Enquire Now

Request A Quote

प्रफुल्ल सावंत यांची उद्याची कार्यशाळा हाऊसफुल्ल


उद्या सायंकाळी नाशिककर चित्रकार मित्र प्रफुल्ल सावंत यांची निसर्गचित्रांची कार्यशाळा होणार आहे . या कार्यशाळेचे वैशिष्ट्य असं की हिच्या सर्वच्या सर्व सीटस आठवडाभर आधीच भरून गेल्या आहेत . ज्या सीटस भरल्या आहेत त्याच्या दीडपट लोकांनी विचारणा केली होती किंवा नावं नोंदवली होती . पण प्रत्यक्षात मात्र त्यातल्या  अनेकांनी वेळेवर प्रवेश शुल्क न भरल्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्रवेश देण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला . गम्मत म्हणजे सीट्स भरल्या गेल्याचे जाहीर होताच मात्र ज्यांनी आधी नावं नोंदवली होती त्यातली अनेकांनी संपर्क साधावयास सुरवात केली . '' काही करा आणि एक सीटची तरी व्यवस्था करा ''. '' फक्त एकाच सीटचं जमवा सर '' . वगैरे आर्जवं सुरु झाली . तांत्रिक दृष्ट्या हे शक्य नाही हे समजावून सांगतांना आमची मात्र पुरेवाट झाली . 


मिळालेला प्रतिसाद मात्र अभूतपूर्व होता . केवळ मुंबई पुण्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातुन या कार्यशाळेस प्रतिसाद मिळाला . भारतातील अनेक राज्यातूनच नव्हे तर परदेशातूनही विचारणा झाली . या कार्यशाळेचं माध्यम हे मराठीतच आहे हे सांगितल्यावर देखील अनेकांनी कार्यशाळेत सहभागी करुन  घेण्याचा आग्रह धरला आणि आणि तो आम्हाला पूर्ण देखील करायला लावला . आता नीटसं आठवत नाही पण परदेशातून चार पाच जण यात सहभागी झाले आहेत . भारताच्या इतर राज्यातून तर बापलेकांनी देखील नाव नोंदवलं आहे . हा सारा सोशल मीडियाचा प्रभाव आहे . इतकी वर्षं '' चिन्ह '' च्या माध्यमातून आम्ही जे काम केलं त्याला ही पावती तर आहेच . पण '' चित्रकार प्रफुल्ल सावंत '' यांनी आपल्या कामाने जो करिष्मा निर्माण केला आहे , त्याची देखील ती  पोच पावती आहे हे उघड आहे  . '' चिन्ह '' तर्फे आयोजित केली जाणारी ही पाचवी कार्यशाळा आहे . '' या अशा तीन चार तासांच्या कार्यशाळेतून '' चित्रकार '' तयार होतात का ? '' असा प्रश्न सर्रास विचारला जातो . या प्रश्नाचं उत्तर '' नाही '' असं आहे . तीन चार तासांच्याच काय पण चार पाच वर्षांच्या कलामहाविद्यालयांच्या शिक्षणातून देखील चित्रकार होऊ शकत नाही हे  या क्षेत्रात ५० वर्ष काढल्यानंतर तयार झालेलं माझं अत्यंत सडेतोड निरीक्षण किंवा मत आहे . दर वर्षी हजारो मुलं आपला कला अभ्यासक्रम संपवून या क्षेत्रात प्रवेश करतात त्यातली फारच थोडी सर्वोच्च स्थानी पोचतात . बाकीची कालमानपरत्वे हळू हळू या क्षेत्रातून बाहेर पडतात  पोटापाण्याचा उद्योगाला लागतात  ही वस्तुस्थिती आहे . 


शासनाच्या या क्षेत्राकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे , गेल्या  चार दशकात अभ्यासक्रम  देखील बदलला न गेल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे . यावर उपाय म्हणून '' चिन्ह '' द्वारे जागृती करण्याचा आम्ही प्रयत्न केला . पण आता परिस्थिती अधिकाधिक बिघडत चालली असल्यामुळे '' चिन्ह '' तर्फे आम्ही कार्यशाळांचं आयोजन करायला सुरवात केली , त्यामागे मुख्य हेतू आहे तो चित्रकला शिकू इच्छिणाऱ्यांचा दृष्टकोण बदलणे , ऍटीट्युड बदलणे . आवश्यकता भासल्यास एक प्रात्यक्षिक आणि त्या  त्या कलावंतांसोबत चर्चा , प्रश्नोत्तरे असा हा भरगच्च कार्यक्रम असतो . त्यातून अनेकांना  दिशा मिळते आहे असे सहभागी झालेल्यांच्या येणाऱ्या फोनवरून दिसते आहे . हा यातला आनंदाचा भाग . आणखीन काय हवे ?   सतीश नाईक 

Top News

 

News 1

प्रफुल्ल सावंत यांची उद्याची कार्यशाळा हाऊसफुल्ल

Read More

News 2

शिल्पा जोगळेकर गच्चीवरील गप्पांमध्ये...

Read More

News 3

स्त्री शोषणाविरोधात चित्रकला !

Read More

News 4

गवाणकरांच्या गजाली !!!

Read More

News 5

प्रेम पुराण ...

Read More
12345678910...