Enquire Now

Request A Quote

महाचर्चा ऐकायचीय ?

नमस्कार... 

 ''चिन्ह'' तर्फे ''चिन्ह''च्या यु ट्यूब चॅनलवर दि. १३ पासून ३१ जुलै पर्यंत ''कलाशिक्षण'' या विषयावर एक ''महाचर्चा'' होणार आहे. या महाचर्चेत कलाशिक्षण क्षेत्रातील नामवंत मंडळी सहभागी होणार आहेत. कोरोना लॉकडाऊन नंतर कलाशिक्षणाच्या स्वरूपात मोठ्या स्वरूपाचे बदल होण्याची शक्यता आहे. ते बदल कसे असतील? असावेत ? याच दोन मुद्द्यांवर या महाचर्चेमध्ये प्रामुख्याने विचार केला जाणार आहे. तो करीत असताना त्या चर्चेला कुठल्याही पद्धतीनं अकॅडमिक स्वरूप येऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे. 

एखाद्यानं ठरवून कलाशिक्षण क्षेत्रात प्रवेश करणं म्हणजे, कलेचं शिक्षण घेतलेल्या कलावंतांमधून एक कलावंत कमी होणं. खरं तर, त्या कलाशिक्षकांनी केलेला आपल्या कलेचा हा मोठा त्यागच असतो. तो करीत असताना त्याच्या भावना कशा असतात? इथं पासून ते कालांतराने एखादा मोठं नावं कमावलेला हुशार विद्यार्थी जेव्हा अभिमानानं सांगतो की मी त्या अमुक-अमुक सरांचा विद्यार्थी आहे. ते ऐकताना काय भावना असतात? इथं पर्यंतच्या सर्वच प्रश्नांचा ऊहापोह यातल्या प्रत्येक मुलाखतीत केला जाणार आहे. याखेरीज कलाशिक्षण क्षेत्रात परंपरेनं चालत आलेल्या आणि या क्षेत्राची कमतरता दाखवणाऱ्या बाबी. त्यावर उपाय योजना आणि नव्या गोष्टी किंवा प्रयोग अथवा घडवले जाणारे किंवा घडवायला हवेत असे बदल याविषयी देखील या मुलाखतीतले प्रश्न आधारित असणार आहेत. 

ही सर्वच ''महाचर्चा'' कलाशिक्षण क्षेत्राला दिशादर्शन देणारी ठरावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे. या क्षेत्राशी संबंधित विद्यार्थी, अभ्यासक, अध्यापक, प्राध्यापक, कर्मचारी आणि भविष्यात या क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक तसेच कलाशिक्षणविषयी आस्था असलेले कलावंत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांचं बोट धरून विद्यार्थी पहिल्यांदा चित्र काढावयाचा प्रयत्न करतो असे प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांमधील कलाशिक्षक या सर्वांसाठीच ती भविष्यात उपयोगी ठरावी या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. ती यु ट्यूब चॅनलवर ठेवण्यामागे देखील हाच उद्देश आहे की ती जास्तीत जास्त संबंधितांपर्यंत पोहचावी. त्यासाठीच हे आवाहन करतो आहोत.

 ज्यांना या महाचर्चेतील प्रत्येक मुलाखत ऐकायची किंवा पाहावयाची आहे, त्यांनी ''चिन्ह''च्या   90040 34903 या व्हाट्स अँप नंबरवर CHARCHA BG हा संदेश स्वतःच्या नामोल्लेखासह पाठवावा म्हणजे आम्ही या महाचर्चेतील प्रत्येक लाईव्ह कार्यक्रमाच्या लिंक्स कार्यक्रमाच्या दोन तास आधी पाठवू.

सर्व मुलाखती ऐकणाऱ्यांना किंवा पाहणाऱ्यांना निमंत्रितना जर काही प्रश्न विचारायचे असतील, आपली मतं मांडायची असतील, तर ''चिन्ह''च्या वर दिलेल्या नंबरवर ते मांडता येतील. याचीही कृपया नोंद घ्यावी. 

Top News

 

News 1

वीरगळ आणि सतीशिळांचा अव्याहत शोध !

Read More

News 2

आता भेट दर पंधरवड्याला !

Read More

News 3

सुवर्णमहोत्सवी गच्चीवरील गप्पा !

Read More

News 4

येत्या गच्चीवरील गप्पांमध्ये सचिन निंबाळकर !

Read More

News 5

जेजे सारख कॅम्पस अख्ख्या जगात नाही...

Read More
12345678910...