Enquire Now

Request A Quote

अद्भुत प्रतिमा आणि प्रतिभा !

येत्या शनिवारी आणि पुढल्याही ज्या चित्रकाराबरोबर ''चिन्ह''चे संपादक सतीश नाईक हे संवाद साधणार आहेत तो संवाद पाहायला, ऐकायला अजिबात विसरू नका. कारण, या कलावंताला विलक्षण प्रतिभा लाभली आहे. तो मूळचा चित्रकार आहे. त्या आधी कदाचित तो मास्टर क्राफ्ट्समन असावा. तो कुंचल्याइतक्याच सफाईदारपणे सरोद वाजवतो, संतूर वाजवतो, सारंगी देखील वाजवतो. इतकंच नाही तर तबला आणि पखवाज यात देखील तो आपल्या बोटांचं कसब दाखवतो. या सगळ्या वाद्यांचा त्याने शास्त्रोक्त शिक्षण घेतलं आहे. त्याने पीएचडी देखील केली आहे. हे सगळे उफराटे उद्योग तो आपली भारती विद्यापीठातली प्राध्यापकाची नोकरी सांभाळून करत असतो. या सगळ्यावर कळस चढवेल असा एक उद्योग त्याने करून ठेवला आहे. तो केवळ अद्भुत आहे, त्याचं नाव आहे प्रा. डॉ. गिरीश चरवड. मुक्काम अर्थातच पुणे. पण त्याच्याविषयी आम्ही आता अधिक सांगणार नाही. जमलं तर त्याच्याविषयीच्या लेखात उद्या वाचा नाहीच जमलं तर उद्या संध्याकाळी ०५.३० वाजता ''गच्चीवरील गप्पा''मध्ये त्याला भेटायला विसरू नका. 

Top News

 

News 1

वीरगळ आणि सतीशिळांचा अव्याहत शोध !

Read More

News 2

आता भेट दर पंधरवड्याला !

Read More

News 3

सुवर्णमहोत्सवी गच्चीवरील गप्पा !

Read More

News 4

येत्या गच्चीवरील गप्पांमध्ये सचिन निंबाळकर !

Read More

News 5

जेजे सारख कॅम्पस अख्ख्या जगात नाही...

Read More
12345678910...