Enquire Now

Request A Quote

जेजेनं चित्रपट दिग्दर्शकही दिला !

आनंद यादव यांच्या कादंबरीवर कुणीतरी रवी जाधव नावाचा जाहिरात क्षेत्रातला तरुण चित्रपट बनवणार आहे अशा अर्थाची ती बातमी होती. रवी जाधवचा आणि माझा पहिला परिचय मराठी वृत्तपत्रातल्या एका बातमीने झाला तो हा असा. रवी जाहिरात क्षेत्रातून सिनेमात येऊ घातलाय आणि तो मूळचा जेजेचा असा त्या बातमीत उल्लेख होता. त्यामुळे साहाजिकच मी त्याला फॉलो करू लागलो. मनात म्हटलं कधी तरी जेजे जगीसाठी याची मुलाखत घेऊच. पण ''चिन्ह''च्या लागोपाठच्या विशेष अंकांमुळे ते कधी जमून आलं नाही. म्हणूनच जेजे जगी ग्रंथाच्या प्रकल्पात अन्य सर्वच नावांसोबत त्याचाही समावेश केला. याला ही बराच काळ लागला. मधल्या काळात तो देखील यशाची एकाहून एक उंच शिखरं पादाक्रांत करत गेला. मराठी चित्रपटसृष्टीत स्वतः भोवती ग्लॅमरचं एक भलं थोरलं वर्तुळ आखून बसला. 

नितीन आरेकर सरांनी जेव्हा रवीच्या आत्मकथनाचं शब्दांकन करून पाठवलं तेव्हा ते वाचून मी अक्षरशः थक्क झालो. संगणक सुरु केल्या नंतर त्या शब्दांकनातला जो पहिला परिच्छेद मी वाचला तो असा होता. '' माझे वडील गिरणी कामगार होते, घरात पैशाची फारशी आवक नव्हती. त्यामुळे पहिली काही वर्ष मी दररोज पहाटे साडेचार वाजता उठून साडे पाचच्या सुमारास घरोघरी वर्तमानपत्रे टाकत असे, साडे सहापर्यंत घरी परतून मग सकाळी आठ चौदाची फास्ट लोकल पकडून मुंबई गाठत असे. साडे नऊ ते साडे  तीन पर्यंत तास आटोपत असत, प्रॅक्टिकल्स होत असत. मग साडे चार वाजता वडलांनी त्यांच्याच मिलमध्ये कलर डिपार्टमेंटच्या एका कामात मला जोडून दिलं होतं. असं सगळं करून मी रात्री अकराच्या सुमारास डोंबिवलीला परतत असे. जेवून झोपी जायचं ते पहाटे साडेचारला उठण्यासाठी.'' हे वाचलं आणि त्या निवेदनातला सच्चेपणा कुठेतरी आत भिडून गेला. जेजे जगी जगलमधले बहुसंख्य आत्मकथन ही अशीच कुठेतरी खोलवर भिडणारी आहेत. रवीच आत्मकथन हे त्या साऱ्याचा परमोच्च बिंदू आहे. हे आता वेगळं सांगायची गरज आहे का ? 

संपादक 

आता मुद्याचं. हा महाग्रंथ येत्या मे महिन्याच्या पूर्वार्धात मुंबईत एका विशेष समारंभात प्रसिद्ध होणार आहे. ३००० रु. किंमतीचा हा ग्रंथ अजूनही आपण बुक केला नसेल अवघ्या २००० रुपयात तो आम्ही प्रकाशनपूर्व सवलत योजनेत उपलब्ध करून देत आहोत. याही ग्रंथाची निर्मिती "गायतोंडे" ग्रंथाप्रमाणेच अत्यंत खर्चिक असल्यानं त्याच्या फक्त १००० प्रतीच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यातल्या ८०० पेक्षा अधिक आधीच नोंदल्या गेल्या आहेत. आपणास जर मागणी नोंदवायची असेल तर 90040 34903 या  व्हाट्सअँप नंबरवर " j j " या मेसेजसह स्वतःचं नाव पत्ता पाठवून नोंदवावी. या ग्रंथा सोबत ''निवडक'' मालिकेतील तिसरा ग्रंथ ''व्यक्तिचित्रं शब्दातली'' (मूल्य रु ३००० ) याचीही मागणी नोंदवल्यास ६००० चे हे ग्रंथ फक्त ५००० ला मिळतीलच पण त्यावर विशेष भेट म्हणून ''चिन्ह''चा बहुचर्चित ''गायतोंडे'' ( रु ३००० ) ग्रंथ आणि ''चित्रसूत्र'' (रु १००) हे विशेष भेट म्हणून मिळतील.  
Top News

 

News 1

प्रफुल्ल सावंत यांची उद्याची कार्यशाळा हाऊसफुल्ल

Read More

News 2

शिल्पा जोगळेकर गच्चीवरील गप्पांमध्ये...

Read More

News 3

स्त्री शोषणाविरोधात चित्रकला !

Read More

News 4

गवाणकरांच्या गजाली !!!

Read More

News 5

प्रेम पुराण ...

Read More
12345678910...