Enquire Now

Request A Quote

जेजे सारख कॅम्पस अख्ख्या जगात नाही...

कालचा कार्यक्रम अपेक्षेपेक्षाही जास्त रंगला. तब्बल तीन तासांहून अधिक चालला. बहुसंख्य प्रेक्षक श्वास रोखून एकाग्रपणे सारं ऐकत होते. मला नाही पण माझ्या सहकाऱ्यांना ते संगणकामधूनच जाणवत होतं. यु ट्यूबमधला डोळा तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी जाणवून देत असतो. संतोष क्षीरसागर बोलत होते देखील अगदी रंगून जाऊन. त्यामुळे त्यात विक्षेप आणणं मला काही योग्य वाटलं नाही किंवा मला पडलेले अनेक प्रश्न इथं मांडणं देखील योग्य वाटलं नाही. ते सरकारी नोकरीत आहेत याचं भान ठेवणं मला आवश्यक वाटत होतं. त्यामुळे की काय, झालं असं, उपयोजित कलेच्या क्षेत्रातले अनेक किंवा कॅलिग्राफी मधले असंख्य पदर अलगद उलगडले गेले. पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या देखील सतत वाढत गेली. ती बहुदा त्याचमुळे असावी. 

प्रश्न फारसे आले नाहीत, पण प्रतिक्रिया मात्र खूपच आल्या. चित्रकलाक्षेत्राविषयी मी इतक्या अधिकारवाणीनं कदाचित सांगू शकणार नाही ( किंवा सांगितलं तर ते अधिक कठोर ठरेल ), पण नाटक, चित्रपट, संगीत, साहित्य, नृत्य इत्यादी कलांमध्ये आस्था असणाऱ्या असंख्य कलारसिकांना एका वेगळ्या विश्वाची ओळख काल झाली यात शंकाच नाही. रात्री उशिरापर्यंत ती दखल घेणारे व्हॉट्सअप मेसेजेस येतच राहिले. मला वाटतं कालच्या कार्यक्रमाबाबत यातच सारे आले. आणखीन एक सांगायचं तर, कार्यक्रम संपला तेव्हा सुमारे ५३० रसिकांनी कार्यक्रम पाहण्याची नोंद यु ट्यूबनं केली होती. नंतरच्या अवघ्या तासातच १००० कलारसिकांना कार्यक्रम पाहिल्याची नोंद झाली. आज सकाळी ०९.१० ला म्हणजेच बरोबर १२ तासांनी तीच संख्या १६१९ इतकी प्रचंड झाली होती. आणि आता १६४४ इथपर्यंत ती पोहोचली आहे. महाचर्चेतील अन्य व्हिडीओजना देखील तसाच प्रतिसाद मिळत चालला आहे ही स्वागतार्ह गोष्ट आहे. 

आज आपण भेटणार आहोत तरुण चित्रकार देवदत्त पाडेकर याला. जेजे स्कूल ऑफ आर्टची संपूर्ण वाताहत ज्या काळात झाली त्या काळातच त्यानं त्याचं जेजेतलं शिक्षण पूर्ण केलं. अन्य गोष्टींकडे लक्ष न देता फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं असं ठरवून त्याने ( पाच वर्ष हा गडी एकदाही कँटीनमध्ये फिरकला नाही ) आपलं शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलं. घरातून चित्रकार आई - वडिलांचं मार्गदर्शन त्याला झालंच, हे नाकारता येणार नाही. पण कुठल्याही शिक्षणबाह्य, कलाबाह्य गोष्टींकडे लक्ष न देता आपलं इप्सित कसं पूर्ण करायचं याचं एक आदर्श उदाहरण त्याने दाखवून दिलं. आज कोरोनामुळे तो काही काळ भारतात थांबलाय, अन्यथा तो जगभर फिरत असतो, चित्र काढत असतो, प्रदर्शनं भरवत असतो, मोठ्या मोठया कलाविषयक नियतकालिकांना मुलाखती देत असतो, तो सांगतो, " जेजे सारखा कॅम्पस अख्ख्या जगात कुठंही नाही " आणि आमचे करंटे शिक्षणमंत्री विचारात होते, " जेजे बंद झालं तर कुणाचं काय बिघडणार आहे ? " त्यांच्या या एका वाक्यानंच ''कालाबाजार'' अंकाचा जन्म झाला. आज देवदत्त त्याचे जगभरात फिरताना आलेले अनुभव कथन करणार आहे. किमान ते ऐकून तरी संबंधितांचे डोळे उघडले तर उघडले. पाहूया ! पण आज संध्याकाळी ५ वाजता ऐकायला, पाहायला विसरू नका. 

Top News

 

News 1

कला संचालनालयाचा विजय असो !

Read More

News 2

होय, महाराष्ट्रातलं कलाशिक्षण संपलंय !

Read More

News 3

वीरगळ आणि सतीशिळांचा अव्याहत शोध !

Read More

News 4

आता भेट दर पंधरवड्याला !

Read More

News 5

सुवर्णमहोत्सवी गच्चीवरील गप्पा !

Read More
12345678910...