Enquire Now

Request A Quote

वह कौन थी ?

विद्यार्थी दशेत असताना ७० च्या दशकात अनेकदा जेजेच्या रम्य परिसरात निरुद्देश भटकंती व्हायची. अशा एकाच भटकंतीत एका अत्यंत सुंदर व्यक्तिमत्वानं लक्ष वेधून घेतलं. जणू काही राजा रवी वर्माच्या चित्रातली एखादी सुंदर स्त्रीच जेजेच्या निसर्गरम्य परिसरात अवतरली असावी असा काहीतरी भास होऊन गेला. त्या व्यक्तिमत्वात पाहणाऱ्याला खिळवून टाकण्याची विलक्षण जादू होती. ''वह कौन थी ?'' असा प्रश्न मनाला पडला आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळवल्या शिवाय अक्षरशः राहवेना. कॅ ब्र करावं ? काही कळेना. तितक्यात समोरून प्रमोद गुरुजी येताना दिसला. जेजेत ७० च्या दशकात जे शिकले त्यांना प्रमोद गुरुजी या अत्रंगी व्यक्तिमत्वाविषयी वेगळं सांगावयाची गरजच नाही. ( ज्यांना त्याच्या विषयी जाणून घेण्याची गरज भासते त्यांनी ''चिन्ह''चा २००५ सालचा अंक जरूर वाचावा. ज्यांना तो मिळणार नाही त्यांनी आणखीन थोडसं थांबल्यास ''निवडक चिन्ह''च्या ''व्यक्तिचित्रं पण शब्दातली'' या आगामी ग्रंथात वाचायला मिळेलच. ) तर प्रमोद म्हणाला ''अरे, ती तर आपल्या भिडे मास्तरांची कन्या सुचेता'' ती ही आपल्या जेजेतच होती वगैरे. 

सुचेता भिडे यांची पहिली ओळख ही अशी झाली. मग वर्तमान पत्र वाचता वाचता कळत गेलं की  सुचेता भिडे या जरी जेजेच्या विद्यार्थिनी असल्या तरी नृत्यात पारंगत आहेत. मग नंतर असंही कळलं की  त्यांनी त्यात पी एच डी वगैरे केली आहे. जेजेत शिकलेल्या पण चित्रकला सोडून अन्य क्षेत्रात नाव कमावलेल्याना फॉलो करण्याचा छंद मला बहुदा तेव्हापासूनच लागला. जेजेतलं शिक्षण संपता संपता मी पत्रकारितेत शिरलो. एके दिवशी एका नृत्याच्या कर्यक्रमाचा वृत्तांत कुणीतरी पाठवला आणि त्या सोबत सुचेताबाईंचे असंख्य फोटो होते. या घटनेलाही झाली असतील आता उणीपुरी ३५ - ३६ वर्ष. पण आजपर्यंत ते फोटो मी जपून ठेवले असावेत. ते बहुदा त्यांच्या लेखासोबत वापरण्यासाठीच. 

पहिल्यांदा ते फोटो मी ''चिन्ह''च्या  पहिल्या टप्प्यातल्या अंकात वापरले. पण त्या लेखाविषयी मी फारसा समाधानी नव्हतो. म्हणून मग ''जेजे  जगी''ग्रंथात पुन्हा त्यांच्या नावाचा समावेश केला. आता त्या मुंबईत नव्हत्या पुण्यात स्थायिक झाल्या होत्या. आमच्या नितीन आरेकरांनी त्यांना पुण्यात गाठलं आणि जेजे जगी ग्रंथात जेजेच्या सुंदर आठवणींची भर पडली. त्यांना कुणी विचारलं की ''एवढं जेजेमध्ये चित्रकला शिकलात पण चित्र का नाही काढलीत ?''त्यांचं उत्तर अफलातून आहे.इतकं की थेट चित्रकार ''गायतोंडे'' यांची आठवण व्हावी.  त्या म्हणतात ''मग एवढा काळ  रंगमंचावर मी काय केलं ? अवकाशाच्या पटलावर, अविर्भाव आणि आकृतीबंधांच्या साहाय्यानं मी चित्रच रेखाटत होते की.'' 

संपादक 

आता मुद्याचं. हा महाग्रंथ येत्या मे महिन्याच्या पूर्वार्धात मुंबईत एका विशेष समारंभात प्रसिद्ध होणार आहे. ३००० रु. किंमतीचा हा ग्रंथ अजूनही आपण बुक केला नसेल अवघ्या २००० रुपयात तो आम्ही प्रकाशनपूर्व सवलत योजनेत उपलब्ध करून देत आहोत. याही ग्रंथाची निर्मिती "गायतोंडे" ग्रंथाप्रमाणेच अत्यंत खर्चिक असल्यानं त्याच्या फक्त १००० प्रतीच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यातल्या ८०० पेक्षा अधिक आधीच नोंदल्या गेल्या आहेत. आपणास जर मागणी नोंदवायची असेल तर 90040 34903 या  व्हाट्सअँप नंबरवर " j j " या मेसेजसह स्वतःचं नाव पत्ता पाठवून नोंदवावी. या ग्रंथा सोबत ''निवडक'' मालिकेतील तिसरा ग्रंथ ''व्यक्तिचित्रं शब्दातली'' (मूल्य रु ३००० ) याचीही मागणी नोंदवल्यास ६००० चे हे ग्रंथ फक्त ५००० ला मिळतीलच पण त्यावर विशेष भेट म्हणून ''चिन्ह''चा बहुचर्चित ''गायतोंडे'' ( रु ३००० ) ग्रंथ आणि ''चित्रसूत्र'' (रु १००) हे विशेष भेट म्हणून मिळतील.  

Top News

 

News 1

कलाशिक्षण, कॅलीग्राफी आणि तबला !

Read More

News 2

आज आणखी एक वादग्रस्त विषय ?

Read More

News 3

महाचर्चा : दुसरा टप्पा मंगळवारी सुरु !

Read More

News 4

अद्भुत प्रतिमा आणि प्रतिभा !

Read More

News 5

महाचर्चा ऐकायचीय ?

Read More
12345678910...