Enquire Now

Request A Quote

कलाशिक्षणाची महाचर्चा यु ट्यूबवर !

कोणे एके काळी देशातील सर्वच राज्यात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राच्या चित्रकला शिक्षणाची आजची अवस्था पाहून ''''चिन्ह''''नं ''''गच्चीवरील गप्पा'''' या आपल्या लोकप्रिय लाईव्ह कार्यक्रमात एक "कलाशिक्षण : काल, आज आणि उद्या" या विषयावर एक महाचर्चा घडवून आणण्याचं ठरवलं आहे. 

मंगळवार, दि. १३ जुलै २०२१ पासून ''''चिन्ह''''च्या यु ट्यूब चॅनलवर ''''गच्चीवरील गप्पां''''चं हे विशेष लाईव्ह प्रसारण सुरु होणार आहे. १३ जुलै रोजी बडोद्याचे कलाशिक्षण तज्ज्ञ डॉ. दीपक कन्नल यांच्या सोबतच्या ''''गप्पां''''नी या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे तर समारोप याच शिक्षण व्यवस्थेतून तयार झालेल्या देवदत्त पाडेकर यांच्यासोबतच्या गप्पांनी होणार आहे. 

१४ जुलै रोजी पुण्याचे कलाशिक्षण तज्ज्ञ प्रा. डॉ. सुभाष य. पवार, १५ जुलै रोजी चित्रकार रंजन जोशी, २० जुलै रोजी शिरीष मिठबावकर, २१ जुलै रोजी डॉ. मंजिरी ठाकूर, २२ जुलै रोजी प्रशांत आचार्य, २७ जुलै रोजी मीनल जोशी, २८ जुलै रोजी महेंद्र दामले, २९ जुलै रोजी डॉ. संतोष क्षीरसागर, या कलाशिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, जाणकार आणि अनुभवी व्यक्तींसोबत www.chinha.co.in चे संपादक सतीश नाईक हे अनौपचारीक गप्पागोष्टीतून महाराष्ट्राच्या कलाशिक्षण व्यवस्थेची सर्व अंग उलगडणार आहेत. 

कलाशिक्षण क्षेत्राशी जवळून संबंध आलेल्या सुवर्णरेहा जाधव या सर्वच कार्यक्रमांमधले मान्यवर आणि प्रेक्षकांशी विशेषतः विद्यार्थी - पालकांशी संवाद साधणार आहेत. या विशेष प्रसारणाचा समारोप शनिवार, दि. ३१ जुलै रोजी नेहमीच्या ''''गच्चीवरील गप्पा'''' या कार्यक्रमात वरील सर्वच मान्यवरांच्याच उपस्थितीत होणाऱ्या जाहीर चर्चेनं होणार आहे. 

Top News

 

News 1

वीरगळ आणि सतीशिळांचा अव्याहत शोध !

Read More

News 2

आता भेट दर पंधरवड्याला !

Read More

News 3

सुवर्णमहोत्सवी गच्चीवरील गप्पा !

Read More

News 4

येत्या गच्चीवरील गप्पांमध्ये सचिन निंबाळकर !

Read More

News 5

जेजे सारख कॅम्पस अख्ख्या जगात नाही...

Read More
12345678910...