Enquire Now

Request A Quote

जेजेवाल्याचा साहित्ययज्ञ !

दुसऱ्या पर्वातल्या ''''चिन्ह''''च्या प्रकाशनाला सुरुवात झाली आणि पहिल्याच वर्षी दोन प्रतींची नोंदणी बदलापूरच्या एका वाचनालयाकडून झाली. दुसऱ्या वर्षी त्याच वाचनालयाने प्रतींची संख्या दुप्पट केली. तिसऱ्या वर्षी तर पाच प्रती एकाच वेळी नोंदवल्या. आता माझं कुतूहल अधिकच जागृत झालं. म्हटलं बदलापूरसारख्या ठिकाणाहून ही एवढ्या प्रतींची मागणी कशी नोंदवली जाते ? न रहावुन मी तिथं फोन केला. तिचं माझी आणि शाम जोशी यांची पहिली ओळख. त्याच फोन भेटीत त्यांनी आपण करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. 

मला कुतूहल होतं ते ''''चिन्ह''''च्या एवढ्या प्रती कशा नोंदवल्या जातात याचं. त्या विषयी विचारता जोशी बुवा म्हणाले ''''चांगले अंक आम्ही जास्तच मागवतो. ''''चिन्ह''''ला तर आमच्याकडे प्रचंड मागणी असते. वाचक अक्षरशः नंबर लावून अंक वाचतात.'''' मला हे सारं नवीनच होतं. किंबहुना असा संवाद माझा कुणाशीच कधी झाला नव्हता. मी त्यांना विचारलं हे वाचक कोण आहेत ? तर ते म्हणाले ''''बदलापुरात आता खूप चित्रकार राहावयास आले आहेत. ते तर वाचतातच पण दर्जेदार दिवाळी अंक वाचणारा मोठा वाचक वर्ग बदलापुरात आता स्थलांतरित झाला आहे. तो देखील मोठ्या प्रमाणावर ''''चिन्ह'''' वाचतो. 

मग हलकेच म्हणाले मी देखील ''''चिन्ह'''' वाचतो. मी विचारलं ते कसं काय ? कशामुळे ? तर हे ग्रंथालयच माझं आहे, वाचनाच्या आवडीतून मी ते उभं केलं आहे. आणखीन एक सांगू का ? तुम्हाला धक्का बसेल. म्हटलं काय ? तर म्हणाले मी देखील जेजेतच शिकलो तुम्हाला ठाऊक आहे का ? मी खरोखरच प्रचंड आश्चर्यचकित झालो. म्हटलं नाही ? कधी ? तर म्हणाले ७० च्या दशकाच्या पूर्वार्धात, बहुदा आणीबाणीच्या आधी. मी म्हणालो नाही. हे मला ठाऊक नव्हतं ? मी देखील ७० च्या दशकातच शिकलो पण ते ऐन आणीबाणीच्याच काळात. 

खरं तर ते ज्या वर्गात शिकले त्या टेक्स्टाईलच्या आणि माझ्या इंटिरियरच्या वर्गात एका लाकडी भिंतीचं अंतर होतं. पण त्यावेळी कधी गाठभेट झाल्याचं मला आठवेना आणि त्यांनाही आठवेना. मग जेजे संदर्भात खूप गप्पा झाल्या , खूप आठवणी निघाल्या तेव्हाच ठरवलं होतं की ''''चिन्ह''''च्या एका अंकात जेजे जगी या सदरात जोशींच्या नावाचा समावेश करायचा. पण दुसऱ्या टप्प्यात एका पाठोपाठ एक विशेष अंकाची रांग लागली आणि ठरवलेले राहूनच गेले. जेजे जगी ग्रंथाची रूपरेषा नक्की झाली आणि जोशी आणि अनेकांच्या नावाने पुन्हा उचल खाल्ली. माझी खात्री आहे शाम जोशी यांचं हे आत्मकथन या ग्रंथाला एक वेगळंच परिणाम देऊन जाईल.  

संपादक 

आता मुद्याचं. हा महाग्रंथ येत्या मे महिन्याच्या पूर्वार्धात मुंबईत एका विशेष समारंभात प्रसिद्ध होणार आहे. ३००० रु. किंमतीचा हा ग्रंथ अजूनही आपण बुक केला नसेल अवघ्या २००० रुपयात तो आम्ही प्रकाशनपूर्व सवलत योजनेत उपलब्ध करून देत आहोत. याही ग्रंथाची निर्मिती "गायतोंडे" ग्रंथाप्रमाणेच अत्यंत खर्चिक असल्यानं त्याच्या फक्त १००० प्रतीच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यातल्या ८०० पेक्षा अधिक आधीच नोंदल्या गेल्या आहेत. आपणास जर मागणी नोंदवायची असेल तर 90040 34903 या  व्हाट्सअँप नंबरवर " j j " या मेसेजसह स्वतःचं नाव पत्ता पाठवून नोंदवावी. या ग्रंथा सोबत ''''निवडक'''' मालिकेतील तिसरा ग्रंथ ''''व्यक्तिचित्रं शब्दातली'''' (मूल्य रु ३००० ) याचीही मागणी नोंदवल्यास ६००० चे हे ग्रंथ फक्त ५००० ला मिळतीलच पण त्यावर विशेष भेट म्हणून ''''चिन्ह''''चा बहुचर्चित ''''गायतोंडे'''' ( रु ३००० ) ग्रंथ आणि ''''चित्रसूत्र'''' (रु १००) हे विशेष भेट म्हणून मिळतील.  


Top News

 

News 1

कलाशिक्षण, कॅलीग्राफी आणि तबला !

Read More

News 2

आज आणखी एक वादग्रस्त विषय ?

Read More

News 3

महाचर्चा : दुसरा टप्पा मंगळवारी सुरु !

Read More

News 4

अद्भुत प्रतिमा आणि प्रतिभा !

Read More

News 5

महाचर्चा ऐकायचीय ?

Read More
12345678910...