Enquire Now

Request A Quote

चित्रकार होता होता ...

मराठीतील नामवंतांच्या मुलींनी जेजेत शिक्षण घेण्याची एक खूप मोठी परंपरा आहे. अगदी चटकन आठवणारी उदाहरणं सांगायची तर चित्रकार दीनानाथ दलाल यांची कन्या प्रतिमा, प्रख्यात साहित्यिक विजय तेंडुलकर यांची कन्या प्रिया, व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांची कन्या अंजली, कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांची कन्या ( नाव आठवत नाही. ), प्रकाशन क्षेत्रातील नामवंत चित्रकार पद्मा सहस्त्रबुद्धे यांची कन्या उर्मिला वगैरे.  नामवंत नाटककार रत्नाकर मतकरी यांची कन्या सुप्रिया ही देखील याच परंपरेतली. घरात नाटकाची पार्श्वभूमी असल्यामुळे सुप्रियाच्या चेहऱ्याला आधीच रंग लागला होता. साहाजिकच जेजेत शिक्षण घेत असतानाच तिचं प्रायोगिक, व्यावसायिक नाटकात काम करणं चालूच होतं. त्यामुळेच की काय कुणास ठाऊक ती कधी जेजेने आंतरमहाविद्यालयात सादर केलेल्या एकांकिकांमध्ये ती बहुदा दिसली नसावी . 

जेजेत तिनं मनापासून चित्रकलेचंच शिक्षण घेतलं. एका बाबतीत ती जराशी भाग्यवान ठरली कारण ज्या वर्षी तिनं जेजेत प्रवेश केला त्याच वर्षी जेजेत पदवी अभ्यासक्रम सुरु झाला. पण तो पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळं जेजेच्या आदर्श शिक्षण व्यवस्थेला वाळवी लागायला सुरवात झाली होती, त्याचा अर्थातच  तिलाही त्रास झाला, त्यामुळेच तिने एमएफची दुसऱ्या वर्षाची परीक्षाच दिली नाही. 

नाटक की चित्रकला यातलं एकच निवड करायची वेळ जेव्हा तिच्यावर आली तेव्हा तिला असं लक्षात आलं की आपण आता थिएटर शिवाय नाटकाशिवाय जगूच शकत नाही. आणि मग ती अभिनयाची  एक एक पायरी चढत गेली. पण आजही जेजेच्या निसर्गरम्य वातावरणात जे काही शिकलो त्या विषयी तिच्या मनात अत्यंत कृतज्ञता आहे. त्याचं समर्पक चित्रण तिनं आपल्या आत्मकथनात केलं आहे. 

संपादक 

आता मुद्याचं. हा महाग्रंथ येत्या मे महिन्याच्या पूर्वार्धात मुंबईत एका विशेष समारंभात प्रसिद्ध होणार आहे. ३००० रु. किंमतीचा हा ग्रंथ अजूनही आपण बुक केला नसेल अवघ्या २००० रुपयात तो आम्ही प्रकाशनपूर्व सवलत योजनेत उपलब्ध करून देत आहोत. याही ग्रंथाची निर्मिती "गायतोंडे" ग्रंथाप्रमाणेच अत्यंत खर्चिक असल्यानं त्याच्या फक्त १००० प्रतीच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यातल्या ८०० पेक्षा अधिक आधीच नोंदल्या गेल्या आहेत. आपणास जर मागणी नोंदवायची असेल तर 90040 34903 या  व्हाट्सअँप नंबरवर " j j " या मेसेजसह स्वतःचं नाव पत्ता पाठवून नोंदवावी. या ग्रंथा सोबत ''निवडक'' मालिकेतील तिसरा ग्रंथ ''व्यक्तिचित्रं शब्दातली'' (मूल्य रु ३००० ) याचीही मागणी नोंदवल्यास ६००० चे हे ग्रंथ फक्त ५००० ला मिळतीलच पण त्यावर विशेष भेट म्हणून ''चिन्ह''चा बहुचर्चित ''गायतोंडे'' ( रु ३००० ) ग्रंथ आणि ''चित्रसूत्र'' (रु १००) हे विशेष भेट म्हणून मिळतील.  Top News

 

News 1

जेजेनं चित्रपट दिग्दर्शकही दिला !

Read More

News 2

जेजेनं कवीला प्रेरणा दिली !

Read More

News 3

चित्रकार होता होता ...

Read More

News 4

विसरता न येणारे दिवस !

Read More

News 5

जेजेवाल्याचा साहित्ययज्ञ !

Read More
12345678910...