Enquire Now

Request A Quote

सुवर्णपर्व पाहिलेला माणूस ..

१९२५ ते २००० इतका प्रदीर्घ काळ जेजेत जा-ये करणाऱ्या बी डी शिरगांवकर सरांनी विद्यार्थी दशेत सॉलोमन साहेबांचा काळ अनुभवलेला. नंतर तर ते जेजेतच शिक्षक म्हणून रुजू झाले. सेवानिवृत्त झाल्यावर देखील ते जेजेत जाऊन येऊन असतच. शिडशिडीत आणि उंचपुरं व्यक्तिमत्व लाभलेल्या शिरगांवकर सरांचा नव्वदाव्या वर्षी देखील धाकच वाटायचा. जेजेचा इतका मोठा कालखंड पाहिलेल्या शिरगांवकर सरानी त्या दिवसातल्या आठवणींवर लिहावे असे मनात आले आणि त्यांच्याशी संपर्क साधला. तेही एका पायावर तयार झाले, पण म्हणाले ''एकच अडचण आहे, कुणी या साऱ्याचं शब्दांकन करील का ? 


 ती जबाबदारी मोठ्या आनंदाने स्वीकारली ती ज्योत्स्ना कदम यांनी. त्यावेळी सर ठाण्याला वृदावन सोसायटीला राहत आणि  ज्योत्स्ना कदम देखील त्यांच्याच सोसायटीत राहात.  त्यामुळे साहाजिकच ते पटकन जमून देखील गेलं. पण मग प्रश्न आला तो फोटोंचा. तर सर म्हणाले ते सारे आमच्या दादरच्या जागेत आहेत . आता आली का पंचाइत ? या वयात सरांना ठाण्यावरून दादरला जाऊन फोटो आणून द्या म्हणून सांगणे अयोग्य वाटले. पण स्वतः सरच म्हणाले की ''त्यात काय विशेष मी देतो आणून''.  आणि तरातरा ठाण्याहून ट्रेनने दादरला जाऊन त्यांनी ते आणले देखील. तोच हा लेख. २००२ च्या सांगोपांग चित्रकला विशेषांकात तो प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर २-३ वर्षांतच सर गेले.... पण जेजेच्या एका सुंदर कालखंडाचं, सुवर्णमय आठवणींचं डाक्युमेंटेशन मात्र ते करून गेले. 


संपादक 


आता मुद्याचं. हा महाग्रंथ येत्या मे महिन्याच्या पूर्वार्धात मुंबईत एका विशेष समारंभात प्रसिद्ध होणार आहे. ३००० रु. किंमतीचा हा ग्रंथ अजूनही आपण बुक केला नसेल अवघ्या २००० रुपयात तो आम्ही प्रकाशनपूर्व सवलत योजनेत उपलब्ध करून देत आहोत. याही ग्रंथाची निर्मिती "गायतोंडे" ग्रंथाप्रमाणेच अत्यंत खर्चिक असल्यानं त्याच्या फक्त १००० प्रतीच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यातल्या ८०० पेक्षा अधिक आधीच नोंदल्या गेल्या आहेत. आपणास जर मागणी नोंदवायची असेल तर 90040 34903 या  व्हाट्सअँप नंबरवर " j j " या मेसेजसह स्वतःचं नाव पत्ता पाठवून नोंदवावी. या ग्रंथा सोबत ''निवडक'' मालिकेतील तिसरा ग्रंथ ''व्यक्तिचित्रं शब्दातली'' (मूल्य रु ३००० ) याचीही मागणी नोंदवल्यास ६००० चे हे ग्रंथ फक्त ५००० ला मिळतीलच पण त्यावर विशेष भेट म्हणून ''चिन्ह''चा बहुचर्चित ''गायतोंडे'' ( रु ३००० ) ग्रंथ आणि ''चित्रसूत्र'' (रु १००) हे विशेष भेट म्हणून मिळतील.  

Top News

 

News 1

आणखीन एका विक्रमाच्या प्रतीक्षेत !

Read More

News 2

असा कलाशिक्षक होणे नाही !

Read More

News 3

ढग गडगडल्या सारखं हसणारे सर !

Read More

News 4

वादग्रस्त...

Read More

News 5

व्हरांड्यातली बुटांची टॉकटॉक...

Read More
12345678910...