गवाणकरांच्या गजाली !!!
मालवणी संस्कृतीचा अक्षरशः ज्या नाटकानं उद्धार केला त्या '' वस्त्रहरण '' नाटकाचे लेखक प्रख्यात नाटककार गंगाराम गवाणकर यांच्यांशी एक विशेष बातचीत ''मालवणी मॉल'' ने रविवार दि १७ जानेवारी रोजी सकाळी ११. ०० वाजता आयोजित केली आहे . श्री गवाणकर हे जे जे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ''चिन्ह''चे संपादक सतीश नाईक . हा कार्यक्रम पाहायला विसरू नका . या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया www.malvanimall.com या वेबसाईटला आणि malvanimall.com च्या फेसबुक पेजला भेट द्या .