Enquire Now

Request A Quote

गप्पा गोष्टीत प्रकाश बाळ जोशी !

पुढल्या आठवड्यात म्हणजे २६ सप्टेंबरच्या शनिवारी आपण भेटणार आहोत ते चित्रकार '' प्रकाश बाळ जोशी '' यांना. ते मूळचे पत्रकार. पत्रकारिता करता करता ते कथा लिहू लागले, ललित लेखन करू लागले, नंतर तर मग ते काळ्या शाईत चित्र देखील काढू लागले. बॉंबे युनियन ऑफ जर्नलिस्ट अर्थात बियुजेच काम करता करता ते चित्रकार आरा यांच्या सहवासात आले. तिथेच त्यांच्या डोक्यात चित्रकार होण्याचं वेड भिनलं. पत्रकारिते सारख्या  दिवसाचं सारं अवकाश व्यापून घेणाऱ्या क्षेत्रात राहून देखील त्यांनी आपली चित्रकारिता जपली. 

सुमारे ७ - ८ वर्षांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाच्या निवृत्त होताच त्यांनी केवळ चित्रकला या विषयालाच वाहून घेतलं. सध्या कोरोनामुळे सारं जग बंदिस्त झालेलं असल्यामुळे ते आता मुलुंडमधल्या आपल्या स्टुडियोत दिसू शकतात. अन्यथा वर्षभर ते साऱ्या जगभरच्या कलादालनातून हिंडत असतात. समाज माध्यमांचा वापर करून त्यांनी अत्यंत कुशलपणे आपला जनसंपर्क वाढवला आहे. जगभरातले  ८० हजार कला रसिक त्यांना फॉलो करतात. कोरोनाच्या गेल्या सहा महिन्यात तर त्यांनी आपला संपर्क इतका विस्तारला की जागतिक प्रदर्शनांमधून त्यांच्या चित्रांचं नुसतं स्वागतच नाही झालं तर त्याची चांगली विक्री देखील झाली. आपले सारे अनुभव ते मराठी चित्रकारांसोबत शेअर करू इच्छितात. पण मराठी चित्रकार मात्र ''कानामागून येऊन तिखट'' झालेल्या जोशींचं स्वागत करावयास फारसे उत्सुक नसतात. 

हे लक्षात घेऊनच प्रश्न''चिन्ह''नं त्यांच्या सोबतच्या गप्पा गोष्टींच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यात सहभागी व्हायला विसरू नका. जोशींविषयी अधिक जाणून घेण्यासाठी प्रश्न''चिन्ह'' समूहात आजच सहभागी व्हा.   

Top News

 

News 1

प्रफुल्ल सावंत यांची उद्याची कार्यशाळा हाऊसफुल्ल

Read More

News 2

शिल्पा जोगळेकर गच्चीवरील गप्पांमध्ये...

Read More

News 3

स्त्री शोषणाविरोधात चित्रकला !

Read More

News 4

गवाणकरांच्या गजाली !!!

Read More

News 5

प्रेम पुराण ...

Read More
12345678910...