गायतोंडे चित्र : आणखीन एक विक्रम
ज्यांच्यावर पहिलं पुस्तक प्रकाशित करण्याचा मान ''चिन्ह''ला मिळाला त्या प्रख्यात चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रानं आणखीन एक मोठा विक्रम केला आहे. सॅफ्रोन आर्ट या कंपनीच्या ऑनलाईन लिलावात गायतोंडे यांचं ६० च्या दशकातलं एक पेंटिंग तब्बल ४० कोटी रुपयांना विकलं गेलं आहे. याआधीचा विक्रम देखील गायतोंडे यांच्याच नावावर जमा होता. भविष्यकाळात असेच आणखीन मोठे विक्रम गायतोंडे यांच्या खात्यावर जमा होतील असे कलावर्तुळात म्हटलं जात आहे.