Enquire Now

Request A Quote

जेजेनं कवीला प्रेरणा दिली !

जेजेच्या वास्तूनं आणि परिसरानंच अनेकांना कलावंत केलं. इथल्याच अनोख्या वातावरणानं अनेकांना मुलखावेगळं धाडस करण्याची प्रेरणा देखील दिली. जेजेचा विद्यार्थी असलेला चंद्रशेखर गोखले नाही तर कविते-बिवीतेच्या फंदात कशाला पडायचा ? जेजेमधला त्याचा साराच वावर एखाद्या चारचौघांसारख्या दिसणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखाच होता. चित्रकलेत देखील त्यानं काही फारसा प्राविण्य दाखवलं नाही किंवा तो जेजेत खूप चमकला असंही म्हणता येणार नाही. 

पण इथल्या निसर्गरम्य परिसरानं त्याला शब्दातून व्यक्त करायला भाग पाडलं आणि त्याच्या कवी मनाला प्रेरणा दिली. झाडावरचं  वाळलेलं पान रंगवता रंगवता तो सहजपणे त्या पानावर कविता लिहून गेला. ज्या कवितेचं प्रचंड स्वागत झालं. मराठी कवितेतला चारओळी कवितांचा ट्रेंड त्यानेच तर आणला. त्या आधी कवितेची पुस्तक वृत्तपत्रांच्या ठेल्यावर किंवा स्टेशनरीच्या दुकानात विकताना कुणी पाहिली होती ? पण चंद्रशेखर गोखले यांच्या कवितेनं अशी सर्व ठिकाणं काबीज करून मराठीत कवितेचा एक आगळावेगळा इतिहासच घडवला. 

संपादक 

आता मुद्याचं. हा महाग्रंथ येत्या मे महिन्याच्या पूर्वार्धात मुंबईत एका विशेष समारंभात प्रसिद्ध होणार आहे. ३००० रु. किंमतीचा हा ग्रंथ अजूनही आपण बुक केला नसेल अवघ्या २००० रुपयात तो आम्ही प्रकाशनपूर्व सवलत योजनेत उपलब्ध करून देत आहोत. याही ग्रंथाची निर्मिती "गायतोंडे" ग्रंथाप्रमाणेच अत्यंत खर्चिक असल्यानं त्याच्या फक्त १००० प्रतीच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यातल्या ८०० पेक्षा अधिक आधीच नोंदल्या गेल्या आहेत. आपणास जर मागणी नोंदवायची असेल तर 90040 34903 या  व्हाट्सअँप नंबरवर " j j " या मेसेजसह स्वतःचं नाव पत्ता पाठवून नोंदवावी. या ग्रंथा सोबत ''निवडक'' मालिकेतील तिसरा ग्रंथ ''व्यक्तिचित्रं शब्दातली'' (मूल्य रु ३००० ) याचीही मागणी नोंदवल्यास ६००० चे हे ग्रंथ फक्त ५००० ला मिळतीलच पण त्यावर विशेष भेट म्हणून ''चिन्ह''चा बहुचर्चित ''गायतोंडे'' ( रु ३००० ) ग्रंथ आणि ''चित्रसूत्र'' (रु १००) हे विशेष भेट म्हणून मिळतील.  




Top News

 

News 1

गप्पा गोष्टीत प्रकाश बाळ जोशी !

Read More

News 2

नवं पुस्तक बिटवीन द लाईन्स !

Read More

News 3

जेजेनं चित्रपट दिग्दर्शकही दिला !

Read More

News 4

जेजेनं कवीला प्रेरणा दिली !

Read More

News 5

चित्रकार होता होता ...

Read More
12345678910...