Enquire Now

Request A Quote

विसरता न येणारे दिवस !

''श्वास'' चित्रपटातल्या भूमिकेनं ज्याला लोकमान्यता मिळाली तो अभिनेता ''संदीप कुलकर्णी'' देखील जेजेचाच. म्हणजे फाईन आर्टचा. ८० च्या पूर्वार्धात त्यानं जेजेत शिक्षण घेतलं. त्यालाही चित्रकारच व्हायचं होतं पण जेजेतच त्याच्या चेहऱ्याला कधीतरी नाटकाचा रंग लागला. त्या रंगानंच त्याला सई परांजपे यांची सिरीयल मिळून दिली. सईबाईंची ती सिरीयल चित्रकारांच्या पार्श्वभूमीवर आधारित होती. त्यांना चित्रीकरणासाठी जेजेचीच निसर्गरम्य पार्श्वभूमी हवी होती. ती निवडताना त्यांना अभिनय आणि पेंटिंग हे दोन्ही करू शकणारा तरुण हवा झाला . सुरुवातीला केवळ मदत करायला गेलेल्या संदीपचा रोल नंतर सईबाईनी डेव्हलप करत नेला. 

आणि संदीप कॉलेज स्टार झाला. त्यानंतर संदीपने कधी मागे वळून पाहिलंच नाही. तो सतत पुढं पुढं जात राहिला. नाटकाचा रंग एकदा तोंडाला लागला की तो सहसा निघत नाही असं म्हणतात. संदीपचंही तसंच झालं. प्रायोगिक नाटकं, मालिका आणि अखेरीस चित्रपट अशा एक एक पायऱ्या तो यशस्वीपणे चढत गेला. आज तो अत्यंत विचारपूर्वक अभिनय करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक समजला जातो. जेजेच्या संदर्भात त्याला बोलतं केलं, तेव्हा जेजेतल्या दिवसांविषयी तो अगदी भरभरून बोलला. 

जेजेत शिकतानाच्या खटकलेल्या गोष्टी देखील त्याने अत्यंत स्पष्टपणे मांडल्या. पण आजही तो आपल्या यशाचं श्रेय जेजेतल्या त्या दिवसांना देतो. ''जेजेनं मला दिलेली व्हिजुअल स्ट्रेंथ आजच्या माझ्या एक ऍक्टर म्हणून असलेल्या यशाचा मुख्य पाय आहे असे तो मोकळेपणानं सांगून टाकतो.'' तो म्हणतो ''जेजेचे दिवस कधी विसरलं जाणं शक्यच नाही.''

संपादक 

आता मुद्याचं. हा महाग्रंथ येत्या मे महिन्याच्या पूर्वार्धात मुंबईत एका विशेष समारंभात प्रसिद्ध होणार आहे. ३००० रु. किंमतीचा हा ग्रंथ अजूनही आपण बुक केला नसेल अवघ्या २००० रुपयात तो आम्ही प्रकाशनपूर्व सवलत योजनेत उपलब्ध करून देत आहोत. याही ग्रंथाची निर्मिती "गायतोंडे" ग्रंथाप्रमाणेच अत्यंत खर्चिक असल्यानं त्याच्या फक्त १००० प्रतीच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यातल्या ८०० पेक्षा अधिक आधीच नोंदल्या गेल्या आहेत. आपणास जर मागणी नोंदवायची असेल तर 90040 34903 या  व्हाट्सअँप नंबरवर " j j " या मेसेजसह स्वतःचं नाव पत्ता पाठवून नोंदवावी. या ग्रंथा सोबत ''निवडक'' मालिकेतील तिसरा ग्रंथ ''व्यक्तिचित्रं शब्दातली'' (मूल्य रु ३००० ) याचीही मागणी नोंदवल्यास ६००० चे हे ग्रंथ फक्त ५००० ला मिळतीलच पण त्यावर विशेष भेट म्हणून ''चिन्ह''चा बहुचर्चित ''गायतोंडे'' ( रु ३००० ) ग्रंथ आणि ''चित्रसूत्र'' (रु १००) हे विशेष भेट म्हणून मिळतील.  

Top News

 

News 1

प्रफुल्ल सावंत यांची उद्याची कार्यशाळा हाऊसफुल्ल

Read More

News 2

शिल्पा जोगळेकर गच्चीवरील गप्पांमध्ये...

Read More

News 3

स्त्री शोषणाविरोधात चित्रकला !

Read More

News 4

गवाणकरांच्या गजाली !!!

Read More

News 5

प्रेम पुराण ...

Read More
12345678910...