Enquire Now

Request A Quote

नाविन्यपूर्ण कार्यशाळा ...

''वाचाल तरच वाचाल'' !

आणखीन एका अभिनव कार्यशाळेचं आयोजन ''चिन्ह''नं जानेवारीमध्ये केलं आहे . ही कार्यशाळा आहे वाचन या विषयावरची . ती घेणार आहेत कला शिक्षक , चित्रकार आणि ज्यांचं वाचन अत्यंत अद्ययावत आहे असे केशव कासार . '' वाचाल तर वाचाल '' या शीर्षकाच्या कार्यशाळेत '' वाचन का करायचं , कशासाठी करायचं आणि मुख्य म्हणजे कसं करायचं या संदर्भात अत्यंत तपशीलवार माहिती दिली जाणार आहे . त्याच प्रमाणे वाचनामुळे चित्रकलेच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा चित्रकारांमध्ये कोणता सकारात्मक बदल होतो हे देखील समजावून दिले जाणार आहे .  ३० जानेवारी रोजी ११. ०० ते ०२. ०० या वेळेत चालणाऱ्या या कार्यशाळेत www.chinha.co.in चे संपादक सतीश नाईक हे त्यांच्याशी प्रदीर्घ संवाद साधणार आहेत . या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कृपया 90040 34903 या नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन ''चिन्ह''नं केलं आहे .  

Top News

 

News 1

स्त्री शोषणाविरोधात चित्रकला !

Read More

News 2

गवाणकरांच्या गजाली !!!

Read More

News 3

प्रेम पुराण ...

Read More

News 4

चिन्ह आता युट्यूब वर देखील !

Read More

News 5

हुसेन यांच्या नंतर ...

Read More
12345678910...