Enquire Now

Request A Quote

दंतकथांचा नायक : केकी मूस !

येत्या शनिवारी ''गच्चीवरील गप्पा'' या कार्यक्रमात प्रख्यात फोटोग्राफर कलामहर्षी केकी मूस यांची सोबत ज्यांना अगदीच तरुण वयात लाभली असे सध्याचे प्रसिद्ध फोटोग्राफर दिलीप कुलकर्णी यांना ''चिन्ह'' आमंत्रित करण्यात आलं आहे. यावेळी ते केकी मूस यांच्यासोबतच्या आठवणी सांगणार आहेत तसेच मूस यांचे व्यक्तिमत्व देखील यातूनच उलगडलं जाणार आहे. ''चिन्ह''चे संपादक सतीश नाईक हे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
चाळीसगावातल्या हवेलीच्या बाहेर आयुष्यभर न पडलेले आणि तब्बल पाच दशकं रोजच रात्री कलकत्ता मेलनं येणाऱ्या आपल्या प्रेयसीची वाट बघणारे प्रख्यात फोटोग्राफर " कलामहर्षी केकी मूस " आपल्या हयातीतच असंख्य दंतकथांचे नायक झाले. अफाट असं लोकविलक्षण आयुष्य जगलेल्या या कलावंतावर येत्या शनिवारच्या''गच्चीवरील गप्पा'' रंगणार आहेत.
शनिवार, दि. ३ जुलै २०२१
सायंकाळी ५.३० वाजता

Top News

 

News 1

वीरगळ आणि सतीशिळांचा अव्याहत शोध !

Read More

News 2

आता भेट दर पंधरवड्याला !

Read More

News 3

सुवर्णमहोत्सवी गच्चीवरील गप्पा !

Read More

News 4

येत्या गच्चीवरील गप्पांमध्ये सचिन निंबाळकर !

Read More

News 5

जेजे सारख कॅम्पस अख्ख्या जगात नाही...

Read More
12345678910...