Enquire Now

Request A Quote

महाचर्चा : दुसरा टप्पा मंगळवारी सुरु !

गेल्या आठवड्यातली महाचर्चा रंगली. पण उत्तरार्धाकडे जात असताना एका कार्यक्रमात अचानक काही प्रेक्षक कमी झाल्याचं जाणवलं. आलेल्या प्रतिक्रिया संमिश्र होत्या. उदाहरणार्थ ''पुनरावृत्ती टाळता येणार नाही का'' एखाद्या चर्चेसाठी दोन दोन तास देणं खूप अवघड असतं. त्यामुळे त्याकडे देखील लक्ष देण्याच्या सूचना येत आहेत, त्या आम्ही अंमलात आणायचा प्रयत्न करीत आहोत. प्रेक्षकांना देखील काही सूचना कराव्याशा वाटतात, उदाहरणार्थ बालचित्रकला शिक्षण हा काही आमचा प्रांत नव्हे, त्याविषयीचे प्रश्न आवर्जून टाळायला हवेत म्हणजे आमचाही वेळ वाचेल.
अशा स्वरूपाच्या आयोजनाचा आमचा हा पहिलाच प्रयत्न होता. उद्याच्या मंगळवारपासून याआधी झालेल्या चुका नक्कीच टाळण्याचा प्रयत्न करू. उद्या मंगळवारी शिरीष मिठबावकर यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. तर बुधवारी डॉ. मंजिरी ठाकूर यांच्याशी, गुरुवारी आहेत प्रशांत आचार्य. हे तीनही कलाशिक्षणक्षेत्राच्या वेगवेगळ्या शाखेत प्रदीर्घ अनुभव घेतलेली मंडळी आहेत. त्यांच्याकडून नक्कीच या चर्चेला वेगळं वळण मिळेल याची खात्री आहे. हे तिन्ही कार्यक्रम ठीक पाच वाजता सुरु होतील, प्रत्येक चर्चेसाठी तीन तासाचा वेळ आम्ही राखून ठेवतो, हेतू हा की आलेले सर्वच प्रश्न घेता यावेत. त्यामुळे आपला प्रश्न वाचला जाईल का याबद्दल चिंता करू नका, अवश्य प्रश्न पाठवा. गेल्या तिन्ही कार्यक्रमात आमच्याकडून काहीशा चुका झाल्यात, पण यावेळी मात्र तसं काही होणार नाही याची खात्री देतो.

Top News

 

News 1

कलाशिक्षण, कॅलीग्राफी आणि तबला !

Read More

News 2

आज आणखी एक वादग्रस्त विषय ?

Read More

News 3

महाचर्चा : दुसरा टप्पा मंगळवारी सुरु !

Read More

News 4

अद्भुत प्रतिमा आणि प्रतिभा !

Read More

News 5

महाचर्चा ऐकायचीय ?

Read More
12345678910...