Enquire Now

Request A Quote

अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आज मिळतील ?

कालची महाचर्चा तब्बल अडीच तासापेक्षा देखील जास्त चालली, खूप  रंगली. महाचर्चेचा प्रत्येक दिवस चढत्या श्रेणीनच रंगत जातो आहे. काल रचना संसदचे प्राचार्य कला अभ्यासक महेंद्र दामले यांच्या अतिशय अभ्यासपूर्ण आणि अत्यंत सुस्पष्ट अशा उत्तरांमुळे तर कळसच गाठला. मोठ्या प्रमाणावर प्रश्न आले, पण प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न केला. 

त्या कार्यक्रमाविषयी लिहिताना काल आम्ही ''''रचना संसद''''चा विशेषत्वानं उल्लेख केला होता. त्याला कारण हेच होतं की केवळ याच संस्थेकडे आता चांगल्या कार्यकर्त्यांसोबत पुरेशी साधन संपत्ती देखील आहे आणि शिक्षणाविषयी कळकळ देखील आहे. इतकंच नाही तर स्वतःची सुसज्ज वास्तू देखील आहे आणि मुख्य म्हणजे सतत काहीतरी नवं आणि चांगलं घडवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यांना साथ लाभली आहे ती महेंद्र दामले यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची आणि म्हणूनच भविष्यात या संस्थेकडून कलाशिक्षणाबाबत ठोस असं काही तरी घडेल अशी अपेक्षा आहे. ''''महाचर्चे''''मध्ये त्यांची निवड त्याच हेतूने केली होती. कालच्या रंगलेल्या चर्चेने ती सार्थ होती हे देखील लगेचच सिद्ध झालं. 

आज आपण भेटणार आहोत आणखीन एका गिरगावकरांना. (दामले हे देखील मूळचे गिरगावचेच) आज ज्यांना आपण भेटणार आहोत ते जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे प्राचार्य संतोष क्षीरसागर हे देखील गिरगावचेच. गिरगावच्या इतिहासात ज्या भागाला सांस्कृतिक महत्त्व आहे त्या गोरेगावकर लेनचे. ते मूळचे जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचेच विद्यार्थी. अतिशय संघर्षपूर्वक त्यांनी आपलं आजचं स्थान मिळवलं आहे. त्यांची नुसती जंत्री द्यायचं म्हटलं तरी त्याची व्याप्ती एका भल्या थोरल्या लेखाची होईल. आज त्यांच्याच तोंडून आपण त्यांचा आजवरचा संघर्ष, आजवरची धडपड जाणून घेणार आहोत. त्यामुळे इथं आणखीन लिहून आम्ही आपला वेळ घेऊ इच्छित नाही. 

जसजशी महाचर्चा शेवटाकडे येत चालली आहे तसतशी अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला नव्याने मिळू लागली आहेत. कदाचित आज देखील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. पाहूया काय होतं. संध्याकाळी ५ वाजता ऐकायला, पाहायला विसरू नका. 

Top News

 

News 1

कला संचालनालयाचा विजय असो !

Read More

News 2

होय, महाराष्ट्रातलं कलाशिक्षण संपलंय !

Read More

News 3

वीरगळ आणि सतीशिळांचा अव्याहत शोध !

Read More

News 4

आता भेट दर पंधरवड्याला !

Read More

News 5

सुवर्णमहोत्सवी गच्चीवरील गप्पा !

Read More
12345678910...