Enquire Now

Request A Quote

शेवटचा मालुसरा

प्रख्यात चित्रकार पद्मभूषण ''''लक्ष्मण पै'''' यांचं काल गोव्यात निधन झालं. निधनासमयी ते ९५ वर्षाचे होते. जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये कलेचं शिक्षण घेतलेले लक्ष्मण पै हे मोहन सामंत, शंकर पळशीकर, वासुदेव गायतोंडे यांना समकालीन होते. ५० च्या दशकात त्यांनी आपली कलाकीर्द सुरु केली. काही काळ ते पॅरिस येथे देखील वास्तव्यास होते.

६० च्या दशकात ते भारतात परतले. त्यानंतर मात्र ते इथंच राहिले. शेवटची काही वर्ष ते अमेरिकेला आपल्या मुलासमवेत राहत होते. त्यामुळे ते निधन पावले असं अनेकांनी गैरसमज करून घेतला. दुर्दैवानं काही ग्रंथातही तसा उल्लेख झाला. पण अमेरिकेतील राहणं न मानवल्यामुळं ते भारतात परत आले. गोव्यातील एक कलासंग्राहक ''''शाईस्ता थापर'''' यांनी त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ केला, अगदी अखेरपर्यंत त्यांनी त्यांना सांभाळलं. या काळात त्यांनी खूप मोठी मोठी पेंटिंग्स देखील केली. हुसेन, सुझा, रझा, गाडे, बाकरे, आरा, गायतोंडे यांच्या समवेत मोठा काळ घालवलेल्या लक्ष्मण पै यांच्या निधनाने भारतीय आधुनिक कलेच्या चळवळीतला शेवटचा शिलेदार देखील गेला असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरू नये. 

Top News

 

News 1

भगवान चोलामंडलला का गेले ?

Read More

News 2

युट्युबवर चित्रकार प्रकाश वाघमारे यांचा प्रीमिअर

Read More

News 3

शनिवारच्या गप्पांमध्ये भावना सोनवणे

Read More

News 4

गायतोंडे चित्र : आणखीन एक विक्रम

Read More

News 5

शेवटचा मालुसरा

Read More
12345678910...