Enquire Now

Request A Quote

आज आणखी एक वादग्रस्त विषय ?

आज आपण कलाशिक्षणासंदर्भात ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्या आहेत डॉ. मंजिरी ठाकूर. जेजेमधून बीएफए केलेल्या मंजिरी ठाकूर यांनी मुंबई विद्यापीठातून एन्शन्ट इंडियन कल्चर या विषयावर पीएचडी केली आहे. माझी माहिती चुकत नसेल तर बहुदा त्या मुंबई विद्यापीठातून पीएचडी करणाऱ्या जेजेतल्या पहिल्या विद्यार्थिनी असाव्यात. ( चूक भूल द्यावी घ्यावी ) नंतर अनेकांनी पीएचड्या केल्या, पण त्या कुठल्या कुठल्या राज्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या कुठल्या कुठल्या विद्यापीठातून, त्यामुळे त्यांच्या या पीएचडीचं महत्त्व विशेष. रचना संसदच्या फाईन आर्ट विभागाचं प्रमुख पद तसेच नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मुंबईचं क्युरेटर पदही त्यांनी काही काळ भूषवलं, पण त्या अधिक रमल्या त्या मात्र कलाइतिहासातच. 

''''चिन्ह''''नं ''''गच्चीवरील गप्पां''''मध्ये त्यांना निमंत्रित केलं होतं. त्यांची ती मुलाखत अतिशय गाजली. नानाविध आजारपणावर मात करून त्यांनी ज्या पद्धतीनं आपला विद्धया व्यासंग वाढवला ते त्यांच्याच शब्दातनं ऐकणं हा एक अनुभवच होता. आजचा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी वेळ मिळाला तर खालील लिंकवर क्लिक करून या ''''गप्पा'''' अवश्य ऐका. म्हणूनच या पोस्टमध्ये त्यांचा अधिक परिचय देणं योग्य वाटत नाही किंवा कार्यक्रमाच्या वेळी पण तो करून दिला जाणार नाही. थेट कलाविषयक प्रश्नानीच सुरुवात होईल. प्रश्न अर्थातच कलेच्या इतिहासासंदर्भात व सौंदर्य शास्त्र आणि संस्कृतीची जडण घडण तसेच कलामहाविद्यालय चालवताना आलेले व्यवस्थापना संदर्भातले अनुभव याविषयी असतील याची खात्री बाळगा. 

''''कलाशिक्षण : काल, आज आणि उद्या'''' या महाचर्चेतला हा अगदी महत्वाचा विषय आहे, पण या विषयाची गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात अत्यंत हेळसांड झाली आहे. अनेक कलामहाविद्यालयांच्या संचालकांनी तर कलाइतिहास, सौंदर्यशास्त्र यासारखे कला अभ्यासातले अत्यंत महत्त्वाचे झुंडशाही करून शासनास काढावयास भाग पाडले. कलासंचालनालयाच्या बिनडोक अधिकाऱ्यांनी आणि मद्दड मंत्र्यांनी कुठलाही विचार न करता हे निर्णय घेऊन टाकले. त्यावरही या संदर्भात प्रश्न विचारले जावे अशी अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं ?

तर भेटूया आज संध्याकाळी ५ वाजता आपल्या ''''चिन्ह''''च्या यु ट्यूब चॅनलवर डॉ. मंजिरी ठाकूर यांच्याशी गप्पा मारायला, प्रश्न विचारायला. 

Top News

 

News 1

कलाशिक्षण, कॅलीग्राफी आणि तबला !

Read More

News 2

आज आणखी एक वादग्रस्त विषय ?

Read More

News 3

महाचर्चा : दुसरा टप्पा मंगळवारी सुरु !

Read More

News 4

अद्भुत प्रतिमा आणि प्रतिभा !

Read More

News 5

महाचर्चा ऐकायचीय ?

Read More
12345678910...