्ये सचिन निंबाळकर !

''''चिन्ह'''' प्रस्तुत ''''गच्चीवरील गप्पां''''च्या ४९व्या भागात, म्हणजेच ४ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ०५.३० वाजता आपण भेटणार आहोत पुण्याच्या एका चळवळ्या तरुण चित्रकाराला. त्यांचं नाव आहे सचिन निंबाळकर. चित्र काढण्यासोबत नानाविध गोष्टी ते करीत असतात. २०२० साली त्यांना टागोर राष्ट्रीय प्रदर्शनात त्यांच्या चित्राला ५०,००० रुपयांचं पारितोषिक देखील मिळालं आहे. त्याच्या एका ''''संवाद'''' नावाच्या चित्रमालिकेत भारतीय लघुचित्र शैलीची परंपरा सांगणारी त्याची चित्रं आहेत. प्रामुख्याने नग्न स्त्री - पुरुषांचं चित्रण ते या मालिकेत करतात. ''''मी नागडं शरीर नाही रंगवत, नागडा विचार रंगवतो'''' असं ते बेधडकपणे विधान करतात. पुण्यात साकारल्या जाणाऱ्या एका खूप मोठ्या कलाविषयक प्रकल्पात सचिन सहभागी झाले आहेत. त्यासंदर्भात बोलण्यासाठीच ''''चिन्ह''''नं त्यांना ४९व्या ''''गच्चीवरील गप्पां''''मध्ये आमंत्रित केलं आहे. ऐकायला, पाहायला विसरू नका. 

शनिवार, ४ सप्टेंबर २०२१
सायंकाळी ०५.३० वाजता 

Top News

 

News 1

कला संचालनालयाचा विजय असो !

Read More

News 2

होय, महाराष्ट्रातलं कलाशिक्षण संपलंय !

Read More

News 3

वीरगळ आणि सतीशिळांचा अव्याहत शोध !

Read More

News 4

आता भेट दर पंधरवड्याला !

Read More

News 5

सुवर्णमहोत्सवी गच्चीवरील गप्पा !

Read More
12345678910...